#देह हाताळता आला पाहिजे.
प्रणयाइतकं भौतिक सुख कश्यात नाही.#शारीरिक स्पर्श मानसिक दुःखावरचं सगळ्यात प्रभावकारी औषध आहे.पण; तो स्पर्श जर नीट झाला नाही तर,तेच आयुष्यभरासाठी दुःखाच कारण बनून जातं! त्याच्या स्मृती चांगल्या नसल्या तर ते आजन्म आतून कोरडं करत जातं,
माणसाला.ह्यात दोष कोणाचा ? स्पर्श आपण करुन दिला म्हणून आपला की, ज्याला स्पर्श करू दिला त्याला तो करताच आला नाही योग्य रीतीने त्याचा ? ह्यात तरी आपला दोष नाही.भावनेची पूर्तता करणं काही गैर नाही.
हाती देह आला तर त्याला जपता आलं पाहिजे.
"एखादया संवादिनीतून निघणाऱ्या स्वरांचा आनंद घ्यायचा तर शांत डोळे मिटून त्यात तल्लीन होऊन घ्यावा लागतो. तिचे स्वर आवडले म्हणून का त्या संवादिनीला फोडून आतले स्वर चोरता येतात ? देहाचा उपभोग तसाच असतो. " हे हळुवार देहाचं एक एक वळण पार करत राहणं, आवेग वाढणं,
त्या त्या क्षणाचं मागणं पुर्ण करणं हे सारं ओघाने आलंच पण; त्याच्या आत एक भावना कायम प्रवाहित राहिली पाहिजे ती म्हणजे "जाणीवेची, सन्मानाची !" कोणीतरी त्याचा देह आपल्या हाती देतो तेव्हा त्याचा सन्मान जपता आला पाहिजे.
शांत मांडी घालून बसून जेवण्यात आणि कुत्र्यापुढे भाकर टाकल्यावर तो ज्या पद्धतीने त्यावर तुटून पडतो...ह्यात काही अंतर असाव का नाही ? ज्याला ह्यातलं अंतर कळत नाही त्याच्या हाती देह देऊ नये आणि आपल्याला ह्यातलं अंतर कळत नसेल तर हाती आलेला देह उपभोगू नये.
देहावर झालेला आघात मनावर फार काळ आपले परिणाम सोडून जातो. आपल्या एका चुकीच्या स्पर्शाचा परिणाम एखाद्याचं सबंध आयुष्य स्पर्शावाचून वंचित ठेवू शकतं.....
"हाती असलेल्या फुलांचा परिमळ त्यांना ने चुरगळता ही घेता येतो. स्त्री स्वतःहून देते तेव्हा आपण घेतो,
त्याहून शेकडो पटीने अधिक सुख ती देऊ शकते. पावसाच्या सरीखाली आपण केवळ उभा रहायचं असतं हात आभाळाकडे पसरून जमेल तितका कवेत घ्यायचा. इतकाच का पडला, तितकाच का पडला म्हणून आपल्या परिने पाऊस पाडता येत नाही. तीचं भोगणं तसं असतं. तिच्या देहाचा आणि मनाचा रस्ता स्वतःहून ती हाताला धरून दाखवत असते. तोवर संयम हवा...!"