चॉकलेट खा मस्त जीवन जगा
(प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार)
प्रत्येक दिवसाला आपण कशाचा तरी संबंध जोडतोच. आज काय म्हणे तर जागतिक चॉकलेट डे. फार पूर्वी लहान मुले रडायला लागली की यांच्यापुढे आई चुरमुरे ठेवायची. एकेक चिरमुरा खात मुले शांत व्हायची. त्यानंतर खाण्याच्या पद्धतीत बदल झाला. शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू, बिस्किटे यांचा समावेश झाला. कालांतराने विविध प्रकारचे चिप्स आले. सद्या चॉकलेट जमाना आहे. लहान मुलांना देखील त्याचे सर्व प्रकार माहीत आहेत. मॉलमध्ये गेल्यावर मुलांचे लक्ष पहिले चॉकलेट वर जाते. आपल्याकडे देखील आता चॉकलेट तयार होवू लागली आहेत. काहीजण चिरतरुण असतात. त्यांना चॉकलेट ची उपमा देतात. काही जणांनी चॉकलेट वर आपले प्रेम जमवले आहे. चॉकलेट प्रत्येकाचे तोंड गोड करते. अनेकवेळा चॉकलेट खावू नका असा सल्ला दिला असतानाही त्याकडे सोयीस्कर रित्या डोळेझाक केली जाते. चॉकलेट आवडत नाही असा अरसिक माणूस शोधून देखील सापडणार नाही. स्वस्तात मस्त अशी त्याची ओळख आहे. अती बोलणाऱ्या माणसाला गप्प करायचे असेल तर त्याला चॉकलेट खायला देतात. आजकाल जाहिरातीत देखील चॉकलेट खाण्यावर भर दिला जातो. चॉकलेट हिरो चॉकलेट हिरॉईन हे शब्द त्यातूनच रूढ झाले आहेत. चॉकलेट खाणे चांगले की वाईट हा जरी वादाचा मुद्दा असला तरी चॉकलेटचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.