रिमझिम नाऱ्या पावसात तू भिजावे,. छत्री बनून मी तिथे असावे,.. पावसाला साथ मिळते जशी निसर्गाची. तशीच सोबत असूदे, तू तुझ्या आणि माझ्यातल्या,. आपल्या त्या निर्मळ मैत्रीची,..
गंध ही येऊ दे, त्या फुलाचा आणि सुगंध ही दरवळू दे,. आपल्यातल्या ,निस्वार्थ मैत्रीचा,. आपण इकडचे ,तिकडचे सर्व काही विसरुनी बोलत बसायचं ,. भान हरपून मग एकमेकात गुंतून बसायचं
रिमझिम नाऱ्या पावसात थोडं लहान च होऊन जगायचं ,. कधी नाचायचं तर कधी,. चिखलात खेळायच. या रिमझिम नाऱ्या पावसात, थोडं भिजायचं,..
झळ झळ नाऱ्या झऱ्यासारखी आपली ती निखळ मैत्री असावी. या ओल्या चिंब पावसात मैत्रीची ती एक आठवण असावी पावसाच्या सरी सारखे ते., क्षण. आपल्या नेहमी आठवणीत राहावे.
या ओल्या चिंब पावसात ते,. क्षण आपण आनंदाने साजरे करावे,. रिमझिम नाऱ्या पावसात तू भिजावे मी छत्री बनून तिथे असावे,.. या हिरव्या गार निसर्गात आपल्या,. निर्मळ मैत्रीचे मोल असावे,..
पावसात आनंदाचे क्षण आपण दोघांनी मिळून साजरे करावे,. या रिमझिम नाऱ्या पावसात तू भिजावे. तर कधी पावसात भिजत चालत जावे. तर कधी, रिमझिम नाऱ्या पावसात. गाडीवरून फिरावे,....
या हिरव्या गार निसर्गात आपल्या आठवणी चे ते क्षण निर्माण करावे,. रिमझिम नाऱ्या पावसात तू भिजावे. छत्री बनवून मी तिथे नेहमी ,. तुझ्या सोबतिला असावे,....
कु. रुचिता विलासराव निकम. रा. तळणी (मोर्शी) ता. मोर्शी जिल्हा अमरावती.