ग्रामीण भागातील पालकांना आपल्या मुलामुलींना इंग्लिश मिडीयम शाळेला पाठवण्याची सोय व्हावी आणि शहरातील मुलांच्या बरोबरीने आणि किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आजच्या या गुणवत्तेच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये खेड्यातील मुले सुद्धा चमकली पाहिजेत,या स्वच्छ आणि निर्मळ हेतूने आदरणीय प्रकाश बोटे सर व आदरणीय विठ्ठल बोटे सर या दोन बंधूंनी प्रकाश सरांचे सासरे आदरणीय कै.चौगुले सर यांच्या अनमोल सहकार्याने चिकोत्रा खोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित "बोटे इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स,कापशी(से)" या शिक्षण संकुलाची स्थापना केली.या छोट्याशा रोपट्याचे 'याची देही याची डोळा' आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.प्रकाश बोटे सर व विठ्ठल बोटे सर या दोघांच्याही सौभाग्यवती यांचे सुद्धा या यशामध्ये अनमोल असे सहकार्य आजतागायत आहे.🌷
मुळातच हे सर्वजण शिक्षण क्षेत्रामधील गाढे अभ्यासक आणि अनुभवाचे असल्यामुळे,शिक्षण क्षेत्रात लागणारे अमुलाग्र बदल ज्या त्या वेळी करण्यात त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले.✍️
या शिक्षण संस्थेमध्ये शिकणारे कित्तेक विद्यार्थी ,विद्यार्थिनी आज वेगवेगळ्या खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात उच्च पदावरती किंवा वेगवेगळ्या व्यवसायात यशस्वीरित्या कार्यरत आहेत.ज्या ज्या वेळी हे विद्यार्थी सरांना भेटतात त्यावेळी अगदी आदरपूर्वक शाळेविषयी व आपल्याविषयी अगत्याने विचारपूस करतात.या सर्व गोष्टींमुळे छाती अगदी अभिमानाने भरून येते असा ठसा चिकोत्रा खोऱ्यातील आणि जिल्यातील लोकांच्या मनावर बोटे संकुलणे उमटवला आहे.✍️
आज बोटे संकुलाचा जो इतका पसारा आणि व्याप वाढला आहे,याच खर श्रेय शाळेचा सर्व शिक्षकवर्ग,संस्थापक आणि व्यवस्थापनवर्ग तसेच शाळेसाठी कष्टाची कामे करणारी ड्रायव्हर,मावशी, ऑफीस बॉय ही मंडळी आणि शाळेशी निगडित इतर सहकारी यांना जातं.🙏
गुणवत्ता टिकवण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या दर्जेदार शिक्षणपद्धतीबद्दल संस्थापकांनी कधीही तडजोड केली नाही.योग्य व्यवस्थापन आणि काटेकोर नियोजन या जोरावर आजवर ही शाळा महाराष्ट्राच्या नकाशावर अभिमानाने डोलत आहे.🌺
मुलांना शाळेत ने आन करणेसाठी संस्थेने खास केलेली बसेसची सोय,शाळेची स्वामालकीची सुसज्ज व टोलेजंग प्रशस्त इमारत ,तज्ञ व अनुभवी शिक्षक स्टाफ,प्रशस्त ग्राउंड, पिण्यासाठी स्वच्छ आर ओ चे पाणी,लांबच्या विद्यार्थी,विद्यार्थिनींना खास हॉस्टेलची व कॅन्टीन ची सोय, सुसज्ज ग्रंथालय,प्रशस्त जिमण्याशियम हॉल,प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र वर्ग व टॅब द्वारे मोठ्या स्क्रीनवरती लीड (Lead) या शिक्षण सॉफ्टवेअर च्या मार्गदर्शक तत्वानुसार दिलं जाणारं शिक्षण, शिक्षकांचे दररोज लीड कोऑर्डीनेटर(सर्वेक्षकांच्या) मार्फत होणारे मूल्यमापन आणि बरच काही. ही सगळी बोटे संकुलाची ठळक वैशिष्ठ्ये ज्यामुळे संस्था आज अनेक उंच उंच यशाच्या शिखरावरती अभिमानाने आहे.🙏
बोटे संकुल याहीपेक्षा अधिक बहरत जाओ आणि अधिक अधिक प्रगत होत जाओ हीच चीकोत्रा खोरेवासियांच्या मार्फत शुभ सदिच्छा व प्रार्थना.🙏
धन्यवाद...🙏
लेखन : श्री.दत्तात्रय के पाटील, गलगले.🌺
म - 7058098139.