Bluepad | Bluepad
Bluepad
समुद्रातील नौके प्रमाणे जीवन असलं पाहिजे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
13th Jul, 2023

Share

*समुद्रातील नौके प्रमाणे जीवन असलं पाहिजे*
संसारात राहून मन निर्विकार ठेवणं तितकंस सहज सोपं नाही हे वास्तव आहे पण अशक्य नाही .म्हणून प्रयत्न केला तर मन निर्विकार ठेवता येत.ज्या प्रमाणे नौका पाण्यात असुन पाण्यापासुन अलिप्त असते अथवा अथांग समुद्राचे पाणी नौकेत प्रवेश करत नाही त्या सारखंच मानवी जीवन देखील असलं पाहिजे. आपण संसारात असताना देखिल स्वतःला संसारापासुन अलिप्त ठेवता आलं पाहिजे.संसारात अलिप्त असणं म्हणजे मोह,माया ,भौतिकता या सोबतच कोणत्याही बाबी विषयी आपल्या मनात आस नसली पाहिजे. अथवा असक्ति निर्माण नाही झाली पाहिजे. अगदी साक्षी भाव ठेवून संसारात वावरता आलं पाहिजे. ज्या पद्धतीने समुद्रात आपल्या धेय्य मार्गावर प्रवास करताना नौका डगमगत नाही.पैलतीर पोहचण्यासाठी अनेक वादळांशी झुंज देते पण माघारी फिरत नाही. अथवा आपली दिशा बदलत नाही पैलतीरावर जाणं हाच अंतिम निश्चय असतो .हा निश्चय पुर्ण होत असताना अनेकदा संघर्ष देखिल वाटायला येत असतो.याच संघर्षाला न घाबरता अनेक वादळांवर संकटंवर अडचणीवर मात करत ज्या प्रमाणे नौका कोणत्याही परिस्थितीत पैलतीरावर पोहचतेच त्या प्रमाणे अगणित संकटांवर मात करत आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत यशस्वी पणे पोहचता आलं पाहिजे .मन बुद्धी हि शरीर रूपी नौकेचे नावाडी असल्याने अनेक वेळा वादळानुसार भ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण अट्टल निश्चय पैलतीर हाच असला पाहिजे.पाण्यामध्ये असणारी नौका ज्या प्रमाणे पाण्यात असुन सुद्धा नौकेत पाणी प्रवेश करू शकत नाही. आणि नौका आपला जो नियोजित प्रवास आहे तो अनेक वादळांना तोंड देत योग्य पद्धतीने कुठल्याही संकटा शिवाय पुर्ण करते . त्याच प्रमाणे आपण सुद्धा मानवी जीवन जगत असताना व या माया रूपी संसारात वावरत असताना मोह मायेच स्वार्थाच,लोभाच वादळ आपल्या आजूबाजूला घोंगावत असतं पण आपण त्याला बळी न पडता संसारातील अनेक बाबींपासुन स्वतःला सुरक्षित ठेवल पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणार भौतिक मायारूपी पाणी हे आपल्या संसार रूपी नौकेत मध्ये प्रवेश करू शकले नाही पाहिजे. तसेच बाह्य वातावरणाचा तसेच भौतिक जगाला आपल्या मध्ये प्रवेश करू दिला नाही पाहिजे. म्हणजे आपलं जीवन हे नौके प्रमाणे असावं आपण पाण्यांत चालणारी नौका पाहिली तर एक बाब प्रकर्षाने जाणवते नौकेचा थोडासाच पृष्ठभाग पाण्यात असतो . आणि वरच्या बाजुचा बहुतांश भाग हा पाण्यावर तरंगतो म्हणजे नेमके काय तर पाण्यावर समतोल साधण्यासाठी जे काही कला कौशल्य अथवा कालागुण आवश्यक आहेत. ते काला गुण नौकेने ने आवगत केले आहेत . जेव्हा पाण्यावर तरंगत प्रवाहाच्या दिशेने नौका हळूहळू मार्गस्थ होते आणि आपल्या नियोजित मुक्कामाचे असणारे शेवटचे ठिकाण गाठते . त्याच प्रमाणे मानवाने सुद्धा आपली जीवन रुपी नौका हि अशाच पद्धतीने मायारूपी पाण्यात तरंगायला हवी . जेणेकरून आपण मायारूपी जगात जीवन जगत असताना विविध साधनांचा वापर हा आपल्या विकासासाठी करून घेतला पाहिजे. परंतु हा वापर करून घेत असताना आपल्याला निरपेक्ष भावनेने पुढे जाता आलं पाहिजे. आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे .याच प्रवासा दरम्यान पोहोचत असताना या संसारिक माया व भौतिक गोष्टींना आपल्यामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही.हेच महत्वाचे आहे जसं पाण्यात चालणारी नाव ही आपल्यामध्ये समुद्रातील अथांग पाणी शिरू देत नाही. त्याच प्रमाणे संसाराच्या पैलतीरावर जात असताना मायारूपी शक्ती चा प्रवेश आपल्या मध्ये झाला नाहीच पाहिजे .पाण्यात चालणार्या नौकेत जर पाणी शिरले तर ती बुडण्याची दाट शक्यता असते नव्हे ती बुडणारच हे ञिकाल सत्य असतं .त्याच प्रमाणे संसार रुपी जीवनामध्ये जगत असताना त्या मध्ये मोहमाया सिरली तर संसार रुपी नौका हि देखिल नक्कीच बुडल्याशिवाय राहत नाही .आणि त्यामुळे जीवनातील मुक्ती चा प्रवास हा त्याच ठिकाणी थांबतो. हा प्रवास थांबवायचं नसेल आणि आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल तर जीवन हे पाण्यात चालणाऱ्या नौके प्रमाणे असलं पाहिजे .आणि नियोजित ठिकाणी ज्याप्रमाणे नौका पोहचते त्याच प्रमाणे आपल्याला आपल्या जीवनातील सर्व जबाबदारी कर्तव्य पुर्ण करुन पार पाडुन योग्य ठिकाणी पोहचता आलं पाहिजे .आणि आपल्या जीवनातील मुख्य धेय्य हे देखील आपल्याला साध्य करता आलं पाहिजे. त्या साठी आपल जीवन समुद्रातील नौके सारखं असलं पाहिजे.जे आपल्या अंतिम धेय्या साठी समर्पित असतं.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad