Bluepad | Bluepad
Bluepad
हाफ तिकीट
Amol Shitole
Amol Shitole
14th Jul, 2023

Share

माननीय महोदय...
मुखमंत्री साहेब
पत्रास कारण कि महिलांना केलेलं हाफ तिकीट
मुख्यमंत्री साहेब तुमी हाफ तिकीट केलेत आम्हाला त्याच दुःख नाही तुमी महाराष्ट्राचे मुखमंत्री आहात तुमी जो निर्णय घेतलात तो सर्व बाजूनी विचार करून घेतला असाल पण साहेब तुमी हाफ तिकीटचा विचार केलात तेव्हा वडापवाले ज्याचा हातावर पोट आहे त्याच काय होईल ते जेव्हा सकाळी पहाटे उठून आपल्या मुलांचा बायकोचा आई वडिलांनाच विचार करून बाहेर पडतात आज आपण नाही गेलो तर ते काय खातील पण जेव्हा संद्याकाळ होते आणि खिशाकडे हात जातो तेव्हा साहेब सकाळी मुलाने सांगितलेलं मला शाळेत जायला दप्तरं हवं आहे ते आठवत
बायकोने कालवणाला भाजी आणायला सांगितलेली आठवते वडिलांनी गोळ्या आणायला सांगितलेल्या आठवतात आणि आईने आणायला सांगितलेलं तिला आवडणार बिस्कीट हे सगळं संद्याकाळ होते आणि समोर येत ना साहेब डोळ्यातून आपोआप पाणी येत साहेब हे एवढं असून त्यात गाडीचं आलेला हफ्ता यांचा कुठे मेळच बसत नाही साहेब बऱ्याच वेळा विचारही येतो कि बस झाल जगणं मरावं पण काय करणार तेव्हा आठवतो तो हा मांडलेला परपंच्या खेळ......
आम्हाला आनंद आहे तुमी बायकांचा विचार करून हाफ तिकीट केलंत पण त्या अगोदर तुमी वाढलेला पेट्रोल डिझेल याचाही विचार करायला हवा होता बर केलेत ते केलंत पण सरसकट तरी करायला हवं होत आणि प्याट्रोल डिझेल जे भाव कमी करायला हवं होत आम्ही महाराष्ट्रातील सर्व वडापा वाल्यानी आपले उपकार मानले असते मनातून हे उपकार कदाचित विसरू ही शकलो नसतो पण आपणास काय साहेब सगळ्या जनतेचा विचार करायचा....
आम्ही वडापवाले काय आजचं दिवस रडत काडू उद्या नव्याने नव्या आशेने पुन्हा येऊन नाक्यावर उभे राहू कल नाही नेहू शकलो आज तरी नेहू मुलांना दप्तरं वडिलच्या गोळ्या कालवणाला भाजी....
पुन्हा संद्याकाळ झाली पुन्हा तीच नाराजी सांगा साहेब आम्ही आता काय करू आपला हा खेळ कधी बंद होणार होणार कि नाही हे ही सांगा आम्ही दुसरा उद्योग करण्याचा विचार करू पण पुन्हा तोच प्रश्न उधोग्य करायचं म्हंटल कि भांडवल लागणारच मग कोणाकडे हात पसारायचं..
शेती करावी तर मालाला भाव नाही शेती करण्यासाठी सावकारकडून घेतलेलं कर्ज पण फिटत नाही साहेब सांगा आम्ही कस जगू
माननीय महोदय मुख्यमंत्री साहेब तुमी आम्हा सामान्य जनतेचा विचार करून निर्णय द्यावा खास करून आम्ही वडापवाले
आपला विश्वासू सामान्य शेतकरी वडापवाला
अमोल शितोळे ✍️

1 

Share


Amol Shitole
Written by
Amol Shitole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad