आपल्यावर होत असलेली टीका,बदनामी,अन्याय या सर्व वेष पालटून आलेलं कौतुकच असतं. अगदी नीट विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की जी लोक असले आपल्या विरोधातले कारनामे करत आहेत अशा लोकांना आपला हेवा वाटतोय हे स्पष्ट आहे कारण बघाना मेलेल्यांवर कधीच टीका होत नसते जिवंत असलेल्यांनाच अशा प्रसंगाना सामोरे जावे लागते कारण आपल्या सोबतच आपले विचार हे अशा लोकांना हवे असतात ते कदाचित बरोबरी करु शकत नाहीत म्हणून टीका, बदनामी केल्याखेरीज त्यांना पर्याय उरत नाही. आणि या सगळ्यातुन आपण कुठे कमी पडलो किंवा काही चुका झाल्या का यावर आत्मपरीक्षण करायला हवे आपण एक माणुस म्हणून कधीच परीपुर्ण असु शकत नाही म्हणून लोकांकडून होत असलेल्या टीकेला निःपक्षपाती उपयुक्त व भरीव समजा.
विकास आग्रे (विकी) १६१४ (९/७/२३