तुमच्या माझ्याआठवणीतल आपल जुने घर! कधी आई, कन्ये च्या आणि तुमच्या भावभक्ती ची कापूर फुल नि धूप उदबत्ती,ची दरवळ🌹 तर कधी सजल ते घर पुत्र राजेच्या गणपती सजावटीच्या मकर आराशीत ते घर 🌹पै पाहुण्या ची सरबराई , तुमचे माझे सुख दुःख चे क्षण, कामा वर जायची घाई 🌹 उभ्या आयुष्याचा खुला रंग मंच च ठरलं ते घर,, बाजूच्या उंबर वृक्षा च्या थंड हवे ची झुळूक, घरात खेळणाऱ्या मनी माऊची जवळीक 🌹कुणी केले वितन्ड वाद, कुणी फसविले, कुणी क्षण दिलें सुखाचे, जय पराजय, यश अपयशचे दुःख सोसले या घराने 🌹 पंच पक्कवान पुरणपोळी, एकां रात्रित दहा दहा मेनु च्या आईने केलेल्या दीपवाळी च्या फराळात, अगदी चटणी भाकरी खमंग झुणक्यात ही, आनंदले घर माझ्या विविध सरस्वती आई च्या सहित्य सेवे ने 🌹 मंगल कार्य मुलांची, नि नातवण्डा च्या आगमनात किती आनंदाले हे घर, अगदी तुमच्या माझ्या सेवानिवृती च्या निवांत पणात सामील झाले हे घर 🌹 ..प्रिय तमा आई च्या अखेर च्या निरोपने गहिवरले हे घर , तुमच्या अंतिम निरोपी तुमच्या पुन्हा पुन्हा मागे वळून पाहण्याने खुप खुप दुखावले ते आपले लडके कल्याण चे घर 🌹 . माझ्या साठी खुप खुप रिते झाले होते ते घर , दिवसा उजेडी नि रात्री च्या अंधारी ही तुमच्या नंतर माझे अश्रु पुसून, काना कोपऱ्या च्या आठवणीत, हातुन सुटलेल्या सुखाला शोधत, माझी समजुत घालत होते ते तुमचे माझे घर 🌹((7 साथ 7 साथ परस्परांच्या राहिलो तिथे म्हणून ही आज आठवणी च्या सुगंधात शोधते मी तिथे कधी कधी हरविलेले प्रत्येक क्षण🌹आई सरस्वती चे मानते आभार, लेखणी तिचीच , शब्द ही आई सरस्वतीचे, मी माध्यम छोटेसे, देते ती भावनांना आधार 🌹... . .सुलभा हनुमान वाघ.=7=7=2021.शुभ दुपार, निवांत वामकुक्षी ची