राजेहो…राजकारणाचा खेळ
अहो, खूपच विकृत झाला
खुर्चीच्या लोभापायी…
जणू तत्वांचा लिलाव मांडला
मते मागतांना उमेदवार
प्रतिपक्षावर उडवतो शिंतोंडे
निवडणूक झाली की…
छान गातात एकमेकांचे गोडवे
सत्ता सुंदरीच्या नादात
स्वाभिमान ठेवलाय गुंडाळून
लोकशाहीची सर्वच तत्वे
सत्ता मोहात टाकली जाळून
सत्ताधाऱ्यांनी सत्तेची आयुधे
धाक दाखवायला काढली
इडी ची गाडी अंगणात येता
भल्या भल्यांची निष्ठा जळाली
आज भ्रष्टाचारी दिसणारा
उद्या मंत्रीपदावर बसतोय
कळत नाही निमिषार्धात त्याला
कोणता साबण निर्दोष धुतो?
मतदार बिचारा दुबळा…
चक्क महागाईत शिजतोय
सकाळच्या विरोधक संध्याकाळी
मंत्रीपदाची शपथ घेतोय !
मी का केले हे ? सांगायला
सगळेच काढतात मस्त वेळ
विकासाच्या प्रश्नांवर सा-यांनी
खरोखरी मांडला हुतुतुचा खेळ
काय ते सरकार!काय ते पक्ष!
काय ते फोडाफोडीचे धंदे!
सत्तेच्या मस्तवाल जत्रेत
जनतेचे पंचाहत्तरीत खायचे वांदे
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सत्तेचा खेळ !
राजेहो…राजकारणाचा खेळ
अहो, खूपच विकृत झाला
खुर्चीच्या लोभापायी…
जणू तत्वांचा लिलाव मांडला
मते मागतांना उमेदवार
प्रतिपक्षावर उडवतो शिंतोंडे
निवडणूक झाली की…
छान गातात एकमेकांचे गोडवे
सत्ता सुंदरीच्या नादात
स्वाभिमान ठेवलाय गुंडाळून
लोकशाहीची सर्वच तत्वे
सत्ता मोहात टाकली जाळून
सत्ताधाऱ्यांनी सत्तेची आयुधे
धाक दाखवायला काढली
इडी ची गाडी अंगणात येता
भल्या भल्यांची निष्ठा जळाली
आज भ्रष्टाचारी दिसणारा
उद्या मंत्रीपदावर बसतोय
कळत नाही निमिषार्धात त्याला
कोणता साबण निर्दोष धुतो?
मतदार बिचारा दुबळा…
चक्क महागाईत शिजतोय
सकाळच्या विरोधक संध्याकाळी
मंत्रीपदाची शपथ घेतोय !
मी का केले हे ? सांगायला
सगळेच काढतात मस्त वेळ
विकासाच्या प्रश्नांवर सा-यांनी
खरोखरी मांडला हुतुतुचा खेळ
काय ते सरकार!काय ते पक्ष!
काय ते फोडाफोडीचे धंदे!
सत्तेच्या मस्तवाल जत्रेत
जनतेचे पंचाहत्तरीत खायचे वांदे
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "