Bluepad | Bluepad
Bluepad
देव आनंद!
Pravin Wadmare
Pravin Wadmare
14th Jul, 2023

Share

देव आनंद!
देव आनंद!
नाव वाचूनच आनंद होतो ना...अर्थातच तुमच्या पिढीचा तो नायक!कितिरी तरुणाचा तो आवडता नट! चॉकलेट हिरो रोमान्स किंग आणखी काय काय... जीवनाच्या त्या रंगीत जगताचा तो साक्षीदार!कित्येकिंच्या स्वप्नातील हिरो!त्याचे गाईड, हम दोनो सारखे सिनेमे अजरामर!
अभिनयापेक्षा स्टाईलवर भर देणारा हा! त्याची उच्चाराची आणि तिरपट चालण्याची विशिष्ट पद्धत..तुम्ही ही मिमिक्री करून पहिली आहे ना?
स्वतःला देवानंद समजतो का? हा खोचक प्रश्नही किती भावून जात असेल नाही का?त्या तुमच्या पिढीच्या नायकाच्या आठवणी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत द्वारकानाथ संझगिरी यांनी! त्यांच्या खास शैलीतून! ते ही तुमच्या पैकी एक.....देव आनंद यांचे निस्सीम चाहते....त्यांचे पुस्तकातील वाक्य,"देव आनंदचा चित्रपट आणि क्रिकेटचा कसोटी सामना याकडे डोळे लावून बसण्यात मी चातकाला सुद्धा हरवला असतं."
क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण हे भारतीयांच्या आवडीचे विषय!या क्षेत्रातील लोकांना खूप ग्लॅमर असते.त्यांची फॅन फॉलोविंग ,चाहता वर्ग खूप मोठा असतो.त्यांना देवासारखे मानलं जातं.अनेक फॅन्स अक्षरशः वेडी असतात....कारण यांनी आपल्या मनात घर केलेलं असते.असेच एक मागच्या पिढीतील नायक... चॉकलेट हिरो, रोमांस किंग म्हणून सदाबहार म्हणून प्रसिद्ध असलेले देव आनंद!
देवानंद असं शॉर्ट उच्चार आपण करतो, तेच देव आनंद! त्यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यांच्या खास चाहत्या लेखकाने म्हणजे द्वारकानाथ संझगिरी यांनी या निमित्ताने लिहिलेलं हे पुस्तक!
हे पुस्तक देव आनंद चरित्र नाही. पण त्याची मुंबईतील धडपड, त्याचं पुण्यातलं स्थिरस्थावर होणं, त्याचे सिनेमातलं करिअर या गोष्टी या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. देव आनंद हे मूळचे पंजाब मधील गुरुदासपुर चे. मूळ नाव: धरम देव पिशोरीमल! पाच भावंड! त्याचे काही स्मरण यात वाचायला मिळतात.
या पुस्तकाचा आणखी मुख्य भाग म्हणजे देव आनंद यांच्या विविध नायिका! या पुस्तकात केवळ मधुबाला नाहीत! त्या काळातील तमाम त्या नायिका आहेत,ज्यांच्या सोबत देव आनंद यांनी अभिनय केला ....रोमांस केला! नलिनी जयवंत, गीता बाली, कल्पना कार्तिक, मीनाकुमारी निम्मी, उषा किरण, शकीला नूतन वैजयंती माला, वहिदा रहमान, माला सिन्हा, बेबी नंदा, आशा पारेख, साधना मुमताज झीनत अमान, हेमामालिनी या आणि अन्य काही नायिका आहेत. ज्यांच्या सोबत च्या देव आनंद यांच्या आठवणी आणि किस्से आहेत.*
द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखणीचे दिवाणे लाखो!क्रिकेट आणि सिनेमा हे त्यांचे क्षेत्र!देव आनंद जणू त्यांचे दैवत!देव आनंद या जगात आता स्मरण रुपात आहेत हे त्यांना लक्ष्यात देखील राहत नाही...त्यांच्या भावनिक आणि मैत्रीपूर्ण सहवासातून निर्माण झालेलं हे लिखाण!अतिशय तरल पण संवेदनशीलपणे हे लिखाण केलं आहे.

0 

Share


Pravin Wadmare
Written by
Pravin Wadmare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad