*दिग्गजांचा जन्म हा संघर्षाच्या मुशीतूनच होत असतो*
थेट दिग्गज म्हणून कोणीही जन्माला येत नाही. अथवा जन्मजात कोणीही दिग्गज नसतो. संघर्षाची पराकाष्ठा हि दिग्गज निर्माण होण्यास जन्मास कारणीभूत ठरते. आपल्या मध्ये विविध कालागुण ठासुन भरलेले आहेत. याच कलागुणांचा विस्तार आणि विकास होताना त्या क्षेत्रातील महान ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होण्यासाठी पराकोटीचा संघर्ष श्रम करावे लागतात. आपल्या नेतृत्व कौशल्याने, कलागुणांनी अमोघ वाणीने, तसेच विविध गुण कौशल्याने त्या क्षेत्रातील योग्य अशी उंची गाठणे अथवा बाप माणुस होण म्हणजे दिग्गज ठरणे होय. दिग्गजांचा जन्म हा एकाच क्षेत्रांत होत नसुन काला, क्रीडा संस्कृती ,राजकारण समाजकारण, उद्योग, व्यवसाय नोकरी, शेती , अध्यात्म , तंत्रज्ञान,अशा अनेक अनेक क्षेत्रांत संधी आहेत आपल्या मध्ये असणारे सुप्त कलागुणांना वाव देताना यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून स्वंय विकास होणं म्हणजे स्वाभाविकच त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व घडण. कोणीही दिग्गज व्यक्तिमत्व रातोरात किंवा क्षणार्धात निर्माण होत नाही किंवा अचानक प्रकट होत नाही. अथवा चमत्कार होऊन उदयाला येत नाही. त्या साठी अनियंत्रित श्रम घेण्याची तयारी लागते. आज पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या दिग्गज व्यक्तिमत्वापैकी कोणीही थेट दिग्गज म्हणून जन्माला आलं नाही. तर प्रत्येक दिग्गजांला संघर्षाच्या मुशीतूनच जन्म घ्यावा लागतो हे अगदी वास्तव आहे. दिग्गज होण्यासाठी कोणी आभाळातून पडले अथवा विशेष प्रयत्न करून जन्माला आले असे होत नाही. सुरवातीला ते सुद्धा आपल्या सारखेच सर्व साधारण व्यक्ती होते. आणि सर्वसाधारण असतात पण जीवन मार्गावर परस्थिती सोबत खडतर संघर्ष करताना आपल्या आवडत्या क्षेत्रात अहोरात्र प्रयत्न करून स्वतःला झोकून देऊन,संयम ठेवत कठिण अति कठीण परिस्थितीत सुद्धा विचालित न होता स्वतःच्या धेय्या प्रति समर्पित राहताना संयम टिकवून संघर्ष चालू ठेवावा लागतो. अगदी संयम तुटण्याची वेळ सुद्धा येऊ शकते पण तरी हि संघर्ष चालूच ठेवला तरच दिग्गज घडायला सुरुवात होते. म्हणून खडतर कठिण संघर्षशिवाय कोणी हि दिग्गज घडत नाही. आपण जे विद्यमान स्थितीतही वेगवेगळ्या क्षेत्रातील काही व्यक्तिमत्व दिग्गज म्हणून परिचित आहेत. त्यापैकी सर्व दिग्गज मान्यवरांची पुर्व पार्श्वभूमी पाहिली अवलोकन केले अभ्यासल तर आपसुकच असं लक्षात येईल कि कोणीही दिग्गज एका रात्रीत निर्माण झालेला नाही असं इतिहासात कुठेही सापडणार नाही. अनंत संकट अनंत अडचणी अनेक लोकांकडून अवहेलना अनंत वेळ अपमान सहन करून संघर्षाशाची पराकाष्ठा करून अगदी धीर संपुष्टात येण्याच्या वेळेला दिग्गज घडयाल सुरुवात होते. सध्याची विद्यमान पिढी थोडी आळशी आणि प्रत्येक गोष्ट अगदी सहज किंवा सहजा सहजी कशी मिळेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचे कष्ट,मेहनत न करता किंवा सहज स्वरूपात मिळविण्यासाठी प्रयत्नशिल असताना प्रथम दर्शनी पाह्यला मिळत आहे हे कटु सत्य आहे. परिश्रम मेहनत करण्याची मानसिकता कमी होत चालली आहे. या मध्ये बदल होण अपेक्षित आहे. बदल करण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे पण तशी मानसिकता सध्या तरी दुर्मिळ होत चालली आहे. आणि रातोरात कसं मोठं होता येईल यावरच मंथन चिंतन करतांना बहुतेकांचा कल दिसतो आणि त्याच पद्धतीने प्रयत्न करताना सुद्धा अनेकांना आपण पाहतोय. परंतु या मध्ये मधला मार्ग वापरून यशस्वी होता येत नाही. संघर्ष नको असल्याने नैराश्यचा जन्म होतो. आणि मग त्या मधुन आपलं अपयश कोणाच्या तरी माथी मारून स्वतःला त्या मधून दोष मुक्त करण्याची कवायत चालू होते. खापर फोडता फोडता आपण तिथंच आपल्या संघर्षाला पुर्ण विरामा देतो आणि दिग्गज होण्या पासुन वंचित राहतो. खरया अर्थाने मग तिथुनच एक वेगळा असा नकारात्मक निराशावादी जीवन प्रवास चालू होते. मुळात आपण चुकतो कुठे तर दिग्गज हा रात्री मध्ये घडत नाही. आणि आपण रात्री मध्ये दिग्गज होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपण अशक्य प्राय बाब शक्य करण्याचा प्रयत्न करतो. मग हे शक्य कस होणार यासाठी आपण अनेक मधले मार्ग देखिल अवलंबतो. पण तरीही आपल्या पदरी निराशाच का ? पडते तर खडतर प्रवास करून अनेक संकटं वादळ सहन करून सुद्धा अगदी संयम संपणार त्या वेळी कुठं दिग्गज घडायला सुरुवात होते आणि आपण सुरवात होण्या अगोदरच माघार घेतो परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. दिग्गज होण्यासाठी वास्तविक दुरदृष्टी प्रचंड संयम अनंत अवहेलना सहन करण्याची ताकद लागते त्याच बरोबर किती तरी वादळं सहण करण्याची ताकद, शक्ती आपल्या मध्ये निर्माण झाली पाहिजे. हिच अद्भुत शक्ति आपण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत नाही हे आपलं खरं दुर्दैव आहे. दिग्गज होण फार काही अवघड नाही. अशक्य तर मुळीच नाही .परंतु खडतर संघर्ष करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते हि मानसिक तयारी आपली नाही. आपण यशाची पाहिली पायरी सुरू होण्यापूर्वी आपण माघारी फिरतो. वास्तविक दिग्गजांचा जन्म हा संघर्षाच्या मुशीतूनच होत असतो .
गणेश खाडे
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301