दुधात माशी पडली तर सगळ दूध फेकतो
अन् तुपात माशी पडली तर माशीच काढून फेकतो
असा कसा रे माणसा तू फायद्यानुसार वागतो?
काहीच सोबत येत नाही,जो दाखले देऊन सांगतो
तो बुवा दोन तासांच्या कीर्तनाचे पंचवीस हजार मागतो
असा कसा रे माणसा तू फायद्यानुसार वागतो?
इतरांच काय तू देवाला तरी कुठे सोडतो
मोठ्या इच्छापूर्ती नंतरच छोटासा नवस फेडतो
असा कसा रे माणसा तू फायद्यानुसार वागतो?
कौतुक करतो ऋतुंचे पण ते तरी कुठे सहन करतो
थंडीत शेकोटी भोवती अन् गर्मीत हिलस्टेशन्स फिरतो
असा कसा रे माणसा तू फायद्यानुसार वागतो?
आरोग्याची हेळसांड करून जन्मभर पैसे कमावतो
जमवलेली माया सारी मग आरोग्यासाठीच गमावतो
सांग भल्या माणसा,कोणत्या कायद्यानुसार वागतो?
असा कसा रे माणसा तू फायद्यानुसार वागतो?