Bluepad | Bluepad
Bluepad
निवड चुकली तर पश्चात्ताप पदरी पडण निश्चित आहे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
11th Jul, 2023

Share

*निवड चुकली तर पश्चात्ताप पदरी पडणं निश्चित आहे*
निवड चुकली तर पश्चात्ताप पदरी पडण निश्चित आहे.योग्य वेळी योग्य मुल्यमापन हे यशस्वी जीवनाचे गमक असल्याने ते समजणं खुप आवश्यक आणि गरजेचे असत. मुल्यमापन चुकलं तर भविष्य हुकलं हे निश्चित आहे.आपली जीवनातील फसगत अनेकदा आपल्या मुल्यमापनावरच ठरतं असते म्हणून योग्य मुल्यमापन हेच बचावाचे ब्रह्म अस्त्र आहे.जसं दिसत तसं वास्तव नसतं म्हणून जग फस्त हे कटु आहे. पण हे सत्य कोणीही सहजासहजी नाकारू शकत शकत नाही. आयुष्य म्हटलं कि कि आपल्या संबंधित अथवा नजरेस पडणारया प्रत्येक बाबीच मुल्यमापन हे महत्वाचं असतं योग्य मुल्यमापन करता आल तर हित होत आणि मुल्यमापन योग्य झालं नाही अथवा मुल्यमापन चुकलं तर अहित निश्चित असत. आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती हा वरकरणी कसा अथवा अंतरयामी कसा आहे हे वेळीच ओळखता आलं पाहिजे . आणि हिच ओळख आपली फसवणूक अथवा उत्कर्ष ठरवते . वरकरणी दिसायला सारखेच असणारे सर्व घटक वस्तू अथवा व्यक्तित्व सारखेच असतील असं नाही दिसायला सारखाच असण म्हणजे आतुन तसंच असणं असं अनेकदा होतं म्हणून मुल्यमापन हे दिसण्यावर नसतंच म्हणून आपण त्याच मुल्यमापन कसं करतो त्यावर आपली प्रगती अधोगती, किर्ती,अपकिर्ती,हित अहित लाभ,हनी दुःख आनंद, वेदना त्रास अशा अनेक प्रकारचे फायदे तोटे अवलंबून असतात . म्हणून कोणत्याही परिस्थितीत मुल्यमापन चुकता कामा नये .दिसत तसं नसतं .हा नैसर्गिक सिद्धांत आहे.आपण कशाला काय समाजावे हे सर्वस्वी आपल्या स्वतः वर अवलंबून असते या संदर्भात कोणीही आपल्या वर कोणताही प्रत्यक्ष अ प्रत्यक्ष प्रभाव निर्माण करू शकत नाही .आपण आपल्या विवेका नुसारच मित्र शत्रु तात्कालीन परिस्थितीमध्ये निश्चित करतो . तदनंतर काही कालावधी नंतर मात्र या मध्ये बदल होऊन मित्राचा शत्रु व शत्रु चा मित्र होऊ शकतो .मग असं काय घडलं कि हा बदल झाला तर काही च घडलं नाही आपण सुरवातीला च मुल्यमापन करण्यात चुकलो होतो . गारगोटी हि गारगोटी च असते ती फक्त दिसण्या पुरती हिरा दिसु शकते या मध्ये शंका नाही परंतु गारगोटीला तिजोरीत ठेवले अगदी कुठेही ठेवले तरी हि गारगोटी हि कधीच हिरा होऊ शकत नाही. आपलच मुल्यमापन चुकत म्हणून आपण गारगोटी ला हिरा समजतो .जसं हिरा आणि गारगोटी हि दिसायला सारखीच असते परंतु फारक असतो तो मुल्यमापनाचा .तसंच आपल्या जीवनात येणार्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने अनेक लोक आपल्या संपर्कात येत असतात त्यातील काही लोक अगदी आपल्या मध्ये असणारे कलागुण वापरून तसेच वेगवेगळे प्रकार करून आपल्या खुप जवळ येतात परंतु ते आपल्या साठी हितकारक निघतील किंवा आपल्यासाठी लाभदायक असतीलच असं नाही किंबहुना नसतातच त्यापैकी काही लोक आपलं हित करतात तर काही आपलं प्रचंड नुकसान करतात म्हणून आपल्या संपर्कात येणा-या प्रत्येक व्यक्ती हा कशापदधतीचा आहे हे मुल्यमापन आपल्यला सुरवातीला समजणं खुप महत्वपूर्ण आहे.आपण आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्ती च मुल्यमापन करण्यात जर चुकलो तर मग मात्र आपलं आतोनात नुकसान होऊ शकत या नुकसानाला आपण जबाबदार असतो कारण आपली निवड चुकती निवड चुकली तर प्रायश्चित्त निश्चित असतं. वास्तविक हिरा आणि गारगोटी हि दिसायला सारखीच असते.पण फारक हा असतो तो हा मुल्यमापनाचा आणि चुकलं कि आयुष्य बराबाद होत . म्हणूनच मुल्यमापन हे खुप महत्वाचे आहे ज्याला मुल्यमापन कळलं त्याला जीवन समजलं आणि ज्याचं मुल्यमापन चुकलं त्याच आयुष्य बिघडलं एकंदरीत घडण आणि बिघडण हे मुल्यमापनावर अंवलबुन असत . म्हणून वेळ काळ परस्थिती हि कोणतीही असु द्या कशीही असु गारगोटी आणि हिरा दिसायला सारखाच असल्याने नजर धोका खाते . पण मुल्यमापन धोका खाऊ शकत नाही म्हणून योग्य मुल्यमापन करायला शिकलं पाहिजे. आपल्याला जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसं आपल्या संपर्कात वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतात त्यातील काही माणसांमुळे भविष्यात आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो किंवा आपलं कधीच भरून निघणार नाही असं नुकसान पण होऊ शकत . याचा अर्थ आपल्या संपर्कात येणारे सगळेच आपल्यला अहितकारक असतील असं नाही काही हितकारक सुद्धा असतील म्हणून आपल्यला योग्य मुल्यमापन करता आलं पाहिजे आणि योग्य मुल्यमापन करता आलं तर आपल्याला गारगोटी आणि हिरा हा फरक लक्षात येऊ शकतो आणि आपल्या जीवनातील होणा-या नुकसाना पासुन आपण आपल्या योग्य प्रकारे वाचवु शकतो. म्हणून आपलं हित व्हावं असं वाटतं असेल तर आपण योग्य योग्य मुल्यमापन करायला शिकलं पाहिजे
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक, मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad