कौटुंबिक इतिहास :-
नेहरूजींना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होत. त्यांचे पूर्ण नाव पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी नेहरू असे होते. नेहरूजींचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 ला उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथील सधन अशा ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे या काळात प्रसिद्ध बॅरिस्टर आणि सुप्रसिद्ध समाजसेवक होते. नेहरूजींना राजकारणाचे धडे त्यांच्या कुटुंबातूनच प्राप्त झाले होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण घरी पूर्ण कर करण्यात आले होते. ते पंधरा वर्षाच्या असताना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी 1910 मधे केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर 1912 मधे त्यांनी इंटर टेम्पल कॉलेजमधून बॅरिस्टरचे शिक्षण पूर्ण केले. बॅरिस्टर झाल्यावर 1912 मधे ते भारतात परतले.
राजकारणात प्रवेश:-
भारतात परतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली. इसवी सन 1916 मध्ये त्यांचे लग्न काश्मिरी पंडित परिवारातील कमलाकौर यांच्याशी झाला .त्यांना एक मुलगी होती त्यांचे नाव इंदिरा.पूढे त्या इंदिरा गांधी झाल्या . इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून नावारूपास आल्या होत्या. 1917 मध्ये नेहरूजी अलाहाबाद येथील होमरूल मध्ये सहभागी होऊन होमरूल चे सचिव बनले आणि अशा प्रकारे ते राजकारणात सक्रिय झाले.त्यानंतर ते देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रगण्य असलेल्या गांधीजींना भेटले. त्यामुळे त्यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. ते गांधीजींना आपले आदर्श मानत . गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाने ते खूपच प्रभावित झाले होते. 1920 -22 च्या गांधीजींच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांनी विदेशी वस्तूंच्या त्याग करून स्वदेशीचा वापर करण्यास सुरुवात केली आणि ते खादीचे कपडे घडू लागले.1924 मध्ये ते इलाहाबाद नगर नियम चे अध्यक्ष झाले दोन वर्ष अध्यक्ष म्हणून कामगिरी केल्यानंतर त्यांनी 1926 मध्ये अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. 1926 ते 28 पर्यंत ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव होते. 1928 मध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन मोतीलालजी नेहरू यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आले होते त्या अधिवेशनात कार्यकर्त्यांचे दोन गट निर्माण झाले होते पहिल्या गटातील पंडित नेहरू आणि सुभाष चंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी रेटून धरली ; तर दुसऱ्या गटातील मोतीलालजी नेहरू आणि अन्य कार्यकर्त्यांनी ब्रिटिश शासनाच्या अधिपत्याखाली संपन्न राज्याच्या मागणीवर भर दिला.सत्याग्रहाच्या विविध चळवळींमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि स्वतःचे आत्मचरित्र लिहिले. डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते या अधिवेशनात भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता . 26 जानेवारी 1930 ला नेहरूजींनी स्वतंत्र भारताच्या झेंडा फडकवला याच काळात गांधीजींचे सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू होते . या आंदोलनात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले आणि इंग्रजांना या आंदोलनात करण्यात आलेल्या मागणीवर विचार करणे भाग पडले . 1936 मध्ये नेहरूजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनले.7 आगस्ट 1942 ला पंडित नेहरू यांनी इंग्रजांना उद्देशून भारत छोडो चा नारा दिला. भारत छोडो आंदोलनामुळे नेहरूजींना अटक करण्यात आली होती. देशातील अनेक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आणि अनेक क्रांतिकारांच्या बलिदानाने 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
पंतप्रधान म्हणून केलेले कार्य :-
पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर च्या काळात भारताची आर्थिक स्थिती बिकट होती. भारताला आर्थिक क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी नेहरूजींनी महत्त्वाची भूमिका पार पाडले. त्यांनी मजबूत राष्ट्राचा पाया रचला. तत्कालीन भारतात विज्ञान आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन दिले. कांगो करारात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. नेहरूजींनी पंतप्रधान म्हणून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आणि भारताच्या विकासाला चालना दिली. नेहरूजींनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मात्र ते आपल्या कार्यकाळात आपले शेजारी देश असलेले , पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सोबत चांगले संबंध निर्माण करू शकले नाहीत.
साहित्य क्षेत्रातील कामगिरी :-
नेहरूजींनी साहित्य क्षेत्रात सुद्धा भरपूर योगदान दिले. त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र , दुनिया की इतिहास का ओझरता दर्शन , भारत एक विश्व , सोवियत रुस , विश्व इतिहास की एक झलक , भारत की एकता और स्वतंत्रता ,या सारख्या सुप्रसिद्ध ग्रंथांचे लेखन केले.1944 मधे त्यांनी तुरुंगवासात असताना डिस्कवरी ऑफ इंडिया या सुप्रसिद्ध ग्रंथाचे इंग्रजीत लेखन केले तर नंतर या ग्रंथाचे हिंदी आणि भारताच्या इतर भाषेत सुद्धा अनुवाद करण्यात आले.
1955 मध्ये त्यांना भारतरत्न हे भारतातील सर्वोच्च पदक देऊन गौरविण्यात आले होते. 1962 मध्ये झालेल्या चीन बरोबर युद्धानंतर नेहरूजींची प्रकृती खालावत गेली आणि शेवटी 22 मे 1964 ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे भारतीयांवर शोककळा पसरली होती. भारतीय स्वातंत्र्याच्या या शिल्पकाराला शतशः नमन.
नेहरूजींना गुलाबाची फुलं फार आवडायची ते नेहमी गुलाबाचे फुल आपल्या शेरवानीला लावायचे. नेहरूजींना मुलांबद्दल खूप आवड होती. त्यांना मुले खूप आवडायचे त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा बालक दिन म्हणून साजरा केला जातो.