खूप पाहिले जगात,प्रसिद्धीसाठी काम करणारे
काम करूनही,प्रसिद्धी टाळणारा एखादाच.....
खूप पाहिले जगात, विनाकारण श्रेय लाटणारे
स्वतः कार्य करून,दुसऱ्यास श्रेय देणारा एखादाच.....
खूप पाहिले जगात शिक्षक,विद्यार्थीप्रिय असणारे
ज्यांच्यासाठी शाळा कुलुपबंद,असा गुरू एखादाच.....
खूप पाहिले जगात, फोटोसाठी दानधर्म करणारे
एका हाताने अन्नदान,दुसरा हात अजाण एखादाच.....
खूप पाहिले जगात ठक, गोड बोलून तुरी विकणारे
न बोलता गहू विकणारा, मितभाषी एखादाच.....
खूप पाहिले जगात,नाते एकमेकांना लुबाडणारे
बंधू कलियुगातही, रामाला लक्ष्मण एखादाच.....
खूप पाहिले जगात, भक्त साईबाबांना भजणारे
साईला-बाबाला पुजनीय शिवराज असा एखादाच.....