किती विसरावे म्हणतो तुला विसरता येत नाही रे
हळव्या मनाचे घाव कोणा दाखवता येत नाही रे
अजून सुचाव्या कविता तुझ्या माझ्या विरहाच्या
कवितेच्या ओळींत तुझं रूप मांडता येत नाही रे
किती पुरावे देऊ आता सांग तू शेवटच्या भेटीचे
त्या क्षणांना आठवून तुझ्याशी भांडता येत नाही रे
असा कोणता गुन्हा केला मी उध्वस्त सारं केलंस तू
डोळ्यांचं दुःख पापण्यांना ही दाखवता येत नाही रे
कोणी केलं दार उघडल मयत तुझ्या दारात असतांना
तुला पाहून कोणाला देहावर फुलं उधळता येत नाही रे