का कुणास ठाऊक , भल्या पहाटे चहा चा आस्वाद घेता घेता, आई तुझी खुप आठवण आली. सुंठ अद्रक इलायची चा चहा बनविलेला तुझा तो थर्मास आठवला. पावसाळ्यात तुला गरम गरम कांदा भाजी, नि साजुक तुपात ला शिरा खुप आवडायचा. अग अक्का हे कर , ते कर तु हक्काने नि आवडीने सांगायची. कधी तु करायचीस. आता तो च पावसाळा येतो, वाफाळलेला चहा सर्व काही, पण तु नाही तर मज्जा नाही, त्या गप्पा नाही गोष्टी नाही, नि तो अलौकिक जिव्हाळा त्याहून नाही. म्हणून मला वाटते ज्यांच्या कडे आई आहे, त्यांनी ती जपुन ठेवा काळजात, भावभावनांच्या रेशीम आवरणात दडवुन आनंदी ठेवा तिला खुप. खुप अनमोल होतीस आई तु माझ्या साठी, त्याची मला आता हरेक क्षणी येते प्रचिती. नमस्कार मातें प्रभाती तुझ्या स्मृती गंधाला ! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सुलभा (काव्या )वाघ.९=७=२०२३