Bluepad | Bluepad
Bluepad
मोगरा दरवळ नि आठवणी
sulbha   hanuman wagh
sulbha hanuman wagh
10th Jul, 2023

Share

दरवळ ला गंध मोगऱ्याचा. नि मनपाखरू ५०वर्ष मागे विहार करु लागले. भूतकाळाचे पडदे पटापट खेचून त्या अविस्मरणीय सुवर्ण काळाच्या आठवणी ना आठवून स्वतः शीच संवाद करु लागलं. मोगरा खूप खूप आवडणारे सुगंधी फुल. मोगऱ्या चा गजरा. मोगऱ्या ची चम चम ची फुल वेणी, मोगरा कळ्यांचा ही लांब लचक गजरा सुवासिक गजरा डोई वरच्या केशभूषे त अगदी स्टाईल ने,माळाला जायचा.कधी कधी हिरव्यागार कोवळ्या हिरव्या पाना च्या बंच मध्ये चारच पांढरी शुभ्र मोगरा फुल ठेवून केसात माळा याच्या मुलीं, तेव्हा ती फुलां पेक्षा उठून दिसणारी ती हिरवी. पाने पाहून,संस्कृत चे ऐरोळे सर,गुण गुण गुण्या चे गाणं,कोहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिली सागर मे, सागर मिले कौनसे जल मे,आणि मध्येच शील घालत आवाज द्यायचे काय ग मुलींनो पाना सकट मोगऱ्या चे झाड च केसात माळता की काय? कधी कधी कॉलेज ला निघायची घाई, नि पाटीत मोगऱ्या ची फुल नि गजरा विकणाऱ्या माळ्या ची भेट झाली की त्या गडबडीत ही गजरा घेतल्या शिवाय चैन पडत नसे. अगदी लग्ना नंतर ही भाऊंनी आणलेल्या साडी चोळी पेक्षा गजऱ्या वरच अलौकिक मोगरा प्रेम. 🌹🌹🌹🌹🌹तो मोगरा जो परीक्षेचा रिझल्ट आणताना आजोबा हातात ध्यायचे मोगऱ्या ची ओंजळ नि म्हणायचे असाच यशा चा गंध घेऊन घरी ये. हा तो च मोगरा महाडला, एका गुजराथी भाभी ने राधा कृष्णा च्या लाकडी देव्हार्या ला मोगरा कळयांनी सुशोभीत करत त्याची पूजा अर्चा करता, करता. त्या कळ्या न चे सुगंधीत हसणाऱ्या, फुला न मध्ये रूपांतर होताना पाहिले, नि मग तन मन खोलवर त्या मोगरा आठवण नि परिमला त धुंद झाले.राधा कृष्ण मोगऱ्या च्या देखण्या रूप, परिमलात आणखीनच सुंदर, सजीव भासत होते. एकंदरीत अशा आहेत मोगरा परिमला च्या सुखद आठवणी.
सुलभा (काव्या )वाघ. १०=७=२०२३
मोगरा दरवळ नि आठवणी
मोगरा दरवळ नि आठवणी
९j

0 

Share


sulbha   hanuman wagh
Written by
sulbha hanuman wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad