Bluepad | Bluepad
Bluepad
तहान
सौ.मेघा नांदखेडकर
सौ.मेघा नांदखेडकर
12th Jul, 2023

Share

येतात पळ जातात पळ
करून जातात नुसता छळ
येतात क्षण जातात क्षण
लागत नाही कुठेच मन
येतात तास जातात तास
बळेच ढकलून घशाखाली घास
येतात दिवस जातात दिवस
कोणत्या देवाला करू नवस
येतात आठवडे जातात आठवडे
जातात तडे उठतात ओरखडे
येतात पक्ष जातात पक्ष
लागत नाही कशातच लक्ष
येतात मास जातात मास
जीवाला फक्त एकच ध्यास
येतात वर्षे जातात वर्षे
जीवनात कुठे ना हर्ष
येते जीवन जाते जीवन
साठवते मनात एक आठवण
येते स्मरण जाते स्मरण
कोणासाठी झुरते हे मन
झुरल्या डोळ्यात भरली तहान
आत्मा पडला शरीरात गहाण

1 

Share


सौ.मेघा नांदखेडकर
Written by
सौ.मेघा नांदखेडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad