पहिल्या पावसात मी Train पकडत होतो
आणि ती AC train ची वाट बघत होती
थोडी घाईत होती पावसामुळे थोडी वैतागलेली दिसत होती
तिने black top aani blue जीन्स घातलेली होती
जरा उंच आणि देखणीच होती🥰
ती अगदी माझ्या समोरच्या platform वर होती
म्हणून माझी नजर तिथेच खिळून राहिली होती
दर पाच मिनिटांनी ती घड्याळाकडे बघत होती
तिची तशी चूक नाही म्हणा पावसामुळे train जरा late होती
आणि मला तर train येऊच नये असं वाटत होत
तिला बघत राहावंसं वाटत होत
तिने अचानक वर बघितलं आणि हृदयाचे ठोकेच वाढले
मी तिला बघतोय हे तिला कळत तर नाही ना ? म्हणून मी पटकन खाली बघितली
आणि मी जसं वर पाहिलं तस समोर AC Train दिसत होती
ती दिसेनासी झाली त्या दिसापासून माझे डोळे तिलाच शोधतायात.
तो पाऊस माझ्या आठवणीत राहिला
हे मात्र नक्की
Gulshan D.Bhagat