Bluepad | Bluepad
Bluepad
लहानपणा स्वीकारणं हेच वास्तविक मोठेपणाचा लक्षणं आहे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Jul, 2023

Share

*लहानपणा स्वीकारणं हेच वास्तविक मोठेपणाच लक्षणं आहे*
लहानपणा स्वीकारणं हा सर्व श्रेष्ठ गुण तर आहेच पण वास्तविक जो मोठा असतो तो नेहमी स्वतःला लघु समजतो हे मोठेपणा असणाराच खरं वैशिष्ट्य असतं. जगातील सगळ्यात अवघड व कठिण गोष्ट साध्य हिच आहे कि स्वतः ला लहान समजण्यासाठी फार कोणीही तयार नाही. मुळात स्वतःकडे लहान पणा घेऊन इतरांना श्रेष्ठ समजणं हेच ज्ञान गुण असण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. इतरांकडे पाहताना आपला दृष्टिकोन हा विशालकाय ठेवून पाहता आलं पाहिजे. इतरांच्या मध्ये आपल्याला सर्व उत्कृष्टच दिसलं पाहिजे त्यांचं बरोबर इतरांन कडे , असणारे सद्गुण , विद्वत्ता , मोठेपणा पाहण्याची दृष्टी, दिव्यता , शक्ति ,मनाचा मोठेपणा ह्या मध्ये निर्माण होणं हिच आपली खरी प्रगती असते पण आपण जीवनात हिच प्रगती करत नाहीत. जेव्हा हि प्रगती आपण करू शकु तेव्हा मात्र आपण जगातील सगळ काही मिळवलं असंच म्हणावं लागेल. तसं पाहिलं तर आजही आपल्या ग्रामीण भागात जुनी जानती माणसं या संदर्भात हत्ती होऊन लाकड फोडण्या पेक्षा मुंगी होऊन साखर खाता आली पाहिजे हा शब्द प्रयोग आवर्जून करतात. पण अनेकदा हे आपल्या डोक्यावरून जात. मुळात इतरांना मोठेपणा देणं हे उत्तम पुरुषाच लक्षण आहे. परंतु हेच उत्तम पुरुषांच लक्षण सध्याच्या युगात प्रत्यक्षात फार कोणीही आचरणात आणताना दिसत नाही. हि खुपचं खेदजनक बाब आहे. उलट पक्षी खोट्या आणि बेगडी प्रतिष्ठेसाठी भौतिक मोठेपणाची झुल पांघरूण खोटी प्रतिमा लोकमनावर बिंबवण्यासाठी व स्वतः चा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी अहोरात्र बैचेन , मग्न व्यस्त ,असलेली आणि भौतिक मोठेपणा हा जणुकाही एखाद्या आजार आहे. या पद्धतीने वावरताना दिसणारी माणसं सध्या आपल्या आजुबाजूला इतरत्र बहुसंख्य वावरताना दिसतात. हा वेळेचा काळाचा प्रभाव आहे. आणि म्हणून याच कालखंडात जर आपल्याला आपल्या लहान समजता आलं तर आपल्या साठी जगातील अशक्य असे कहीच नाही. आपल्या सोबत , सहवासात, आजुबाजूला,किंवा विरोधात कोणीही व्यक्ती समाज घटक असु द्या समोरच्याला मोठेपणा देऊन आपल्या स्वतः कडे लघुत्व घेण हे जीवनातील सगळ्यात मोठं कौशल्या आहे आणि हेच कौशल्य सगळ्यांकडे उपलब्ध आहे. परंतु त्याचा वापर कसा करायचा आहे हे मात्र व्यक्ती परत्वे वेगवेगळे भिन्न असल्यामुळे त्याचा परिणाम देखील तसाच येतो आहे. लघुतव हि चुंबकीय शक्ती आहे ज्यामुळे आपण अनेक शक्य नसतील अशा बाबी शक्य करू शकतो. त्याच बरोबर हि चुंबकीय शक्ति आपण योग्य पद्धतीने वापरली तर आपण जगातील कोणालाही आपल्या कडे खेचु शकतो पण तितका मनाचा मोठेपणा आपल्या कडे असला पाहिजे. आणि तो प्रकट झाला पाहिजे. वास्तविक सध्याचं युग हे भौतिक मोठेपणाला भुलेल अस जग आहे. असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. खोटा मानपान , प्रतिष्ठा या साठी लोक कुठल्याही स्तरावर जाण्यासाठी तयार आहेत असंच एकंदरीत वातावरण निर्माण झालेलं आपण पाहतोय. आणि सध्या जी परिस्थिती आपण अनुभवतोय याच्या मधुन एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती हि कि दुस-याला मोठेपणा बहाल करण्याचा मनाचा मोठेपणा आज लोप पावत चाललेला आहे. प्रत्येक व्यक्ती मी कशाप्रकारे मोठा आहे याचं विश्लेषण करण्या मध्ये तसेच दाखवण्यात मग्न आहे. त्यासाठी अनेक असे नानाविध प्रयोग देखिल करताना अनेक जण दिसतात तसंच इतर लोकांनी मला मोठं म्हटलं पाहिजे. माझी स्तुती केली पाहिजे. अशी जवळपास प्रत्येक व्यक्ती ची धारणा आहे. त्या साठी वाटेल ते करण्याची मानसिकता आहे. पण स्वतः कडे लघुतव ठेवण्याचे संस्कार आणि प्रवृत्ती खुप कमी लोकांच्या कडे दिसते आहे. आणि ज्याला स्वतः कडे लघुतव ठेवण्याचे कार्य जमलं त्याने जगातील सर्वकाही मिळवलं. लघुतव स्वतः कडे ठेवणं हि सर्वसाधारण गोष्ट नाही एक प्रकारची साधना तप आहे पण हे तप हि साधना ज्याला अर्जित करता येईल त्याला या सृष्टीवर दिव्य दृष्टी प्राप्त झाली. म्हणून ज्याच्या कडे हि शक्ती आहे त्याला या जगात ,सुख काय,दुःख , काय, वेदना, काय संकटं अडचणी समस्या,असणार नाहीत.उलट संबंध सृष्टी वरील शक्ति उर्जा त्याच्या साठी सकारात्मक असेल. आणि सृष्टीवरील कुठलही कार्य, कर्म निर्विघ्नपणे पुर्ण करण्याची ताकद शक्ती निर्माण होण्यासाठी स्वतः कडे लघुत्व ठेवता आलं पाहिजे. हि अद्भुत किमया साधली तर मग जगात आपल्यासाठी कोणतीही समस्या अडचण राहत नाही हे मात्र नक्की आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad