Bluepad | Bluepad
Bluepad
🙏बोटे संकुलचा वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम🙏
दत्तात्रय केरबा पाटील
दत्तात्रय केरबा पाटील
8th Jul, 2023

Share

"चिकोत्रा खोरे शिक्षण प्रसारक मंडळ हसुर (बू)" या संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी आदरणीय कै.एम.के.चौगुले सर यांच्या स्मरणार्थ "दरवर्षी एक गाव - वृक्षारोपण संकल्पना" हा स्तुत्य उपक्रम, संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश बोटे सर वे बोटे संकुलचे शैक्षणिक सल्लागार श्री.विठ्ठल बोटे सर यांनी राबवण्याचा संकल्प केला आहे.त्याची सुरुवात म्हणून आज शनिवार दि.07 जुलै 2023 रोजी 'खडीचा भैरोबा' देवालय परिसर तमनाकवाडा ता.कागल या ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला.
या उप्रमाची सुरुवात तमनाकवाडा गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सरपंच सौ.रंजना दत्तात्रय चौगुले यांच्या शुभहस्ते उत्साहात करण्यात आला.यावेळी 40 वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.या कार्यक्रमासाठी बोटे संकुलच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोटे सर, संस्थेचे शैक्षणिक सल्लागार विठ्ठल बोटे सर, श्रीमती.सुरेखा चौगुले मॅडम,शिक्षकस्टाफ मधून संतोष जाधव सर, उमाजी पाटील सर, अरुण पाटील सर,ऋषिकेश खतखले सर, राज माने सर व दत्तात्रय पाटील सर व संस्थेचे सर्व विद्यार्थी आदी उपस्थित होते.🌷
यावेळी संस्थेच्या वतीने श्री.संतोष जाधव सरांनी आदरणीय सरपंच चौगुले वाहिनिंचे व त्यांच्या पतींचे स्वागत केले व आपला अमूल्य वेळ या उपक्रमासाठी देवून या स्तुत्य उपक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार व्यक्त केले.✍️
धन्यवाद.🙏
लेखन : श्री.दत्तात्रय के पाटील(लीड को ऑर्डीनेटर, बोटे संकुल)🌺
M - 7058098139

0 

Share


दत्तात्रय केरबा पाटील
Written by
दत्तात्रय केरबा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad