शब्दावाचून तुला कळावे.....
शब्द. तिला शब्दांची खूप आवड आहे. शब्द तू किंवा ती ओळखून पहावे. शब्दा वाचून तुला कळावे. शब्द हे असे आहे की कधी कधी न बोलता ही समजावे. शब्दा वाचून तुला कळावे. शब्द हे बोलायला शिकवतात तर शब्दांमधले अर्थ हे जगणे शिकवतात.
गूज मनीचे या लपलेले शब्दां वाचून तुला कळावे, उधळूनी दे मनात लपलेले सगळे. शब्दावाचून तुला कळावे. जे शब्द सांगून कळत नाही ते शब्द लिहून दिले तर जास्त लवकर कळतात. हृदयाला लागतात. जिथे आपण सांगून थकतो तिथे शब्दांचे अथांग पहाड एका कागदावर तयार केले तर त्याचा प्रभाव समोरच्याचा मनावर जास्त बिंबवतो. शब्दावाचून तुला कळावे, न बोलता आता.
माझे तुझ्या वर प्रेम आहे हे शब्दांमधून बोलून दाखवायची गरज नाही, ते तुला न बोलता समजावे. शब्दावाचून तुला कळावे, प्रेम हे गंध पुष्पांचे. प्रत्येक शब्द हा प्रेमाचा असावा. बोलतांना शब्द हे नेहमी प्रेमळ असावे. प्रत्येक शब्दांतून प्रेम निघावे, ओसरत्या लाटांवरती प्रेमाचे कमळ राहावे, शब्दांवाचून प्रेम कळावे.
तू असशील जिथे कुठेही, शब्द असेल माझे फक्त तुझा साठी, का गेलीस तू दूर इतकी, राहील माझे अबोल प्रेम फक्त आणि फक्त तुझा साठी. शब्दांतूनी जरी कळले नसले तरी शोधावे प्रेम माझ्या मनातुनी, शब्दावाचून प्रेम कळावे गूज मनीचे या लपलेले, शब्दावाचून प्रेम कळावे.......
निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती
९९२२६१३००१.