एक चांगला लेख : भारतीय खाद्य संस्कृती व मसाले .
वेगवेगळ्या मसाल्यांमुळे जेवणाची लज्जत वाढत जाते. कुठल्याही जेवणाची
चव त्या पदार्थात टाकलेल्या मसाल्यामुळे ठरत असते. विशेष करून
महाराष्ट्रीयन जेवणामध्ये काळा मसाला वापरण्याची पद्धत आहे. विशेष
करून वेगवेगळ्या वरणांमध्ये व आमट्यांमध्ये काळा मसाला वापरण्याची
पद्धत आहे. काळा मसाल्यामुळे एक विशिष्ट पद्धतीची चव येते. जेवणानंतरही
ती चव आपल्या जिभेवर बराच काळ तशीच राहते. तसेच विविध घरात
जात्यावर दळले जाणारे मसाले आवर्जून वापरले जातात. विशेष करून
गावामध्ये जात्यावर मसाले दळण्याची फार पूर्वीपासूनची पद्धत आहे.
पण आजकाल जाते हे अवजार काळाच्या पडद्याआड गेले व त्याची
जागा मिक्सर व ग्राइंडर ने घेतली. आपण आता आधुनिक जगात
वावरतो आहोत. त्यामुळे काळाप्रमाणे आपली जीवनपद्धती पण
बदलली. आता मसाले घरी दळण्याची पद्धत बंद झाली.
आता वेगवेगळे मसाले बाजारात उपलब्ध झाल्यामुळे
जाती मागे पडली. पण जुने ते सोने असे म्हणतात.
वेगवेगळे पदार्थ हे मसाले वापरुन बनवले जातात.
म्हणून मसाल्याला आपल्या खाद्य संस्कृतीत
खूप महत्वाचे स्थान आहे.