"0 पेशन्स ... दिपक तू पेशन्स शिकायला हवं. आपल्या करिअर मध्ये पेशन्स शिकनं फार महत्वाचं आहे." एका सिनियर कलिगने समजुतीच्या सुरात मला सांगितलं.
ह्या गोष्टीला जवळ जवळ 12 वर्ष झाली तेव्हा मी एक जुनिअर एडिटर म्हणून काम करत होतो. आणि आत्ता सिनियर एडिटर... तो सल्ला आजतागायत माझ्यासाठी एक अमृत म्ह्णून काम करत आहे. खरंच एक विडिओ एडिटर म्हणून काम करत असताना येणारं frustration, Anxiety, तुम्हाला आतून ऐव्हडं खचून टाकते की एक यशस्वी माणूस म्हणून उभं रहायला inspiration उरतचं नाही. आणि ही परिस्थिती फक्त माझ्या कामाशी निगडित नसून घरोघरी मातीच्या चुली म्हणावं लागेल. पण 12 वर्ष्याच्या अनुभवाचे बोल सांगायला झाले तर ऐव्हडंच सांगेन. "संयम" संयम एकच असा शब्द आहे जो तुम्हाला अगदी खाल पासून वर पर्यंत एक माणूस म्हणून मदत करतो.
संयम म्हणजे मनाची उच्चपातळीवरील अवस्था जी सहज रित्या साध्य करता येते पण एक माणूस म्हणून आपल्याला जी घाई असते ती घाई त्या अवस्थेला आपल्यापर्यंत येऊ देत नाही. थोडक्यात काय तर भरती येऊन गेल्यावर थोड्यावेळासाठी होणारी पाण्याची स्थिरता म्हणजे संयम, कुठे थांबावे, काय बोलावे , परिस्थितीचा विचार करून वागणे म्हणजे संयम.
वेळेचा आडोसा आपल्याला घाई शिकवतो पण तोच आडोसा संयमाची अशी सावली देऊन जातो की आपल्याला real जगाची ओळख करून देतो.
संयम, एक युद्ध आपल्या मनाशी
एक युद्ध आपल्या इच्छा, आकांक्षाशी
कधी भावनिक जगाशी, तर कधी स्वप्नी मानोऱ्याशी
ह्या युद्धात तू जिंकलास... तू खऱ्या अर्थाने जिंकलास