*चित्त शुद्ध असेल तर जीवनात अशांती प्रवेश करत नाही*
सुख,समाधान, आनंद,हा प्रत्येकाला हवा आहे पण हेच समाधान,सुख आनंद हा मिळवण्यासाठी आपलं चित्त शुद्ध असल पाहिजे पण आपण मात्र महा विचित्र असतो. सुख पाहिजे पण चित्त मात्र शुद्ध नको असतं मग सुख, आनंद,शांती मिळेल कशी हाच जीवनातील गहण कठिण प्रश्न असतो आणि न उलगडणार कोड असतं.पण याच खुप सरळ साधं उत्तर आहे चित्त शुद्ध ठेवा आणि जगातील सर्वात सुखी व्यक्तिमत्त्व व्हा. जीवनातील शांती अशांती यांचा थेट संबंध हा आपल्या शुद्ध आणि सात्विक चित्ताशी असतो. आणि चित्त जर सात्विक असेल तर आपल्या जीवनात अशांती निर्माण होत नाही. सृष्टीवर असणाऱ्या अनेक जीव सजीवा पैकी मनुष्य हा एकमेव विद्वान प्राणी आहे पण मनुष्य, जितका , बुद्धिमान, शक्तिशाली, बलाढ्य आहे तितकाच तो अशांत सुद्धा आहे. साम्राज्य, सामर्थ्य निर्माण करणं वेगवेगळी साधन मिळवणं अथवा भौतिक साधन संपत्ती मिळवण म्हणजे मन शांती मिळेलच असं नाही कारण मन शांती हि धन संपदेवर अंवलबुन नसतं. सृष्टी वर जे काही सुख सुविधा आहेत त्या पैकी अंनत अशा नानाविध संपदा सुविधा आपल्याला मिळाव्यात म्हणून प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. जीवनात संघर्ष करून अथवा सहजगत्या अशा पद्धतीने अनेकदा बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला मिळतात देखिल तसंच अनेक अपेक्षा पैकी काही अपेक्षा ह्या सुटतात देखील म्हणजे काही मिळत तर काही सुटत असा हा निश्चितता अनिश्चितता यांचा खेळ असतो. याच खेळामुळे मनःशांती बिघडते मग मनःशांती हि चिरस्थायी ठेवण हि जीवनातील सगळ्यात सुलभ तसंच कठिण बाब आहे. परंतु प्रत्येक मनुष्य याच चिरस्थायी आणि सगळ्यात सुलभ बाब असणाऱ्या मनःशांती पासुन कित्येक कोस दूर आहे. हिच सध्याच्या युगातील दुर्मिळ बाब आहे. आणि तिथपर्यंत पोहचण्यासाठी मनुष्य जरी कितीही प्रयत्न करत असला तरी तो मुख्य आणि आवश्यक ते प्रयत्न करत नाही व दुसरेच प्रयत्न करत आपला वेळ वाया घालवतो. मनःशांती हि बाह्य जगात कुठेच सापडणार नाही भौतिक साधन संपत्ती या मध्ये तर नक्कीच नाही म्हणून भौतिक जगात मनःशांती मध्ये मिळणं हे दुर्लभ आहे.
आपल्या जीवनात चिर शांती नको असा कोणी हि व्यक्ती शोधून सापडणार नाही. शांती साठी मनुष्य जग भ्रमण करतो. कुठलाही उपाय पर्याय मनुष्य शिल्लक सोडत नाही. परंतु वास्तविक सत्य हेच आहे कि शांती हि बाह्य जगात सापडणारी किंवा कुठल्याही मुल्यावर विकत मिळणारी बाब नाही. तर ती आपल्या चित्ता मधील आंतरीक प्रकिया आहे. आणि त्या साठी सात्विक वृत्ती आवश्यक असुन आध्यत्मिक ज्ञान साठा जागृत विवेक असेल तर मनःशांती हि आपल्या अंतःकरणात असते. जर चित्त अशुद्ध असेल तर कुठल्याही किंमतीवर शांती मिळणार नाही. आणि जर आपल चित्त हे सुद्धा असेल तर कुठल्याही अटी शर्ती शिवाय अगदी सहजासहजी निःशुल्क मन शांती आपल्यला मिळेल प्राप्त होईल या मध्ये शंका नाही म्हणजेच शांती हि आपल्या चित्ता मध्ये निर्माण होणा-या महत्वपूर्ण भावापैकी एक आहे त्यावर अवलंबून असते आपल्या मनात सुद्धा चित्ता मध्ये जर सदभावना ,सदभाव निर्माण झाले तर मन शांती मिळेलच मात्र असुद्धा चित्त ठेवून मनात असक्ति हा भाव निर्माण झाला तर कितीही प्रयत्न केले तरी मनःशांती मिळु शकत नाही . सुद्धा चित्त आणि सदभावना ठेवणं हेच साध्याच्या विद्यमान युगातील सगळ्यात मोठी अडचण आहे समस्या आहे तसेच खुप मोठं आव्हान देखिल आहे. तर मग शुध्द चित्त कसं ठेवणार आणि मन शांती कशी मिळणार तर हे फार काही अवघड अस कार्य नाही यासाठी आपल्या मनात आणि जीवनात सात्विक वृत्ती निर्माण झाली कि आपोआप हे सगळंच घडत म्हणजे हे अख्खं जग विष्णू मय दिसत आणि आणि भौतिक मोह माया, लाभ नफा, मित्र, शत्रु एकसमान दिसतात वाईट काहीच दिसत नाही. आणि एकदा वृत्ती सुद्धा झाली कि आपोआप चित्त सुद्धा होत आणि मन शांती मिळते. यासाठी आध्यत्मिक ज्ञान हे सगळ्यात प्रभावी साधनं माध्यम या मार्गावर पोहचण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून आपल्या जीवनात मनःशांती नांदावी अशी इच्छा असेल असं वाटत असेल तर मग मात्र शुद्ध चित्त आपल्याला ठेवता आलं पाहिजे. आणि त्या साठी आध्यत्मिक ज्ञान मार्ग हाच सर्व श्रेष्ठ आणि उत्कृष्ट मार्ग आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, लेखक, साहित्यिक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301