आयुष्यभर चालत राहिल आठवणींचाच खेळ
जिवंत असताना द्यावा एकमेकांना थोडा वेळ
किती आले किती गेले ना चुकले कोणाला मरण
असेपर्यंत फोन करा नंतर मोबाईलचेही हस्तांतरण
विलाप करून जरी एक केले धरती आणि अंबर
जीव गेल्यावर निरूपयोगी मोबाईल मधला नंबर
अनिश्चित हे जीवन,आत्मा जणू पाण्याचा बुडबुडा
कितीही किंमत मोजून मिळणार नाही वेळ थोडा
स्थावर जंगम इथेच राहिल ज्याच्यापाठी व्यर्थ धावतो
वेड लागले तरीही नंतर गेलेला माणूस कुठे गावतो?
सांगता येत नाही,सहनही होत नाही असे होतील हाल
व्यक्त होऊन मुक्त व्हा अन्यथा कायम मनी राहील सल