Bluepad | Bluepad
Bluepad
Title

सुनील पंचलोटे
सुनील पंचलोटे
8th Jul, 2023

Share

❤️❤️❤️❤️❤️
प्रेम कविता संग्रह
आलो जरी किणार्याला आजपण
आठवण तुझी आल्याशिवाय राहत नाही
किती मारू दगडे अजून पाण्यात
लाटा थांबायच नाव घेत नाही…
बेभान सुटला हा गार वारा
का आठवण पुन्हां तुझी जागी करतो
उसळणाऱ्या या लाटा खळखळ
खडक बरे का? सहन करतो….
अवचित साधून डोक्यावरती
घिरट्या घेऊन कोणी गीत गातं
मी हरवून जातो क्षणात जून्या त्या
पाण्यात प्रतिबिंब तुझ दिसतं…
हळूच सोडूनी पाय किणारी
गुणगुणतो मी एकटा काही
एकटेपणाचा सहवास मजला
का? बरे आता सोसत नाही…
सुनील पंचलोटे..
27/6/2023
हल्ली अगदी अलीकडे
माझ्या मनासारख घडत नाही
मी बघतो रोज वाट तीची
पण ती काय येत नाही..
लांबुन लांबून जाते ती
नजर माझी चुकवते
मी असतो समोर तरी
अंधळ होण्याचा बहाणा करते..
मी असतो सायकलवर
आणि ती जाते स्कुटीवर
कळतच नाही वेड्याला ह्या
कसा ताबा मिळवू तीच्या मनावर..
मी आपला वेड्यासारखा
कॉलेजच्या गेटवर ऊभा राहतो
येणार्‍या घोळक्यामध्ये
तीला नजर देऊन शोधतो..
पाहिलच कधी नकळत तीने
तरी स्माईल काय देत नाही
मी आपलं उगाच गालात
तरी हसायच सोडत नाही..
सुनील पंचलोटे
19.06.2023
विसरलो मी आता
हा प्रेमाचा रस्ता नाही
दुरावलो दोघेही आता
दोष कोणाला द्यायचा नाही
प्रेम होते अबोल माझे
बोलके आता व्हायचे नाही
डोळ्यामधूनी वाहिल्या धारा
पुसण्या आता सांगायचे नाही
जागीवल्या रात्री दिस समजूनी
स्वप्ने आता बघायची नाही
बोलके ओठ अबोल झाले
प्रेम आता करायचे नाही
सुनील पंचलोटे
5/6/2023
का असे प्रेम तू ,अर्धवट सोडले
नाटक केले प्रेमाचे की, डाव एक मांडले
होतो बरा एकटा मी, तू मजला का पाहिले
फेकूनी जाळे नजरेचे, तू का गं मला गुंतविले
प्रेमात डूबूनी मी हरवलो होतो तुझ्यात
मनाशी खेळूनी सांग, ह्रदयास का छेडले
हरवले होते मन, मनाशी ते गूंतले होते
साधून जवळीक तू, का गं डाव एक साधीले
मीही भुरलो क्षणात,अबोल प्रेमाच्या नात्यात
गोड बोलूनी मला तू,नेले प्रेमाच्या डोहात
बंध वाढले प्रेमाचे, तसे हात तू सोडले
रचूनी डाव प्रेमाचा,का गं खेळ एक खेळले
✍️सुनील पंचलोटे
पहिल्या पावसाच्या सरीत
पुन्हां चिंब चिंब व्हाव
भिजलेल्या अंगाने
मिठीत तुझ्या विसाव…
धो-धो कोसळाव पुन्हां पावसाने
थरकाप सुटाव अंगाला
दुर दिसावी झोपडी एक
मिठीत तुझ्या मी आडोशाला…
झुळुक वार्याची अशी सुटावी
काटा यावा अंगावरती
गडगडाटनार्या मेघामधूनी
स्वर पडावे कानावरती…
लपून बसावे पक्षी सारे
झाडावरच्या फांदीवरती
गारठूनु बसावे थरथरूनी
पंखाखाली पिल्ले दिसती…
पहिल्या पावसाची पहिली सरी
आठवण तुझी जागी करते
खिडकी मधूनी हात काढूनी
तुझ्या स्पर्शाची जाणीव होते…
✍️सुनील पंचलोटे
परतुनी पुन्हां मी, फिरलो माघारी
विचारपूस करुनी मजला आता छेडू नको..!
घाव वेदनेचे झाकून ठेवले अंतरी
काढूनी आठवण,जखम ऊघडी करु नको..!
सोडूनी हात दुरावा केला तू निर्माण
येऊनी जवळ, जवळीक आता साधू नको..!
सोसले मी खुप काही, ठेच लागली ह्रदयात
तोडले नाते तू, आता पुंन्हा जोडू नको..!
जातानी तू न बघता गेली, विचार नाही केला
आज पाहूनी मजला, डोळ्यात अश्रू दाखवू नको..!
छेडले तु मला, रडवले तु मला, सोडले तू मला
आत् पुन्हां येऊन,नाटक प्रेमाचे करू नको..!
✍️सुनील पंचलोटे
काहीतरी मनात तुझ्या
साठवून तू ठेवलं का
ओठांवरी शब्द तुझे
सांगण्यास अतुरले का..
होऊन वेडीपिशी तू
नजर सैरावैरा धावते
कोन मनी बसल लपून
गालातल्या गालात का तू हसते..
सुनील पंचलोटे
ऐक ना
पुन्हां एकदा तुझ्या समवेत
फिरावसं वाटतं
चुकुन झालेल्या भेटीच्या जागेवर
भेटावसं वाटत..
ऐक ना
पुन्हां एकदा हात तुझा हातात
धरावसं वाटतं
दाटून राहिले शब्द अंतरी काही तुला
बोलावसं वाटतं..
ऐक ना
पुन्हां एकदा गाडीवर दूर कुठे
जावसं वाटतं
चालणाऱ्या गाडीवर तुला घट्ट
पकडावसं वाटतं…
ऐक ना
पुन्हां एकदा रिम-झिमणार्या सरीमद्ये
भिजावसं वाटतं
चिखल मातीच्या पाण्यामध्ये खळखळ
चालावसं वाटतं..
ऐक ना
पुन्हां एकदा तुझ्या सोबत
भाडांवस वाटतं
नाही बोलायच तुझ्या सोबत मला अस रुसून
बसावसं वाटतं..
ऐक ना
पुन्हां एकदा तुझ्या सोबत
बोलावसं वाटतं
बोलता बोलता तुला सतत
चिडवावसं वाटतं..
ऐक ना
पुन्हां एकदा तुझा मला
व्हावसं वाटतं
हरवलेल्या प्रेमनगरीत तुला
शोधावसं वाटतं..
सुनील पंचलोटे
वेडी..
ऐक ना ग वेडे जरा
हात हातात धरशील का?
राहशील सोबत आयुष्यभर
वचन मजला देशील का?
अनोळखी या वाटेवर
सहज नकळत भेट झाली
मिळता नजरेला नजर आपली
तू ह्रदयात माझ्या सामावली..!
तूलाही राहवत नसेल आता
आठवत असेल भेट आपली
दडलेल्या त्या पापणी आड
नजर का गं हळूच चोरली..!
रंगवूही लागलो स्वप्ने आता
पाहू का? सांग वाट येण्याची
काय केला विचार तू सांग
की हरवूनी गेली स्वताशीच..!!
✍️ सुनील पंचलोटे
विरह..
का? बरं सांग आता
तूला का आठवू,
कीती दिवस टोचणार्या
आठवणी मनात साठवू..!
प्रेम माझ खरं-खोट
पाहिल नाही तू जवळूनी
दूर निघून गेली क्षणात
क्षणिक प्रेमाचा भास दावूनी..!
अबोल प्रेमाचा अर्थ वेडे
हसण्यात तू घालवत होती
पानावलेल्या नयनांना माझ्या
कधीच समजून तू घेत नव्हती..!
समवेत तुझ्या असताना
आठवणी या साठत गेल्या
दिवसामागून दिवस सरले
आता ह्रदयाला जखमा झाल्या..!
होत नाही सहन आता
आठवणींचा बांध फुटला
भेटीचा प्रतेक क्षण तुझा नी माझा
ह्रदयातुनी मी काढून टाकला..!
✍️सुनील पंचलोटे
प्रेम…
नको तुझी आठवण मला
जगू दे थोड मनमोकळ
चुकलेल पाऊल माझ
करू दे जरा सरळ..!
तू गेला पुढे सरकूनी
नाही वळून बघीतले
तुझ्या आठवणीत मी
रात्रनदिस रडले..!
दोन दिवसाचा आनंद
दुख दिले तू जन्मभराचे
ह्रदयातील जखमांचे
सांग कसे घाव भरायचे..!
आठवणींच्या प्रतेक पाऊलखुणा
पुसवुनी मज टाकू दे
बुडालेल्या या प्रेम सागरातूनी
बाहेर मला येऊ दे..!
सुनील पंचलोटे
भेट..
पुन्हां एकदा ती मला
जुन्या वळणावर भेटली.
जाऊन थोडी पुढे ती
मला गालातल्या गालात हसली..!
बघीतल तीच्याकडे क्षणभर
जरा गोंधळून मी गेलो होतो.
कुठ बघीतलं बर यांना
विचार करत आठवत होतो..!
अचानक तीन विचारलं कसा आहे
मी पटकन भानावर आलो.
कसा असणार मी बरं
वाटच आयुष्याची चुकलो..!
डोळ्यात ती बघत होती
डोळे भरून आले होते.
करशील ना रे माफ मला
नको असतानी हात सुटले..!
काहीच बोलो नाही तीला
ह्रदय माझ धडकत होत.
फुटत नव्हते शब्द माझे
डोळ्यात मात्र पाणी होत..!
सुनील पंचलोटे
गजरा..
तुझ्या येण्याची वाट
मी डोळे लावुन बघते
हरवले मन तुझ्यात रे
का माझ्यात मी हरवते..
दिलेला तु गजरा
मी केसात माळवुन ठेवला
आठवणीत तुझ्या मी
हळूच हात फिरवून पाहिला..
सांजवेळी आठवण तुझी
मनाला मज सतावते
येशील का पुन्हा परतुन
बघ वाट मी पाहते..
मोहुन टाकतो सुंगंध फुंलाचा
अंगणात सुंगंध पसरून जातो
मी बसते रांगोळी काढत सहज
सारखा चेहरा तुझाच आठवतो..
आठण तुझ्या गजर्याची
मी अजुन जपुन ठेवली आहे
आठवणीत तुझ्या आजही
डोळे माझे पानावत आहे..
सुनील पंचलोटे
प्रेम
नजर तुझी पाखरावानी
बांधा तुझा नाजूकगं
प्रेम जडल तुझ्यावरी
कस तुला सांगू गं..
न बोलके ओठ माझे
आपोआपच बोलले
चुकुन नजर तुझी आज
चोरून तुला पाहिले...
रुप तुझे गोजिरवाणी
हरणागत चाल गं
प्रेम जडलय तुझ्यावर
कस तुला सांगु गं…
पाहवे तुजला लपुन
किती वर्णन करु तुझे गं
डोळ्याआड लपलं प्रेम
तुझ्या गालावर खली गं
सुनील पंचलोटे
आठवण
आठवणींच्या ओझ्याखाली
मन दडपत का चाललय
प्रेमा आडचा चेहरा तुझा
मी कसा नाही गं पाहिलय
करायचच नव्हते प्रेम तर
सांग सखे वळुन मागे
मज ह्रदयास का पाझरलय
नको तुझ्या आठवणीत मज
डांबुनी मी ज्या ठेविल्या
वाळुवरच्या पाऊलखुणा
आज नकळत मी हरविल्या..
सुनील पंचलोटे
वेड प्रेम
सहज तुला बघीतल होत
अन नकळत ह्रदय माझ धडकत होत
कळालच नाही या वेड्या मनाला
तुझ्यात आता ते गुंतल होत....
दचकून ऊठाव मी अलगद
भास तुझा होता क्षणी
हरलो मी तुझ्यात सखे
फक्त तुच आता ध्यानी मनी..
डुलाव गवतावरच्या मोतीने जस
मन माझ हवेशी मोकळीक साधत
इकडुन तिकडे घेऊन गिरक्या
तुझ्या शोधात ते फिरत..
सुनील पंचलोटे
कबंक्त दिल
कबंक्त साला दिल था
तेरे खयालोमे खो गया
कोशिश कि भुलानेकी
लेकिन उतना जादा मुझे सताया..
सोचताथा मै रातदिन
ए मोहब्बत हे या प्यार का नशा
बस तेरी याद मे जीता आया
बस अब ना रही प्यार कि आशा....
सुनील पंचलोटे
भास..
सहज तुला बघीतल होत
अन नकळत ह्रदय माझ धडकत होत
कळालच नाही या वेड्या मनाला
तुझ्यात आता ते गुंतल होत....
दचकून ऊठाव मी अलगद
भास तुझा होता क्षणी
हरलो मी तुझ्यात सखे
फक्त तुच आता ध्यानी मनी..
डुलाव गवतावरच्या मोतीने जस
मन माझ हवेशी मोकळीक साधत
इकडुन तिकडे घेऊन गिरक्या
तुझ्या शोधात ते फिरत...
सुनील पंचलोटे
जवळून जाताना जेव्हा
तू बघतेस
पाहून मला गालातल्या
गालात तु हसतेस
धड-धड होतय मला
पाहून राणी तुला
तुझं हृदयात घर माझ्या
फक्त मनात आहे तुच
सायकलवर चालली श्रीवल्ली
तू प्रीतीची हाय बबली...
तुझाच आहे मी
समजून तु घेना
समोर जाताना थोड
वळून बघना
वाटेत थांबेन तुलाच बघेन
पाठ नाही सोडणार तुझ्या मागेच येणार
नाव तुझं रोजचं घेणार मी हृदयात तुलाच ठेवणार
तुझ्याच मागे येणार नजरेत तुला भरतो
सायकलवर चालली श्रीवल्ली
तु शाळेतील हाय बबली..
शाळेत तुझं मेकप
लय भारी
दोन वेण्या त्याला
हसतात सारी
गर्दीमधून निहाळतो माझी नजर तुजवरी
वेण्यामधी फुल तुझ्या हातामधी बांगडी
तुझ्या पुढ पोर येतात सारी
पण तु भाव कोणा नाही दिला
तु सगळ्यात लईच भारी
तू येण्याची चाहूल लागली
सायकल वर चालली श्रीवल्ली
तु माझीच हाय बबली....
सुनील पंचलोटे.
प्रितीचा झेंडा
धसकन झाल अस काळजात
तुझ्या प्रितीचा झेंडा
रोवला ह्रदयात
भिर भिर तुझ्या मागे फिरतुया
चोरून चोरून तुला पाहतोया....
.
.
तुझ्या मनात काय मला कळतय रं
प्रेमाच भुत तुझ्यात शिरलय रं
नको येऊ माग तुला नाही देणार भाव
किती करशील येडे चाल....
.
.
अग थांब थांब थांब
कस सांगु तुला समजावून
मन माझ नाही थार्‍यावर
तुझ घर माझ घरासमोर
मी बसतोय रोज अंगणात...
.
.
माग नको लागु माझ्या ऊगाच
पप्पाला नाव सांगिन जाऊन
चोरून चोरून मला पाहू नको
नजरला नजर माझ्या देऊ नको
माझ्या साठी अंगणात बसु नको...
.
.
ह्रदयात माझ्या तु बसलीस गं
प्रेमाच याड तुच लावल गं
पहिल्यांदा तुच मला पाहिल गं
.
.
नको म्हणु काही मला राहवत नाही
तुझ्या प्रेमात मीही पडले रं
.
.
सुनील पंचलोटे
उतावळ मन
उतावळ मन माझ
तुझ्यामागे फिरताया
कळेना येड्याला का
तुझ्यासाठी झुरतोया..
स्वप्नात चेहरा तुझा
डोळ्यामधी भरतय
गाढ झोपेमधी मी का
ऊठुन बसतय...
चंचल अदा तुझी
घालती भुरळ मनाला
यडी तुझी अदा न्यारी
यड लावतीया जीवाला...
नजर माझी भिरभिरती
शोध घेती तुझ्या मनाचा
नाकावर राग तुझ्या
खेळ सारा प्रेमाचा...
माग तुझ्या येतुया
पाठलाग करतुया
उतावळ मन माझ
तुझ्यासाठी झुरतोया..
सुनील पंचलोटे
शाळेत मला भेटना....
तुझी आठवण मला बघ हाय गं
मला शाळेत एकदा भेट गं
तुझ्या मनात काय मला सांग गं
पुढ जाताना वळुन बघ गं
तुझी आठवण मला बघ हाय गं
मला शाळेत एकदा भेटन गं
पोरी सपान तुझच पडतया
मनी धडधड मला का होतया
तुझी रोजचीच वाट मला आहे ती पाठ
एकदा थांबुन माझ्याशी तु बोल गं
मला शाळेत एकदा भेटगं....
वेणी मधल तुझ लाल फुल गं
माझ्या मनाला यड लावतय गं
वेडीपिशी नजर ही माझी
मन तुलाच आता हे शोधत गं
तु करुन विचार पुन्हा बघना
मला शाळेत एकदा भेटना....
तुझी सायकल पुढे कधी माग
ऊभा वाटेत मी जवळून जा गं
या शाळेत कधी टेबलावर
ताबा नाही आता मनावर गं
जरा पाहुन मला तु हसना
मला शाळेत एकदा भेटना..
तुझे गोरे गोरे गाल हाय गं
पोरी लाजु नको जरा थांब गं
मला थोडस समजून तु घेना
माझ्या प्रेमाचा स्विकार करना
तिरकी तुझी नजर
मला करती बघ घायाळ
नको प्रेमाचा अंत माझ्या पाहुना
मला शाळेत एकदा भेटना..
तुझी आठवण मला बघ हाय ना
मला शाळेत एकदा भेटना....
सुनील पंचलोटे
यड खुळ प्रेम
प्रेमात तुझ्या राणे
झालो मी वेडा पिसा..
यड खुळ प्रेम माझ
फिरतोय दार घरा....
मनात दाटलया
हुर हुर होतया
अंधार काजव्या परी
धड धड करतया....
कस कुठे फिरू मागे
बघतीया समधीजण
ऊजाडली चांदणी जणु
भरदिवसा या ऊनात....
हरणावानी चाल तुझी
पायामधी पैंजण
आलोय माग माग
तुझाच होउन साजन..
राणी तुझ्या स्वप्नात
दंगलोय रांतदिन
तुझ्या विना नाही आता
कामात माझ मन....
सांजवेळी तुझ्या घरी
फेरी माझी एक रोज
दिस झाले खुप आता
एकदातरी वळुन बघ...
भुरल घालती तुझी
एक एक अदा मना
वाट पाहत बसतुया
रोज माझ्या अंगणा...
राणी राणी माझी राणी
होशील का सांगना
मन झुरतय तुझ्यासाठी
आय लव्ह यू म्हणना...
यड खुळ प्रेम माझ
तुलाच शोधतया..
पापणीआड चेहरा तुझा नयनी मज भरलया ...
सुनील पंचलोटे
आठवण माझी
बरेच दिवस झाले जाऊनी तुला
कधी आठवण माझी नाही आली का..?
हरवुनी बघ स्वतामध्ये स्वताला आणि
जमल तर बघ आठवण माझी येते का..?
तुझ काय तु तर खेळत होती खेळ
कधी माझ्यात प्रेम नव्हत पाहिल का..?
कळेल जेव्हा प्रेमाचा अर्थ तुला तेंव्हा
जमल तर बघ आठवण माझी येते का..?
तु झाली तुझ्यात दंग
कधी माझ्या जीवाचा विचार केला का..?
आठवुन बघ तो प्रतेक क्षण आणि
जमल तर बघ आठवण माझी येते का..!
इथवर आलतो चालत आपण
तु मध्येच दगा दिला का..?
लागेल जेंव्हा ठेच तुलाही तेंव्हा
जमल तर बघ आठवण माझी येते का..?
काळोख पसरला आज डोळ्यासमोर
कधी भास माझा तुला होतो का..!
डोळे पुसताना आज त्याचेही कुठे
जमल तर बघ आठवण माझी येते का..?
माझ्याविना दिवस नव्हता जात तुझा
आज सहजपणे अशी तु विसरली का..?
फिरताना बाहेर सोबत त्याच्या आज सहज
जमल तर बघ आठवण माझी येते का..?
सुनील पंचलोटे
यड खुळ प्रेम
प्रेमात तुझ्या राणे
झालो मी वेडा पिसा..
यड खुळ प्रेम माझ
फिरतोय दार घरा....
मनात दाटलया
हुर हुर होतया
अंधार काजव्या परी
धड धड करतया....
कस कुठे फिरू मागे
बघतीया समधीजण
ऊजाडली चांदणी जणु
भरदिवसा या ऊनात....
हरणावानी चाल तुझी
पायामधी पैंजण
आलोय माग माग
तुझाच होउन साजन..
राणी तुझ्या स्वप्नात
दंगलोय रांतदिन
तुझ्या विना नाही आता
कामात माझ मन....
सांजवेळी तुझ्या घरी
फेरी माझी एक रोज
दिस झाले खुप आता
एकदातरी वळुन बघ...
भुरल घालती तुझी
एक एक अदा मना
वाट पाहत बसतुया
रोज माझ्या अंगणा...
राणी राणी माझी राणी
होशील का सांगना
मन झुरतय तुझ्यासाठी
आय लव्ह यू म्हणना...
यड खुळ प्रेम माझ
तुलाच शोधतया..
पापणीआड चेहरा तुझा नयनी मज भरलया ...
सुनील पंचलोटे
खर प्रेमाचा अर्थ
प्रत्येक जण सारख नसत
प्रेम हे नकळत होत असत
प्रेमाच्या ओळाव्यामध्ये
खर खोट समजत नसत...
चुकुन पडतात पाऊले पुढे
हात प्रेमाने धरला जातो
हरवुनी या नवीन जगात
आपल परक मग विसरून जातो...
दोषही देता येत नाही
कारण जखमा खोलवर रूतल्या जातात
दोन घडीचा खेळ खेळुनी
क्षणात परके करुनी जातात..
रक्तापेक्षाही कधी अनोळखी
प्रेम अनमोल वाटु लागत
लागते जेंव्हा ठेच मात्र
खर प्रेमाचा अर्थ समजत...
सुनील पंचलोटे
तुझे स्वर
मंद स्वराचा आवाज तुझा
हळूच पडला कानावरी
हा हा म्हणता नाजूक सरी
खेळू लागल्या अंगावरी .
सर -सर आवाज वेडा
येथून तेथे पळू लागला
सोबत घेऊन काही सरी
लपाछपी खेळू लागला .
हिरवीगार नटली झाडे
न्हाहून निघली चिंब चिंब
कड -कड -कड -कड आवाज सारा
जणू उमटले तुझे प्रतिबिंब .
गड -गड-गड -गड मधेच आवाज
भीती घालतो हृदयामध्ये
विसरून घरटी काही पंछी
गिरत्या घेती गगनामध्ये .
स्वर तुझे ते मंद सुराचे
ऐकून होती बेभान सारे
विसरून गेलो मी तुझ्यामध्ये
ऐकून तुझे ते वेडे गाणे .
सुनील पंचलोटे
तुझी आठवण
अस वाटत कधी-कधी आज पण
ती माझी आठवण काढते
कारण गोड झोपेमध्ये असताना
ती स्वप्नात माझ्या येते...
लाजलेला सुंदर चेहरा तिचा
डोळ्यासमोरून जात नाही
आता तिची आठवण येत नाही
अस कधी होत नाही...
कराव स्पर्श तिच्या नाजूक गालाच
अंग शहारून जात होते
एकांत वेळी दोघे असताना
तारे चोरून पाहत होते...
कड -कड आवाज ऐकून विजांचा
मनान तिच्या घाबरून जाव
घट्ट मिठी मारून तिने
काही क्षण मिठीत माझ्या विसाव...
आजही संध्याकाळी झोपताना
पाहतो तीला चांदण्यात
न कळत झोप लागते
आठवण तुझी काढत...
सुनील पंचलोटे
भोल बाबड प्रेम
भोल भाबड प्रेम
भोळ भाबड प्रेम माझ
तुला कधी कळाल नाही
दूर तू गेली असली तरी
तुला मी विसरलो नाही .
माझच चुकल होत
तुझ्या सोबत प्रेम केल
आयुष्यभर विसरणार नाही
अस तू दुखं दिल .
विचारायचो मी नेहमी तुला
प्रेम करते का तू माझ्यावर
हसून उत्तर द्याची तू
सांगेल तुला ते झाल्यावर.
मी बघायचो तुला , मात्र
तू फिरायची कोणाबरोबर
जीव माझा जळायचा
अस काही पाहिल्यावर .
मी असेल कदाचित साधा
पण प्रेम मात्र आतून होत
गेली जवळून तू जरी
हृदय मात्र धडकत होत .
खूप विचार करायचो तुझा
अन डोळे भरून बघायचो
निळेभोर डोळे पाहुंन
त्यात क्षणभर हरवायचो .
शेवटी नाही झाली तू माझी
त्याच काही वाटत नाही
पण जे दिले दुखं तू
ते आता सोसत नाही .
सुनिल पंचलोटे
तू आणि पाऊस
तू कधी पावसात
सरी कोसळतात सरसर
रिम-झिम पावसात
कधी तो मुसळधार .
वेड व्हाव त्याच्या आठवणीन
भिजलेल मन तुझ
कधी येउन जाव त्याने घेऊन स्पर्श तुझ .
वाट पाहते तू कधी त्याची एखान्द्या प्रीयकरासारखी
नाही येत आठवण त्याला
तुझी प्रीयासिसारखी .
पावसात कधी तू बेधुंद होऊनी नाचते
हरवलेले मन तुझे वार्यावर डुलते .
पाहून तुला पावसात शब्द फुटतात ओठांवर
तू आणि पाऊस घेऊन कविता करावी मनात .
सुनील पंचलोटे
प्रेम माझ पाहिलं
मी माझ्या मनाचा शांत मन थांबून जाई दुर
करीन म्हनेन् ताबा केल त्यांनी हृदयात घर .
दुसर्याच दिवसापासून विसरलो भूक तान्ह
तुला भेटण्य्साठी तुझ्याकडे ओढ घेई मन
कारण प्रेम माझ पाहिलं …………… १
खिडकी माझ्या पाठीशी हळूच उघडून ठेवायची
तुला पाहण्याची मला वेगळीच ओढ असायची .
अचानक तुझी आणि माझी नजर एक झाली
कुठे हरवत चाललोय मनाला चाहूल झाली .
कारण प्रेम माझ पाहिलं ……………… २
कामानिम्मित गच्चीवर येउन घेऊन गेली माझ मन
तशीच उभी राहिली तू पाहत न कळत मी तुला केला हात
हात माझा पाहुनी गालातल्या गालात हसुनी
निघून गेली तू खाली तेंव्हापासून माझ्या प्रेमाची खरी सुरुवात झाली .
कारण प्रेम माझ पाहिलं ……………… ३
सुनील पंचलोटे
तुला कळालच नाही …।!
जवळ येण्याचा प्रयत्न केला पण हिमत कधी झाली नाही .
प्रेमाचे दोन शब्द सांगण्यासाठी वेळच भेटला नाही.
प्रेम माझ तुझ्यावर पण तुला कधी कळालच नाही .
इशारा करून सुद्धा तुला ते समजल नाही .
स्मित हास्य तुज मला वेड लाऊन जायचं .
कळत नव्हत मला कधी तुला प्रेमाच अर्थ कळायचं .
खरच मी वेडा होतो जो तुझ्या प्रेमात पडलो .
तुझ्या आठवणीत मी रात्रंदिवस रडलो .
एकदाच भेटून मला तू डोळ्यात डोळे घालून बघ .
जीवनातल्या माझ्या या प्रेमाला तुझ्या हृदयात दे घर .
प्रेमाचा अर्थ जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर .
वाट पाहत बसेन मी फक्त एकदाच आय लव्ह यु म्हण .
सुनील पंचलोटे
परत
आजही मी त्याची वाट पाहते
याव त्यांनी कुठून तरी वार्याच्या झुळूकबरोबर
आणि अलगद स्पर्श करावा .
असेल मी कुठे बसलेली एकांत त्याच्या आठवणीत डुबून गेलेली
न कळत येणाऱ्या पक्षाने संदेश मला सांगावा
याव त्यांनी सर्वांवर मात करून आणि माझे डोळे पुसत म्हणाव,
बघ परत आलो मी, तुझ्यासाठी आता डोळ्यात अश्रू अनु नको
कुठे तरी जाऊ दूर -दूर एकांत प्रेमाने भरलेल्या जगात
आणि विसावू तिथेच,जिथे कधी कोणीच पाहणार नाही .
सुनील पंचलोटे
मन
जाता -जाता आठवण म्हणून
डोळ्यात अश्रू देऊन गेली
मनातल्या भावनांना माझ्या
तू सोडून का? गेली .
रुसले मन माझ्याशी
मला ते बोलत नाही
तू माझी नाही
हे त्याला का? कळत नाही .
किती सांगाव त्याला
तो काहीच ऐकत नाही
तुझाच विचार करतो
हे त्याला का? कळत नाही .
मन माझे थोडे नाराज
आठवण तुझी सोडत नाही
मन हे माझे वेडे
त्याला का? कळत नाही.
सुनील पंचलोटे
भास..
चुकवून मजला सखे
रात्र बघ झाली
चांदण्याची चोरी
कोणा चंद्राने केली...
कळलेच न कधी मला
अंधार दगा देईल
चाहूल ज्याची मनात
तो दूर निघून जाईल...
किर किर काजवांनी
का ईशारे मज केले
खेळ नवे हा भातुकलीचा
जो कोणी मजसी खेळे...
पाहिले स्वप्न उराशी
अर्धवटच का राहिले
का कोणी येऊनी जवळी
ह्रदयाशी मज छेडिले..
सुनील पंचलोटे
माझी आठवण
दूर निघून गेली तू पण
एक काम करशील का?
नाही भेटली पुन्हा कधी
आठवण माझी काढशील का?
डोळे तुझे पाणावलेले असतील
पण मनात तुझ्या मी असेल का?
दिवसामागून दिवस सरतील
ध्यानात मला ठेवशील का?
भेट नाही झाली तरी
स्वप्नात माझ्या येशील का?
गोड झोपेमध्ये असतानी
उठून मला जाशील का?
मनात कधी विचार येईल माझा
नाव माझ घेशील का ?
वाहणाऱ्या झुळूकबरोबर
संदेश मला पाठवशील का?
काही दिवस असेच जातील
मला तू विसरशील का?
भरलेल्या डोळ्याने कधी
आरशात म;ला पाहशील का?
झालीच कधी चुकन भेट
तर मागे वळून पाहशील का?
नाही बोलली तोंडाने तरी
डोळ्याने काही सांगशील का?
सुनील पंचलोटे
मन एकटं एकटं
मन एकटं एकटं
वार्यावरती फिरत
गवताच्या पातीवरती
मनोसक्त डोलत .
हळू हळू पाण्यावरती
लाटा लोटांगण घेती
पाय ठेऊन पाण्यात
लाटा शिवूनिया जाती ..
वारा करुनि आवाज
मला छेडुनिया जात
शहारे येताय अंगाला
मन घाबरून जात ...
ओली माती या पायाला
स्पर्श करुनि सांगती
रिमझिम पावसाची
मनी चाहूल लागती ...
हरवले माझे मन
वार्यासंगे खेळती
हसू ओठावर माझ्या
चिंब पावसात खेळती ...
सुनील पंचलोटे
खर प्रेम
डोळ्यात डोळे घालून
पाहताक्षणी डोळ्यात
पाणी येत
ते खर प्रेम..
डोळ्याला डोळे मिळताक्षणी
मन काही काळ
स्तब्ध होतो
ते खर प्रेम....
डोळ्याला डोळे मिळताक्षणी
डोंघाची नजर एकाग्र
होते ते खर प्रेम ...
ती जवळून जाता क्षणी
हृदय धड -धड करू लागत
ते खर प्रेम ...
सुनील पंचलोटे
हरवलेली वाट
हरवलेली वाट माझी
शोधून मला देशील का?
मी करतो प्रेम जेवढ
तेवढंच माझ्यावर करतेस का?
मी नसताना सोबत कधी
समोर मी दिसतो का?
आहे मागोमाग तुझ्या मी
होऊन भास मागे वळून बघतेस का?
बसून कधी एका ठिकाणी
जुन्या आठवणी आठवतात का?
केलेल्या काही गुजगोष्टी
हरउन त्यात जातेस का?
वेडा म्हणतेस कधी मला
खरच तुला वाटत का ?
होऊन वेडी तू सुद्धा
माझ्या सोबत फिरावस वाटत का?
न फुटणारे शब्द कधी
ओठावर तुझ्या येतात का?
बोलावसे वाटणारे शब्द काही
मनात तुझ्या दाटतात का ?
एकांत कधी असताना
सोबत माझ्या हरवतेस का ?
सुटलेला हात माझा
शोधण्याचा प्रयत्न करतेस का?
सोबत माझ्या सारख
तुला रहावस वाटत ?
खूप दाटले प्रश्न मनी या
उत्तर एकाचे देशील का?
आठवण काढतो तुझी मी
भास तुला होतो का?
हरवलेली वाट माझी
शोधून मला देशील का?
सुनील पंचलोटे
वेडी
वेडी का खुली तू सांग मला
प्रेम करतो तुझ्यावर तुला का कळेना
घर तुझ शेजारी खिडकी आहे पाठीशी
चोरून चोरून पाहतो तरी नजराला नजर का देईना
माहित आहे सुंदर आहे भाव किती खाशील
पाय घसरून का होईना प्रेमात तू पडशील
वळून न पाहता जवळून तू जाते
जाणवत तू गालातल्या गालात थोड तरी हसते .
बोलाव वाटत तुझ्याशी मैत्रिणी सोबत नसतानी
पाहत रहाव वाटत तुला समोरून तू येतानी .
मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत आठवण तुझी काढत असतो .
वाहणाऱ्या वार्याच्या झुळूकबरोबर स्वताला हरवत असतो .
भेटलं मला तूच वेडी स्वप्न मनी रंगवत असतो .
वेडा होऊन मी एका वेडी मागे फिरत असतो .
सुनील पंचलोटे
शेवटच
हातातला कागद हातात देतानी मी तिला शेवटच विचारलं
मी तुझ्या हातात कागद दिला याचा अर्थ तो कागद नाही
त्याच्यामध्ये मी माझ हृदयपण बंद केलं .
ज्यावेळेस तू त्या कागदाची घडी उघडशील
तेंव्हा न कळत तुझे डोळे अश्रुनी भरून येतील .
खूप काही सांगायचं होत पण,तू समजूनच घेतलं नाही .
आजही मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो .
कदाचित तुझ्या मनाचं परिवर्तन झाल अस तुला वाटत असेल
आणि मला काही सांगावस वाटल तुला तर,
कदाचित मी या जगापासून खूप दूर निघून गेलेलो असेल .
तेंव्हा तू माझ्या आठवणीन तुझ्या डोळ्यात दोन अश्रू आणण्यास विसरू नको .
सुनील पंचलोटे
तू माझी नसताना
नाही झाली तू माझी तरी
हृदय तुझ्यावर जडलय .
माहित नाही तुला ते
किती दिवस तुझ्यामागे फिरलंय .
हळुवारपणे फिरायचो तुझ्यामागे
तुला नकळत बघायचो .
आज बोलशील माझ्याशी तू
त्यातच हरवून जायचो .
का पण कळत नव्हत
तुला बघितल कि शब्द का अडखलायाचे.
दूर गेली तू कि
आपो आप ओठ माझे उघडायचे .
तुलाच बघितली कि हे असाच का होत
मनाला कधी कळाल नाही .
वेडा झालतो तुझ्या प्रेमात पण ,
वेडी तुला ते कळाल नाही .
जस अलगद पावसाच्या पाण्याच्या थेम्बाने
गालावर पाडाव तस तुझ्या प्रेमात पडलो होतो .
होशील माझी समजून तू
स्वप्ने काही रंगवत होतो .
मी तरी फिरायचो तुझ्यामागे
आज नाही उद्या तू माझी होशील.
कुठे माहित होत या वेड्या मनाला
तू होकार दिल्याशिवाय तशीच दूर जाशील .
आता ती स्वप्ने धुसर झाली
जवळ असून काही दिसेना .
तू माझी नसताना सुध्द्धा
हे वेडे मन तुला काही विसरेना .
सुनील पंचलोटे
आज का?सतावतो
मनात विचार येता क्षणी उगाच कुठे हा बेभान वारा अंगाशी छळतोय,
कधी नाही स्पर्श करणारा हा वारा आज का सतावतोय ,
मन कुठे एकांत गुंतले असताना त्यांनी मुद्दामच का सुटाव ,
आलेले विचार काही आठवणी येउन तो दूर घेऊन जातो ,
कळतच नाही हा बेभान वारा आज का सतावतोय ,
लाटा मागून लाटा आणून स्पर्श पायाला करतोय ,
शांत बसलेले केस माझे वार्यावर उडवतोय ,
या दोन दिवसात थोड वेगळच जाणवतय
,कळतच नाही मला हा बेभान वारा आज का सतावतोय ,
मावळत्या सुर्या कडे पाहताना मन अगदी प्रसन होते ,
भेदरलेले मन सारे पिवळसर उन्हात नाहून निघते ,
पण अचानक कुठून येउन हा बेभान वारा एखांदा ढग आडोशाला आणतो
कळतच नाही हा बेभान वारा आज का सतावतोय .
सुनील पंचलोटे
प्रेमाचे पहिले पान माझे
प्रेमाचे पहिले पान माझे दुमडून तू ठेऊ नको .
कदाचित करत नसेल तू प्रेम माझ्यावर
मैत्री मात्र तोडू नको.
असेल कोणी मनात तुझ्या जपून तू ठेव हृदयात .
लागली ठेच कोणा , हे मात्र सांगू नको.
दुखानी भारलेल आयुष्य आपल
आपणच वेड्यावाणी जागाव लागत .
नाही भेटला किनारा तरी
पोहायला मात्र शिकव लागत.
मन खरच वेड असत कुठे गुंतलं सांगता येत नाही
गुंतलं जिथे तेच भेटलं खर मात्र वाटत नाही .
मन वेड कि आयुष्य थोड पण संघर्ष करूनच जागाव लागत
एक फांदी तुटली म्हणून काय झाल आधार दुसरीचा घ्याव लगत.
सुनील पंचलोटे
मन
जाता -जाता आठवण म्हणून
डोळ्यात अश्रू देऊन गेली
मनातल्या भावनांना माझ्या
तू सोडून का? गेली .
रुसले मन माझ्याशी
मला ते बोलत नाही
तू माझी नाही
हे त्याला का? कळत नाही .
किती सांगाव त्याला
तो काहीच ऐकत नाही
तुझाच विचार करतो
हे त्याला का? कळत नाही .
मन माझे थोडे नाराज
आठवण तुझी सोडत नाही
मन हे माझे वेडे
त्याला का? कळत नाही.
सुनील पंचलोटे
तुला कळालच नाही …।!
जवळ येण्याचा प्रयत्न केला पण हिमत कधी झाली नाही .
प्रेमाचे दोन शब्द सांगण्यासाठी वेळच भेटला नाही.
प्रेम माझ तुझ्यावर पण तुला कधी कळालच नाही .
इशारा करून सुद्धा तुला ते समजल नाही .
स्मित हास्य तुज मला वेड लाऊन जायचं .
कळत नव्हत मला कधी तुला प्रेमाच अर्थ कळायचं .
खरच मी वेडा होतो जो तुझ्या प्रेमात पडलो .
तुझ्या आठवणीत मी रात्रंदिवस रडलो .
एकदाच भेटून मला तू डोळ्यात डोळे घालून बघ .
जीवनातल्या माझ्या या प्रेमाला तुझ्या हृदयात दे घर .
प्रेमाचा अर्थ जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर .
वाट पाहत बसेन मी फक्त एकदाच आय लव्ह यु म्हण .
सुनील पंचलोटे
परत
आजही मी त्याची वाट पाहते
याव त्यांनी कुठून तरी वार्याच्या झुळूकबरोबर
आणि अलगद स्पर्श करावा .
असेल मी कुठे बसलेली एकांत त्याच्या आठवणीत डुबून गेलेली
न कळत येणाऱ्या पक्षाने संदेश मला सांगावा
याव त्यांनी सर्वांवर मात करून आणि माझे डोळे पुसत म्हणाव,
बघ परत आलो मी, तुझ्यासाठी आता डोळ्यात अश्रू अनु नको
कुठे तरी जाऊ दूर -दूर एकांत प्रेमाने भरलेल्या जगात
आणि विसावू तिथेच,जिथे कधी कोणीच पाहणार नाही .
सुनील पंचलोटे
आठवण
अस वाटत कधी-कधी आज पण, ती माझी आठवण काढते.
कारण गोड झोपेमध्ये असताना ती स्वप्नात माझ्या येते.
लाजलेला सुंदर चेहरा तिचा डोळ्यासमोरून जात नाही.
आता तिची आठवण येत नाही अस कधी होत नाही.
कराव स्पर्श तिच्या नाजूक गालाच अंग शहारून जात होते.
एकांत वेळी दोघे असताना तारे चोरून पाहत होते.
कड -कड आवाज ऐकून विजांचा मनान तिच्या घाबरून जाव.
घट्ट मिठी मारून तिने काही क्षण मिठीत माझ्या विसाव.
आजही संध्याकाळी निवांत झोपताना पाहतो तीला चांदण्यात.
न कळत झोप लागते आठवण तुझी काढत.
सुनील पंचलोटे
प्रेम माझ पाहिलं
मी माझ्या मनाचा शांत मन थांबून जाई दुर
करीन म्हनेन् ताबा केल त्यांनी हृदयात घर .
दुसर्याच दिवसापासून विसरलो भूक तान्ह
तुला भेटण्य्साठी तुझ्याकडे ओढ घेई मन
कारण प्रेम माझ पाहिलं …………… १
खिडकी माझ्या पाठीशी हळूच उघडून ठेवायची
तुला पाहण्याची मला वेगळीच ओढ असायची .
अचानक तुझी आणि माझी नजर एक झाली
कुठे हरवत चाललोय मनाला चाहूल झाली .
कारण प्रेम माझ पाहिलं ……………… २
कामानिम्मित गच्चीवर येउन घेऊन गेली माझ मन
तशीच उभी राहिली तू पाहत न कळत मी तुला केला हात
हात माझा पाहुनी गालातल्या गालात हसुनी
निघून गेली तू खाली तेंव्हापासून माझ्या प्रेमाची खरी सुरुवात झाली .
कारण प्रेम माझ पाहिलं ……………… ३
सुनील पंचलोटे
आयुष्य थोड बदललं
हसण्याची पद्धत तुझी मला पहिल्यासारखीच वाटते
आयुष्य थोड बदललं हाव -भाव मात्र कमी दिसते .
लाजताना गालावरची खळी तुझी अजून तशीच दिसते
आयुष्य थोड बदललं चेहर्यावर मात्र सुरकुत्या पडते .
डोळ्यातला तेजपण तुझ्या पहिल्यासारखाच चमकत होता
आयुष्य थोड बदललं डोळ्यावर मात्र चष्मा होता .
चालताना पण तू अजून तशीच वळून मागे पाहते
आयुष्य थोड बदललं कंबरेत मात्र थोडी वाकते .
आजपण तू तशीच दिसते जशी पहिल्यासारखी दिसत होती
आयुष्य थोड बदललं हाती मात्र काठी होती .
सुनील पंचलोटे
तू स्वप्नात का? येते
प्रेमच कारावास वाटत नाही
फक्त आठवण तुझी सतावते .
कळत नाही वेड्या मनाला
तू स्वप्नात का? येते .
खूप काही शिकलो ग मी तुझ्या प्रेमात
जणू नजर आणखी तुला पाहते .
सर्व काही घडूनही
तू स्वप्नात का? येते.
तूच हाक दिली होती
त्यात प्रेमाचेही नाते होते .
तेच प्रेम दुरावले असतानाही .
तु स्वप्नात का? येते .
प्रेमाने पहिले होते तू मला
का? फक्त नाटक केले होते.
खेळ माझा मांडून सुध्धा
तू स्वप्नात का? येते.
सुनील पंचलोटे
माझ्यातलं मि पण ?
माझ्यातला मी पण तीला
आता कळेनासा झाला आहे .
रोज बोलणे आता ती
माझ्याशी टाळत आहे .
थोडया फार भावना माझ्या
दुखविल्या तिने आहे .
तिला का समजत नाही
दुखं मी सोसत आहे .
मनातल माझ्या आता मी
मनात साठू किती .
ते पण आता या
हृदयांला टोचत आहे .
न सांगताच आता डोळ्यातले अश्रू
सुकलेल्या गालावर येत आहे .
आवर किती घालू त्याला
डोळे नुसते भरत आहे .
माझ्यातला मी पण आता
ती दूर हरवत चालली आहे .
अडीच अक्षरी प्रेम माझ
आता ती तोडत आहे .
सुनिल पंचलोटे
प्रेमाचे पहिले पान
प्रेमाचे पहिले पान माझे
दुमडून तू ठेऊ नको .
कदाचित करत नसेल
तू प्रेम माझ्यावर
पण,मैत्री माझी तोडू नको.
असेल कोणी मनात तुझ्या
जपून तू ठेव हृदयात
लागली ठेच कोणा हे मात्र सांगू नको .
दुखानी भरलेलं आयुष्य आपल
आपणच जगायचं असतं
नाही भेटला किनारा तरी
पोहायला मात्र शिकावं लागतं .
मन खरच वेड असत
कुठ गुंतलं सांगता येत नाही ।
गुंतलं जिथे तेच भेटलं
हे मात्र खर वाटत नाही.
मन वेड कि आयुष्य थोड
पण,संघर्ष करूनच जगाव लागत
एक फांदी तुटली म्हणून काय झाल
आधार दुसरीचा घ्याव लागत .
सुनील पंचलोटे
करत नाही प्रेम तर,…………….
मी येणाऱ्या वाटेत
तू डोळे लाऊन बसतेस
करत नाही प्रेम तर,
वळून का बघतेस .
कोणासोबत मी जवळून जाताना
तू हळूच लपून बसतेस
आलो कधी एकटाच तर,
हळूच चोरून बघतेस.
मावळताना दिवस कधी
मी बसतो समोरच्या अंगणात
मग का? तू हसत अशी
उभी राहते दारात .
गारठलेल्या थंडीत रोज
मी कॉलेजला जाताना का?
थांबतेस तू त्याच वाटेत
मी माघारी परत येताना .
आलीच कधी तू दुपारी
घराच्या समोर गच्चीत
टक लाऊन का पहातेस
माझ्या रुमच्या खिडकीत.
नाही तुझ्या काही मनात
तर समोर का येते
करत नाही प्रेम तर,
वळून का? बघतेस .
सुनील पंचलोटे
भोल भाबड प्रेम
भोळ भाबड प्रेम माझ
तुला कधी कळाल नाही
दूर तू गेली असली तरी
तुला मी विसरलो नाही .
माझच चुकल होत
तुझ्या सोबत प्रेम केल
आयुष्यभर विसरणार नाही
अस तू दुखं दिल .
विचारायचो मी नेहमी तुला
प्रेम करते का तू माझ्यावर
हसून उत्तर द्याची तू
सांगेल तुला ते झाल्यावर.
मी बघायचो तुला , मात्र
तू फिरायची कोणाबरोबर
जीव माझा जळायचा
अस काही पाहिल्यावर .
मी असेल कदाचित साधा
पण प्रेम मात्र आतून होत
गेली जवळून तू जरी
हृदय मात्र धडकत होत .
खूप विचार करायचो तुझा
अन डोळे भरून बघायचो
निळेभोर डोळे पाहुंन
त्यात क्षणभर हरवायचो .
शेवटी नाही झाली तू माझी
त्याच काही वाटत नाही
पण जे दिले दुखं तू
ते आता सोसत नाही .
सुनिल पंचलोटे
तुझे स्वर
मंद स्वराचा आवाज तुझा
हळूच पडला कानावरी
हा हा म्हणता नाजूक सरी
खेळू लागल्या अंगावरी .
सर -सर आवाज वेडा
येथून तेथे पळू लागला
सोबत घेऊन काही सरी
लपाछपी खेळू लागला .
हिरवीगार नटली झाडे
न्हाहून निघली चिंब चिंब
कड -कड -कड -कड आवाज सारा
जणू उमटले तुझे प्रतिबिंब .
गड -गड-गड -गड मधेच आवाज
भीती घालतो हृदयामध्ये
विसरून घरटी काही पंछी
गिरत्या घेती गगनामध्ये .
स्वर तुझे ते मंद सुराचे
ऐकून होती बेभान सारे
विसरून गेलो मी तुझ्यामध्ये
ऐकून तुझे ते वेडे गाणे .
सुनील पंचलोटे
चांदणी रात
कीर कीर कीर कीर आवाज सारा काना मध्ये खेळू लागल
दूर कुठे गोळा सोन्याचा डोळ्यावरती चमकू लागला
भयभिती होती पक्षी सारे लपून बसली झाडावरती
चंम चंम चमकून काजवे सारे चहु बाजूने प्रकाश देती
मधेच झोंबणारा नटखट वारा मज अंगाशी खेळून गेला
पाहतच राहाव त्या तुकड्याला जो वरुनी तुटुनी आला
करुनी डोळे बंद जरा मी मागावे थोडे काही .
हरउनी जावे त्या क्षणामध्ये जे मला काही भेटले नाही
हसती तारे काही मजला मनी जणू या वाटू लागले
बोल- अबोल या ओठामधे काही शब्द फुटू लागले
सुंगध थोडा दरवळू लागला रातराणी जणू फुलू लागली
चंमचंमनार्या चांदण्याची जणू अंगणामध्ये रास पडली .
मोजता तारे आकाशी काही टक मक ते पाहू लागले
सुटता वार्याची झुळूक थोडी डोळे माझे मिटू लागले .
सुनील
आवडत ग मला …………
आवडत ग मला तुज लाजण,
कधी चोरून -चोरून पाहण .
कधी बसून समोर,प्रेमाच्या गोष्टी करण .
आवडत ग मला तुझा सुंदर चेहरा ,
मनाला छेडणारा नटखट वारा .
कधी समोरून जाताना,
हळूच तुज वळून पाहण.
आवडत ग मला तुज नाजूक बोलण,
लाजून हळूच डोळ्याने सांगण .
काय आहे मनात माझ्या,
तुझ्या मानाने ओळखण.
आवडत ग मला,तुला भेटलेला प्रत्येक क्षण.
खांद्यावर ठेवून सिर,काही काळ विसावलेल वेड मन.
आवडत ग मला माझ्या मनातल तुला सांगण .
कधी माझ्या आणी तूझ्या मनाने ,हळूच दूर निघून जाण .
सुनील पंचलोटे
तू आणि पाऊस
तू कधी पावसात
सरी कोसळतात सरसर
रिम-झिम पावसात
कधी तो मुसळधार .
वेड व्हाव त्याच्या आठवणीन
भिजलेल मन तुझ
कधी येउन जाव त्याने घेऊन स्पर्श तुझ .
वाट पाहते तू कधी त्याची एखान्द्या प्रीयकरासारखी
नाही येत आठवण त्याला
तुझी प्रीयासिसारखी .
पावसात कधी तू बेधुंद होऊनी नाचते
हरवलेले मन तुझे वार्यावर डुलते .
पाहून तुला पावसात शब्द फुटतात ओठांवर
तू आणि पाऊस घेऊन कविता करावी मनात .
सुनील पंचलोटे
तुला पाहिल की,,,,,,
हूर -हूर होते मनात
तुलाच पाहतो मी
साखरेच्या zopit ,,,,,,,,,,,1
तुला पाहिल की
वाटते तू आहे एक चांदनी
zale मन पिसाट maze
सामावली तू या नयनी ,,,,,,,,,,2
तुला पाहिल की
वाटते पाहते तू चोरून
आणि पाहिले मी की ,
हळूच निघून जाते तू लाजुन ,,,,,,,,,,,3
तुला पाहिल की
वेडी होती माजी नजर
तुज्यासाठी फुटले
दगडालाही पाजर ,,,,,,,,,,,,,4
तुला पाहिल की
फूलते ही रातरानी
प्रेम जडले तुज्यावर
नाही जाते तू मनातुनी ,,,,,,,,,,,,5
सुनिल पंचलोटे
गुंतलेल मन
वेंड पीस मन माझ मनाशी काहीतरी सांगत होत .
तुझा गुरफटलेला चेहरा पाहून ते कुठे तरी गुंतलं होत .
कधी ना हसणारा सुंदर चेहरा आज फुलावानी फुलल होत .
शांत उभी असतानिसुद्धा मन तुझ भिरकत होते .
कधी न बाहेर जाणारे पाय आज हळूच चोरून बाहेर जात होते.
न बोलणार्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते .
गच्चीत बाहेर कधी नाही येणारी आज उन्हामध्ये न्हाहत होती .
न लाजलेली ती आज गालातल्या गालात हसत होती .
वेड मन तीच आता जागेवर दिसत नव्हत
कदाचित तिच्या मनात कोणी तरी बसल होत .
डोकावून न पाहणारी आज वाटेकडे पाहत होती.
येणाऱ्या -जाणार्या गर्दीमधून ती कोणाला तरी, निहाळत होती .
सुनील पंचलोटे
कस होत माझ प्रेम
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगतो
कधी कधी मी
स्वताला विसरून बसायचो .
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगतो
तुझी विचाराने मी
रात्रभर झोपत नव्हतो .
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगतो
आठ वाजता कॉलेज होत म्हणून
भेटण्यासाठी सात वाजता निघत होतो .
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगतो
तुझ्या प्रेमासाठी मी
बारावी नापास झालो होतो .
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगतो
हॉटेलाची उधारी देत देत
पारेषण मी होत होतो .
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगतो
तुला मोबाइल घेऊन देण्यासाठी
पार्टटाईम कामाला मी जात होतो .
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगतो
राहून उपाशी मी मात्र
तुल वडापाव आणत होतो .
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगतो
पैश्यासाठी मी माझ्या
आई वडिलांना भानाडत होतो
कस होत माझ प्रेम
खरच तुला सांगितलं
तुज्यापाई जीवन माझ
पाण्यात बुडाल .
सुनील पंचलोटे
दूर अशी जाताना
दूर अशी जाताना मागे वळून पाहू नको
हृदयामधले ते क्षण जागे आत्ता करू नको .
बसून पहिले मी तुला चांदण्याच्या अंगणात
न कळत घर केले तू माझ्या या हृदयात .
त्याच दिवशी भेटली तू रम्य एका संध्याकाळी
तू माझा आणि मी तुझी अशी तू म्हणाली .
पाहत होते टक लाऊन बसलेले पक्षी सारे
मनालाही खुणावत होते व्हाहणारे वारे .
जीवन माझ फुलवल तू समीप माझ्या येताना
रंग भरले नवे तू सोबत माझ्या असताना .
मागे वळून बघू नको दुए अशी जाताना .
सुनील पंचलोटे
चेहरा
का?विसरली ते क्षण का?विसरली पहिली भेट
पाहत होती लाजून तू आणि आज …।
माझ्या कधी मनातही आलं नव्हत तू अशी म्हणशील
ज्या गोष्टी बोलत होतो आज त्याच गोस्तीना तडा गेला .
तुझ्या डोळ्यात मी फक्त प्रेमच पाहिलं होत .
पण,त्या प्रेमाच्या आड पण,
एक वेगळाच चेहरा आहे हे मात्र मी तुझ्या प्रेमात विसरलो .
आता तुझ्या काही शब्दांनी हृदयाला पण भेगा पडतात .
जे हृदय फक्त तुझ्यासाठीच धडकत होत .
सुनील पंचलोटे
आठवणी
आठवण रोजच येते ,पण आज थोडी वेगळीच
प्रेमळ जिव्हाळा असलेला थोडा कमी.
कधी आठवण येत डोळ्यात अश्रू दाटत होते.
कधी कधी वेडे मन मनाशी रुसत होते,
का?अस झाल कदाचित विसरली तर नाही ना !
हळूच अंगाला स्पर्श करावा ,तस न होता काही भाऊक आठवणी मनात टोचल्या ,
रोजच येणारी आठवण तुझी थोडी थोडी कमी झाली ,
नाही दिसत मला त्याय प्रेमाने भरलेला झरा ,
पण याच आठवणी मनात कुठे तरी टोचतात ,
मनाला ठेच लागते ,हृदय तुटत ,
समोर काळोख पसरतो मग अंधारात कोणीच दिसत नाही .
दिसतो तो फक्त अंधार आणि त्या अंधारात मनाला टोचणार्या आठवणी .
परत अंधारातून बाहेर येउन मनात विचार येतो,
खरच आठवणी येतात,आठवणी जातात ,
आठवणी जपून ठेवतात,आठवणी सांगतात,
परत हृदयाला छेद पडून मनात विचार येतो
मग का?सर्वात शेवटी आठवणीच दुखवतात .
सुनील पंचलोटे
गारवा
नकळत मनामध्ये वेगळच काही येत
पाहता पाहता अचानक आभाळ पण दाटत .
रिमझिम-रिमझिम सारी काही वार्यासंगे खेळतात
हळूच कुठे येउन त्या सुंगध मातीस देतात .
वारा पण सैरावैरा कुठे पळ काढतो
भरलेल आभाळ सार सोबत दूर नेतो .
सुटतो नभामध्ये गार गार गारवा
गिरक्या घेण्या दूर जातो कुठे हा पारवा .
हिरवळीच्या गवतामध्ये कधी चमकतात मोती
मान डोलुनी गवताशी इशारा करती हिरवी पाती .
नाचतो पाण्यावर थेंब उडी घेऊन हळूच
पुन्हा सुरु होतो खेळ उन आणि सावलीचा लगेच .
सुनील पंचलोटे
पाउस
कुणास ठाऊक पण त्य पावसातील आठवण पुन्हा एकदा आली .
थेंब -थेंब पावसाच अंगाला स्पर्श करायचा .
मधेच सुटलेला तो नट-खट वारा अंगाला छेडायचा .
त्या पावसातील रूप तुझ आज पण आठवत .
चालत होती पावसातून तू अनवाणी पायाने
कधी उडवत पाणी .
चेहऱ्यावरचे केस बाजूला सारत
मनोसक्त पावसात आनंदाने भिजलेला तो सुंदर चेहरा
आजही डोळ्यासमोरून जात नाही .
जस कमळावरच्या थेंबाने अलगद खाली सरकाव
तसे काही थेंब तुझ्या नाजूक गालावरून खाली सरक होते.
हे डोळे मात्र विसरत नाही .
जाता जाता वळून पाहिलेला तो क्षण अजूनही मनात घर करून आहे .
सुनील पंचलोटे
साद
आपुलकीची साद देऊन हात माझा धरशील का?
विस्कटलेल जीवन माझ पुन्हा तू सावरशील का?
दवबिंदूला जपाव तस तुला मी जपत होतो
प्रतेक क्षणी तुला मात्र हृदयात मी ठेवत होतो .
ते काही क्षण मला अजूनही आठवतात
पुसलेल्या पायवाटा आठवण तुझी सांगतात .
आपुलकीची साद देऊन खरच तू येशील का?
सुटलेला हात माझा पुन्हा एकदा धरशील का?
सुनील पंचलोटे
अश्रू
लिहिताना मन माझ कधी कधी गहिवरतो
प्रत्येक अश्रू डोळ्यातला शब्दन -शब्द पुसतो
वाहणारी झुळूक मला काही तरी सांगत असते
विसरलेले काही क्षण आठवण करून देते .
तुझ्या काही आठवणी अजूनही मनात टोचतात
पाणावलेले डोळे मात्र वाट तुझी बघतात .
क्षणात काही घडत कधी मनाला पण कळत नाही
तू नाही या जगात आता हे त्याला पटत नाही .
सुनील पंचलोटे
आकाशी
घेऊन जाईल मी तुला या आकाशी
जिथ पसरल्या आहेत या लुकलुकणाऱ्या चांदण्या.
घेईन काही चांदण्या मी ठेवीन एकावर एक
स्वर्गाशेजारी बांधेन तुझ्यासाठी एक छोटस घर .
त्या घरात असेल फक्त तू आणि मीच
पण,चंद्र असेल साथीला
न लागावी नजर तुला त्या चंद्राची
म्हणून बांधेन मधी भिंत मी त्या सप्तधनुष्याची.
वरून पडणारा प्रत्येक थेंब हा
आपल्यासाठी मोती असेल.
करून काही गोळा थेंब मी
तुझ्यासाठी माळ घुंफेल.
मनोसक्त बागडू त्या चांदण्याच्या मळ्यात
हात तुझा माझ्या हातात फक्त स्वप्न या नयनात .
सुनील पंचलोटे
तुला पाहिलं कि ……….
तुला पाहिलं कि ……….
हूर -हूर होते मनात
तुलाच पाहतो मी
आत्ता साखरेच्या झोपित .
तुला पाहिलं कि
वाटते तू आहे एक चांदणी
झाल मन पिसत माझ
सामावली तू या नयनी .
तुला पाहिलं कि
वाटते तू पाहते मला चोरून
आणि पहिले मी कि
हळूच निघून जाते लाजून .
तुला पाहिलं कि
वेडी होते माझी नजर
तुझ्या साठी फुटेल
दगडालाही पाझर .
तुला पाहिलं कि
फुलते हि रात राणी
प्रेम जडले तुझ्यावर
नाही जाते तू मनातुनी .
सुनील पंचलोटे
दिवस असे कि……………।
आठवण आली तुझी कि
दिवस ते आठवतात.
हृदया मध्ये झाली दाटी कि,
भुरकून उडून ते जातात .
दिवस असे कि……… १
मन माझे तुझ्या मनाशी
थोडे -थोडे गुंतले होते.
नजर एक असताना सुद्धा
मात्र ते भेटत नव्हते .
दिवस असे कि……… २
तू मला आवडते हि मी
मनापासून सांगत होतो.
आज तुझी आठवण काढता
कंठ माझा दाटतो .
दिवस असे कि……… ३
मन माझ रमत नाही
आठवण तुझी काढता.
आठवण येते त्या दिवसाची
भुरकून उडून ते जातात .
दिवस असे कि……… ४
सुनील पंचलोटे
हो म्हणशील का?...........
मोकल्या माळरानावर तुला मी भेटेन
डोळ्यात पाहून तुज्या तुला आय लव यू म्हणेन .
सांग मला भेटशील का?
हात माझा धरशील का?
तू सुध्हा माझ्या डोळ्यात पाहून
मला आय लव्ह यु म्हणशील का?...
लांब -लांब केस तुजे हरनावनी डोळे
तुज्या डोळयात पाहून मला
प्रेमाची भाषा कळे ...
तुझा चेहरा रुदयात ठेवला मी
विसरून कसा जाणार
विश्वाश ठेव माझ्यावर
प्रेम फ़क्त तुझ्यावर करणार ..
एकटाच बसलो माळरानावर
वाट पाहत आहे तुझी
हो म्हणशील का?ग?
सांगना मला .............?
तू होशील का ग माझी ....
सुनील पंचलोटे
हळुवारपणे अचानक ती नकळत जवल आली
कानाजवळ येऊन मला विसरला तर नाही ना
अशी दबक्या आवाजात म्हणाली
मीही गडबडलो क्षणापुरता स्तब्ध झालो
बोलायच राहुन तीला स्वतःमध्येच हरवलो
कळलच नाही अचानक स्वप्न की खर आहे
हरवलेला आवाज तीचा कानी मात्र आला आहे
गडबडुन ऊठलो जागेवरून तर मागे ते ऊभा होते
तीही साडीत पोरासोबत पतीही शेजारीच होते
पळत आला मुलगा जवळ मामा मामा म्हणाला
हरवलेल प्रेम आता भाच्याच्या रुपात मिळाला...
सुनील पंचलोटे
आठवणी
आठवणींच्या ओझ्याखाली
मन दडपत का चाललय
प्रेमा आडचा चेहरा तुझा
मी कसा नाही गं पाहिलय
करायचच नव्हते प्रेम तर
सांग सखे वळुन मागे
मज ह्रदयास का पाझरलय
नको तुझ्या आठवणीत मज
डांबुनी मी ज्या ठेविल्या
वाळुवरच्या पाऊलखुणा
आज नकळत मी हरविल्या..
सुनील पंचलोटे
सहज तुला बघीतल होत
अन नकळत ह्रदय माझ धडकत होत
कळालच नाही या वेड्या मनाला
तुझ्यात आता ते गुंतल होत....
दचकून ऊठाव मी अलगद
भास तुझा होता क्षणी
हरलो मी तुझ्यात सखे
फक्त तुच आता ध्यानी मनी..
डुलाव गवतावरच्या मोतीने जस
मन माझ हवेशी मोकळीक साधत
इकडुन तिकडे घेऊन गिरक्या
तुझ्या शोधात ते फिरत...
सुनील पंचलोटे
प्रेम कविता सुनील पंचलोटे
प्रेम कविता
तुझ्याच गावामधून जेंव्हा
प्रेत माझ जाईल
काय असत प्रेम खर
याची जाणीव तुला होईल...
स्वप्न बघीतली होती तुझी
हातही तुझा माघीतला होता
करुनी ईतक प्रेम आज
तु हात माझा सोडला होता..
नव्हतच करायच प्रेम तुला
तर साथच का जोडली होती
राहुन सोबत माझ्या तु
स्वप्न दुसरे रंगवत होती..
पुर्ण विश्वास होता तुझ्यावर
मनासारखा वागत होतो
न भेटलो कधी तुला
तर वेडापिसा होत होतो..
वाढत गेले बंध जसे
तु हात माझा सोडत गेली
न सोसणारी जखम तु
मज ह्रदयात देऊन दुर झाली..
मी रडत आहे आठवणीत तुझ्या
तु हसत आहे पाहुणी मला
मी निघुनी जाईल दुर कधी
हे कळणारही नाही तुला..
तुझ्याच गावामधून जेंव्हा
प्रेत माझ जाईल
काय असत प्रेम खर
याची जाणीव तुला होईल...
सुनील पंचलोटे
अकेलापण
मै तो ठेहरा रेहता हुं किणारे
बात करते करते लहरोसे
अकेलापण का एहसास जो था
कैसी शिकायत करु अपनोस..
दो लंबोका फैसला ए
न जाने कंहा से कहांतक आ गया
मै बनकर एक अजनबी
बस सोचताही रह गया..
ए आवाज लहरोका कानोसे
गुफ्तगू करने लगा है मुझसे
मै भी कितना पागल था
जो उलझ रहा था हवावोसे..
सुनील पंचलोटे
अबोल प्रेम
हळुवारपणे अचानक ती नकळत जवल आली
कानाजवळ येऊन मला विसरला तर नाही ना
अशी दबक्या आवाजात म्हणाली
मीही गडबडलो क्षणापुरता स्तब्ध झालो
बोलायच राहुन तीला स्वतःमध्येच हरवलो
कळलच नाही अचानक स्वप्न की खर आहे
हरवलेला आवाज तीचा कानी मात्र आला आहे
गडबडुन ऊठलो जागेवरून तर मागे ते ऊभा होते
तीही साडीत पोरासोबत पतीही शेजारीच होते
पळत आला मुलगा जवळ मामा मामा म्हणाला
हरवलेल प्रेम आता भाच्याच्या रुपात मिळाला...
सुनील पंचलोटे

0 

Share


सुनील पंचलोटे
Written by
सुनील पंचलोटे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad