कुठल्या शब्दात करू तुझे कौतुक!
तूच माझा पहिला शब्द
तूच माझ्या जीवनाचा पुस्तक,
इवलासा जीव माझा
इतका का जपतेस,
हरवून स्वतःला माझ्यात
मलाच पुन्हा शोधतेस?
घराला आपल्या तुझ्यामुळेच आईपण,
विसंबून तुझ्यावर घरातला देवपण,
तुझा वावरच आहे
आपल्या घराचा शृंगार,
बाबांच्या तर तू आयुष्याचा आकार,
दुःख दिसता समोर
घालतेस त्याला काटेरी कुंपण,
कर्तुत्व पाहून तुझे
सुखालाही हवी असते आपले घर,
इतकी सुंदर कशी ग तू
चंद्रालाही असतो की दाग,
शोधायला चूक तुझी
सोडत कशी नाही एकही माग,
जग एकीकडे असले तरी
तुझेच पारडे ओझे होते,
शब्दही बहरतात
लिहिताना तुझे गीते,
अनमोल जीव मिळाला
मला तुझ्या पायी,
तुझ्या ममतेचे सदैव
ऋणी ग मी आई,
तुझ्या ममतेची सदैव
ऋणी ग मी आई....
लेखणी-सुरैय्या शेख.