या जगात एक माणूस म्हणून ज्याला कोणाला स्वत:च असं वेगळं मत नाही असा माणूस नेहमीच दुसर्याच्या बाहुल बनुन राहतो, जगतो. त्याची जीवननौका इतरांनी हाकावी एवढं दुर्दैव ज्याचा पदरात आहे अशांना मी केवळ दुसर्यांनी लादुन दिलेल्या जगण्याचं ओझं समजतो. मत हे मत असतं योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा परंतु दुसर्याच मत अंतःकरणानी योग्य वाटत नाही अथवा अयोग्य वाटत असले तर त्यावर स्वतःच्या मतांची ठिणगी जो पर्यंत पडत नाही तो पर्यंत कोणताच माणूस हा स्वविचारशीलतेचा झरा वाहता ठेवु शकत नाही अर्थातच मी याला अंधारातला कोळसाच म्हणेन.
विकास आग्रे (विकी)(९/७/२३)