Bluepad | Bluepad
Bluepad
🙏🏾
नाम नहीं बताऊंगा
नाम नहीं बताऊंगा
13th Jul, 2023

Share

13जुलै 2023.
मित्रांनो मी आता माझ्या सोबत घडलेल्या एक दोन महिन्या पूर्वीच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. एक महिन्या पूर्वी मी ठीक होतो पण मन स्थिर नव्हतं. मला सारखं भोर सोडावंसं वाटत होतं आणि बाहेर जावं असं वाटत होतं. पुढे काय झालं मी ठरवलं काही झालं तरी भोर सोडायच मग मी रूम खाली केली.
गावी गेलो आणि आता परीक्षा देऊन मुंबई ला जायच असं ठरवलं. मुंबई ला गेल्यावर परत काय यायच नाय. कायतरी करून दाखवायचं असं खूप ठरवू लागलो. खूप विचित्र वागत होतो कोणताच निर्णय विचार करून घेत नव्हतो. मग गेलो मुंबई ला. पण तिथे गेल्यावर समजलं आपण जास्त दिवस नाय राहू शकत थोडे दिवस मित्रांसोबत timepass केला. आणि मग काय परत फिरलो पुन्हा टेन्शन आल आता काय करायच कुठे जायच मग पुन्हा नवीन स्वप्न सुरु पुण्याला जाऊ तिथे सेट होऊ आस करू तसं करू. मग मुंबई वरून पुण्याला पुन्हा आशेने गेलो तिथे गेलो तर समजलं इथे तर नाहीच टिकू शकत. लगेच तिथून निसटलो.
पुन्हा नवीन ठिकाणी जायचं ठरवून निघालो. अर्ध्यात गेलो आणि पुन्हा मन बदललं. पुन्हा मागे फिरलो आणि डायरेक्ट गाव गाठलं. गाव गाठलं आणि आजारी पडलो. तसं बघितलं तर मी हरलो पूर्ण पणे काय काय ठरवून गेलो होतो सगळं मातीत गेलं आणि मी हरलो.
या प्रवासात मला खूप त्रास सहन करावा लागला. प्रवास बघा. मुंबई -सानपाडा -पुणे वारजे -कर्वे नगर. एक दिवस.
Next day कर्वे नगर -वारजे -कात्रज. कात्रज ला गाडीत बसलो पण गाडीच लवकर निघेना खूप कंटाळा आला. आणि निघाली तर ट्रॅफिक 😭. त्यात गाडीत गर्दी.-शिरवळ, शिरवळ वरून बारामती ला जाणार होतो पण माझं मन बदललं. आणि पुन्हा मागे फिरलो. शिंदेवाडी फाटा. तिथून गाडी वडगाव. तिथून भोर.भोरला खूप वाट बघितली पण गाडी काय येईना. मग एक ओळखीचा भेटला त्याच्या bike वर निगुडघर ला भिजत तिथे च मेन आजारी पडलो. मग निगुडघर ला गाडीची खूप खूप वाट बघितली 5 वाजे पासून 7 वाजेपर्यंत वाट बघितली खूप पाय दुखतं होते मग बसलो st त मग शिरगांव ला आलो. रात्रीचे साडे आठ वाजले होते पूर्ण अंधार.तरीही चालत निघालो.मित्राला बोलवलं तो काय लवकर येणार नाय हे माहित होतं म्हणून चालत निघालो भयंकर जागेतून जात होतो पण भीती वाट
नव्हती कारण आयुष्य च एवढ्या प्रॉब्लेम मधून जात होतं कि याची भीती नव्हती राहिली. मग भीती वाटू नये म्हणून मित्राना फोन लावत बोलत बोलत अर्ध्यात गेलो मग तो मित्र आला bike घेऊन. मग घरी पोचलो.

0 

Share


नाम नहीं बताऊंगा
Written by
नाम नहीं बताऊंगा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad