बस तुझा खांदा हवा
हातात हात गुंफून तुझ्या सोबतचा
लोकल मधला प्रवास हवा
मंद झुळूक येता, डोकं टेकायला
बस तुझा खांदा हवा
उसळणाऱ्या लाटांनाही जसा
शांत समुद्रकिनारा हवा
धावपळीच्या जीवनातल्या
एखाद्या निवांत संध्याकाळी
तुझ्या सहवासात स्वप्नरंजन करताकरता
समुद्र किनाऱ्याच्या वाळूवर विसावा घेण्या
बस तुझा खांदा हवा.
कधी झाले ओझे मनावर
झाले कधी अश्रू अनावर
बांध तुटता ,भावनेचा पूर येता
धीर देण्या, आधार देण्या
बस तुझा खांदा हवा