*संयम नसेल तर प्रचंड विद्वत्ता देखिल निरुपयोगी ठरते*
ज्ञान गुण , गुणवत्ता विद्वत्ता हे तेव्हा उपयोगी ठरत जेव्हा आपल्याकडं पराकोटीचा संयम असतो .संयमा शिवाय सगळं व्यर्थ आहे.जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी संयम असणं अंत्यंत आवश्यक असतं .संयमित जीवन तर स्थिर समाधानी आयुष्य आणि असंयमित जीवन अस्थिर ,असमाधानी जीवन म्हणुन संयमाची जीवनातील भुमिका निर्णायक असते. विद्वत्ता, बुद्धिमत्ता, गुणवत्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात असुन देखील संयम नसेल तर हिच बुद्धिमत्ता निरूपयोगी ठरते.संयम हे जीवनातील उत्कृष्ट बळ आहे . तसेच यशस्वी जीवनाचा पाया असुन मुख्यत्वे जीवनातील प्रगतीचे पहिलं लक्षण संयम आहे .मन, बुद्धी, विचार या मध्ये संयम निर्माण झाला तर जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रातील यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना यशोशिखरावर पोहचण्या पासुन आपल्याला कोणतीही भव्य दिव्य शक्ती रोखु शकत नाही.महणुन संयम हे जीवनातील ब्रह्मअस्त्र तर आहेच पण उत्कृष्ट असं बळ देखिल आहे.ज्या मुळे आपण अशक्यालापण शक्य करू शकतो. त्याचा वापर आपण ज्या पद्धतीने करणार त्या पद्धतीने परीणाम आपल्याला पाहायला मिळणार म्हणून संयम गुणवत्ता आणि विद्वत्ता यांचा संगम असेल अथवा हे गुण एकत्र असतील तरच यशोशिखरावर पोहचण्यासाठी असणारा दिव्य असा मार्ग निश्चितच आपल्यासाठी खुला होईल या मध्ये शंका नाही.
साधारणतः पृथ्वीवर जन्मला आलेला प्रत्येक व्यक्ती हा जवळपास सारखाच गुणवान, विद्वान असतो .परंतु आपल्या गुणवत्ता आणि विद्वत्ता आपण कोणत्या कार्यासाठी वापरतो त्यावर आपलं व्यक्तिमत्त्व ठरत आणि त्यावरच त्याच महत्व अवलंबून असतं. गुणवत्ता आणि विद्वत्ता याला जर संयमाची जोड आपण देऊ शकलो तर आपलं जीवन यशस्वी आणि उन्नत, प्रगत, होणार त्याच बरोबर आपला नावलौकिक होईल या मध्ये काही संदेह नाही . तसं पाहिलं तर बुद्धी हि निसर्गतः सगळ्यांना सारखीच प्राप्त होत असते . शारीरीक पातळीवर थोडाफार अंशतः बदल शरिर रचनेत, चेहरा, उंची या मध्ये आपसुकच असतो.निसर्गाने देताना प्रत्येकाला सम प्रमाणात सर्व शारिरीक बाबी वाटप केल्या आहेत .या मध्ये कुठेही फार भेदभाव केला नाही.अपवादाने काही व्यक्तिंना एखाद्या अवयव कमी जास्त प्रमाणात असतोच . कुणाला ऐकायला येत नाही .कुणाला दिसत नाही. तसेच कुणाला बोलता येत नाही.तसेच एखाद्याला एखाद्या अवयव नसेलही मात्र प्रत्येकाला मेंदू आणि बुद्धी हि सर्वांना सम प्रमाणात निश्चितच दिलेली आहे.मेंदू मधील रचना घटक जवळपास सारखेच आहेत परंतु त्या मेंदू चा वापर आपण ज्या पद्धतीने करतो . त्यानुसार आपली विद्वत्ता ठरतो .आणि विद्वत्ता गुणवत्ता आणि संयम एकत्र असेल तर यशाचा त्रिवेणी संगम साधणारच या मध्ये शंका नाही. महणुन प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड अशी विद्वत्ता आणि गुणवत्ता असते च परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हि संयम आहे .आणि हा संयम प्रत्येकाकडे सारखा असेलच असे नाही .गुणवत्ता आणि विद्वत्ता प्रचंड असूनही संयमा शिवाय यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येत नाही.जगातिक पातळीवर सामाजिक स्थिती अवलोकन केले तर आपसुकच लक्षात येईल कि विद्वत्ता, आणि गुणवत्ता प्रचंड असली तरही संयम नसेल तर अपयशाचा सामना हा निश्चितच करावा लागतो .वास्तविक गुणवत्ता विद्वत्ता आणि सयंम हा त्रिवेणी संगम ज्याच्याकडे आहे .तो सदैव यशोशिखरावर असतो. यशा पर्यंत पोहचण्यासाठी फक्त गुणवत्ता आणि विद्वत्ता असुन चालत नाही .तर उच्च पराकोटीचा संयम खुप आवश्यक आहे.जीवनातील कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक निर्माण करण्यासाठी अथवा यशस्वी होण्यासाठी आपला संयमच आपल्या कामी येतो . काला , क्रीडा, संस्कृती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, नोकरी, रोजगार स्वयंरोजगार, यापैकी कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यशोशिखरावर गाठायचे असेल किंवा आपलं नावलौकिक करण्याचा आपला मानस असेल तर गुणवत्ता, विद्वत्ता, आणि संयम हा त्रिवेणी संगम हा अंत्यंत आवश्यक आहे . ज्याने संयमवार विजय मिळवला त्याच्या साठी जगातील कुठलच विजय अशक्य प्राय नाही. गुणवत्ता, विद्वत्ता आणि संयम हा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी राजमार्ग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.महणुन जीवनात अलौकिक असं यश संपादन करयाचे असेल तर आपण आपल्या जीवनात संयमाची पराकाष्ठा केली तर कोणतंच यश आपल्या पासून दूर नसतं.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301