आज वैशाली नाईक लिखीत आणि केदार शिंदे दिग्दर्शीत "बाईपण भारी देवा" सिनेमा पहाण्याचा योग आला..आला कसला तो कसाबसा जुळवुन आणला... एरवी घरातील यापेक्षा कठीण काम लिलया सहजपणे पार पाडणारी "ती" आणि खास सिनेमासाठी स्वतःला वेळ काढणारी "ती". ..यातच बाईपण भारी देवा हजारदा तरी मनात आलच.. आज हीला जमतंय तीला आज जमत नाहीय.. एक ना अनेक.. हा सिनेमा पहाताना प्रत्येक व्यक्तीरेखा जणु मीच हे पदोपदी जाणवत राहीले.. प्रत्येक क्षणी अंतर्मुख करणारी प्रत्येक व्यक्ती रेखा.. साधना अशीच धावपळ करत आफिस गाठणारी, सदा घरात मर्जी सांभाळणारी, आपल्या कलागुणांना दफन करणारी..,तर मुलाची परदेशातील मैत्रीण बघुन काहीशी खट्टु होणारी पल्लवी, आणि पन्नासाव्या वर्षी दुसरा डाव मांडणारा जोडीदार.. या विचाराने कोसळणारी, प्रयत्न पुर्वक खिंड लढवणारी आणि नंतर मात्र सत्य ठामपणे स्विकारून स्वतः मधील कस्तुरीला ओळखुन मार्गस्थ होणारी पल्लवी.., नवर्याच्या मैत्रीणीला मेकअप बाक्स देणारी पल्लवी आणि त्यावेळेसचा संवाद चटका लावुन गेला..नवर्याने आपली केलेली शुन्य किंमत बघुन कमावते नसल्याचे शल्य मनात बाळगणारी केतकी, जयाच डिप्रेशन मनाला खुपच भिडले, शशीच कायम नंबर वन असण्याची आसक्ती.. दिपा परब ची भुमिका आणि संवाद मनाला चटका लावुन गेले..सगळाच भार स्वतः च्या अंगावर घेऊन चौफेर लढणारी आणि पुरुष असुनही घरात गेम खेळत टाईमपास करणारा जोडीदार चीड आणणारा वाटला.. आपण आणि आपल्या आजुबाजुला असणार्या स्त्रीया तरी यापेक्षा वेगळे काय करतो..मेनोपॉज चा काळ आणि त्यावेळी घडणारे शारीरीक स्थित्यंतरे कुठे कोण लक्षात घेतो.. वेड्यासारखं धावत असतो...अगदी क्षणाचीही ऊसंत न घेता दुर्लक्ष करतो... डिवोर्स पेपरवर सही झाल्यानंतर चे पल्लवीचे संवाद हळवं आणि कणखर संमिश्र भावना देऊन गेले.. स्वतः साठी थोडंतरी जगायलाच हवं हे मात्र मान्य.. केदार शिंदे यांच्या कडे खुप संवेदनशील मन असावं त्या शिवाय का ईतके बारकावे टिपलेत त्यांनी.. स्त्रीचा कणखरपणा, सोशिकपणा, हळवेपणा, त्याग काय नी किती सांगु.... थोडक्यात काय तर स्त्री म्हणुन स्व अस्तित्व आपले आपणच जपावे...हजार कौशल्य लाभलेली कस्तुरी स्वतःलाच विसरते ईतके झोकुन देणे बरे नव्हे...( सोडी सोन्याचा पिंजरा) साधनाचे हे गाणं किती चपखल.... "बाईपण भारी देवा" श्लेश अलंकार म्हणजे अर्थातच भारी म्हणजे जड करायचे की "भार्री" बनवायचे हे ज्याच त्यानेच ठरवावं...👍