Bluepad | Bluepad
Bluepad
अलक: अती लघु कथा
सौ.मेघा नांदखेडकर
सौ.मेघा नांदखेडकर
13th Jul, 2023

Share

❤️अलक ❤️(१)...............
"कोणी मुक्या प्राण्यांना त्रास देत असेल तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते "
चिकन बिर्याणीवर यथेच्छ ताव मारत तो बोलत होता.
❤️अलक ❤️(२)................
सोळा शृंगार करून वडाच्या पुजेला निघालेली डॉ.सावित्री मांजर आडवी गेली म्हणून चिडून दहा पावले मागे फिरली,"या मांजरीला पण आत्ताच वेळ मिळाला"
त्यावर तिच्या मुलीने विचारले,"आई,तुला तरी कसली घाई झाली आहे? "
"अग,पुजा आटोपून मला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमासाठी जायचे आहे,प्रमुख वक्त्या म्हणून."
❤️अलक❤️ (३).................
वृद्धाश्रमात मरणासन्न आईने मुलाला शेवटची इच्छा सांगितली,"वृद्धाश्रमासाठी फॅन आणि फ्रिज डोनेट कर"त्यावर मुलगा म्हणाला"आता कशाला?"
"अरे,मी शिळ अन्न खाऊन,गर्मीत दिवस काढले पण न जाणो उद्या तुलाही इकडे रहाव लागल तर तुला त्रास नको "
❤️अलक❤️ (४)................
शेतात उन्हात राबणा-या मुलाला पाहून म्हातारीचा जीव कासावीस होत होता.कित्येकदा आवाज देऊनही तो ऐकत नव्हता, तेव्हा म्हातारीने जवळ खेळणा-या नातीला उन्हात नेऊन ठेवले,ते पाहताच मुलगा धावतच तिला घेऊन सावलीत आला.
❤️अलक ❤️(५)......……......

1 

Share


सौ.मेघा नांदखेडकर
Written by
सौ.मेघा नांदखेडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad