Bluepad | Bluepad
Bluepad
मोठा अनर्थ टाळण्यासाठी तणावाला वाट मोकळी दिली पाहिजे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
7th Jul, 2023

Share

*मोठा अनर्थ टाळण्यासाठी तणावाला वाट मोकळी करून दिली पाहिजे*
तणाव मनात साठवला तर त्याचा उद्रेक कधी होईल हे आपल्याला पण समजणार नाही म्हणून तणाव साठवण्या ऐवजी त्याला वाट मोकळी करुन देणं कधीही हितकारक ठरत.मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे.पण शाश्वत जीवनात मोह माया, स्वार्थ मोह , भौतिक अशा अपेक्षा नसतात पण संसारीक भौतिक जीवनात मात्र अनेक अशा अपेक्षा मोह, स्वार्थ,अंहकार असल्याने दैनंदिन जीवनात अनेक तणतणावाचे प्रसंग निर्माण होतात.आणि याच तणावाचे जीवनात व्यवस्थपान करण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर मनात रागाचा संचय निर्माण होऊ शकत नाही हे वास्तविक सत्य आहे . सर्व साधारण पणे आपल्याला अधुन मधुन प्रचंड मोठ्या प्रमाणात अनावर होणारा राग येत असतो .तो येण स्वभाविक आहे आणि हा प्रचंड राग हा एकाएकी अथवा अचानक येत नाही. तर तो अनेक दिवसांपासून आपल्या मनात एक प्रकारचा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने जो तणाव संचय निर्माण झालेला असतो त्याच तो उद्रेक असतो. वास्तविक पाहिलं तर जीवनात सुख दुःख हे समीकरण असतंच. आणि व्यक्ती कोणीही असो कर्म भोग हे कोणालाही चुकत नाहीत. त्यामुळे जीवनातील सुख दुःख यापासून स्वतः ची सुटका कोणालाही करून घेणं शक्य नाही तरी सुद्धा दैनंदिन अनेक विषयांच्या अनुषंगाने आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक भाव प्रकट होत असतात.ते निर्माण होणं स्वाभाविक आहे.आपण ज्या विचारांना खतपाणी घालतो ते विचार आपल्यावर प्रभाव निर्माण होऊन तसे विचार निर्माण होत असतात .वारंवार निर्माण होणारे नकारात्मक विचारांचे तणावात रूपांतर होऊ देयचे नसेल तर आपण आपल्या मनातील तणावाला योग्य वेळी वाट मोकळी करुन देऊन मन मोकळं अथवा रिक्त केलं पाहिजे आणि ते गरजेचं आहे. असं केलं नाही तर मग हाळुहळु निर्माण होणाऱ्या या तणावाचे शेवटी प्रचंड अशा मोठ्या रागात रूपांतर होतं. म्हणजे राग हा कुठल्याही प्रकारचा असो एका क्षणात निर्माण होत नाही हे अगदी धुतल्या तांदळासारख स्वच्छ आणि वास्तव सत्य आहे. एक एक टप्प्याने हळूहळू मनात राग संचाय होऊन तो आपलं रूप विस्तार करत असतो .आणि याच वेळी आपण नेमकं दुर्लक्ष करतो .आणि याचवेळी आपण हि परस्थिती ओळखु शकलो तर मग मात्र आपल खुप मोठा नुकसान टाळण्यात यशस्वी होतो .तसंच प्रचंड अशा येणाऱ्या मोठ्या रागा पासुन स्वतः ला वाचवु शकतो .रागाच व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिन नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे . आहार हा सात्विक असला पाहिजे, दैनंदिन व्यवस्थित संवाद , वाचन , अध्यात्मिक वाचनपण खुप महत्वपूर्ण आहे . तेव्हाच आपण दैनंदिन जीवनात अगदी तणाव मुक्त राहु शकतो . म्हणजे जीवनात येणारा प्रचंड राग आणि त्यामुळे होणार आपलं प्रचंड नुकसान थांबु शकत.व त्याचे आपल्या जीवनावरील विपरीत परिणामही आपण कुठं तरी नियंत्रित करू शकतो. म्हणून तणाव मुक्ति हि खूप आवश्यक आहे. आणि आपण ती नक्कीच करू शकतो . त्यासाठी आपण कितीही व्यस्त असलो तरी दिवसभरात शरिरासाठी साधारणतः एका तसाचा वेळ आपण दिला पाहिजे. जेणेकरून निर्माण झालेला थोडा तणाव त्याच दिवशी संपुष्टात येईल . तसेच संवाद म्हणजे एक आठवड्याच्या दरम्यान आपल्याला मानसिक स्थैर्य देखिल मिळेल व स्थिर मन शांत होईल . संवाद देखिल खुप महत्वाचा आहे .मन तणाव मुक्त होईल असा संवाद देखिल झालाच पाहिजे. संवाद हे तणाव मुक्ति चे अगदी सुयोग्य साधन आहे .या साधनाचा योग्य लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. आपण ज्या व्यक्तिशी संवाद साधल्या नंतर आपल्या मनाला हलकं वाटत बरं वाटत मन शांती मिळते .आशा व्यक्तिला अंहकार बाजुला ठेवून आवश्यकतेनुसार वैचारिक संवाद साधला पाहिजे .असे शब्द आपल्या कानावर पडताच क्षणी आपण तणावमुक्त झाल्यासारखे आपल्यला वाटत असतं .आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव त्याचे रागात होणार रुपांतर होण्या ऐवजी तो जगीच संपुष्टात येतो. दैनंदिन जीवनात वाचन मग ते काही पण वाचा पण वाचन आवश्यक आहे .वाचाल तर वाचाल हे उगीच म्हटलं नाही आणि त्यामध्ये हि अध्यात्मिक वाचन केले तर आति उत्तम आहे .आणि या पद्धतीने आपण आपल्या जीवनात निर्माण होणारा शारिरिक मानसिक तणाव कमी करू शकतो. आणि पर्यायाने त्याचे रागात होणार रुपांतर आपण नक्कीच थांबवु शकतो . स्वतःचा बचाव करून आपण आपलं मोठं नुकसान टाळु शकतो .आणि एक ज्ञान पुर्ण शांत स्थिर जीवन आपण जगु शकतो .
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक, तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad