Bluepad | Bluepad
Bluepad
कुंकू
Shailesh Patil
Shailesh Patil
9th Jul, 2023

Share

' स्त्रियांनी कुंकू का लावायचे?'
मी एक गोष्ट ऐकली ती अशी,
एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडिंगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसरने विचार केला, एवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळं सोलून फाकवून त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडिंग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली.
गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.
आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.
कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे.
शुद्ध कुंकू कसे ओळखावे -
१] कुंकवाला हळदीचा वास येतो.
२] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते आणि त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.
👉🏻 बांगडी, पैंजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचे वाण नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
👉🏻 " सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते. "
बांगडी घालण्याचे फायदे :-
१) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताचा रक्तसंचार वाढतो.
२) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
३) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
४) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.
५) तुटलेली बांगडी घालू नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.
जोडवी घालण्याचे फायदे :-
१) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तू नाही.
२) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील
"Hormonal System" योग्यरित्या कार्य करते.
३) जोडवी घालण्याने "Thyroid" चा धोका कमी होतो.
४) जोडवी "Acupressure" उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात.
५) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.
पैंजण घालण्याचे फायदे :-
१) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
२) पैंजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील "Fat's" कमी करण्यात मदत होते.
३) वास्तुशास्त्रानुसार पैंजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.
४) चांदीच्या पैंजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.
५) पायातील पैंजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.
६) पायात सोन्याचे पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.

1 

Share


Shailesh Patil
Written by
Shailesh Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad