Bluepad | Bluepad
Bluepad
जिथं अकारण काहिच घडतं नाही ते राजकारण
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
6th Jul, 2023

Share

*जिथ अकारण काहिच घडत नाही ते राजकारण*
जे आपल्याला अपेक्षित नसतं तेच पाहायला मिळत .कोण कधी कोणासोबत कशासाठी एकत्र येईल हे सर्व सामान्य माणसाच्या कल्पकते पलिकडे असतं. सर्व सामान्य माणस याला भावनात्मक घेता म्हणून अशा सनसनाटी वारंवार निर्माण केल्या जातात . सनसनाटी निर्माण करणं निर्माण होणं आणि चर्चा चालू राहण मग ती सकारात्मक असेल असो नकारात्मक पण लोकांना विचार कारण्यास भाग पाडण हा राजकारणाचा अविभाज्य भाग असतो .अयोध्या ते द्वारका आणि हास्तीनापुर ते लंका सत्ता नाट्य आणि राजकारण टाळु शकले नाहीत. तर उर्वरित ठिकाण यापासून वंचित कशी राहतील अथवा अपवाद कशी ठरतील.कालखंड कोणताही असो सत्ता म्हटलं राजकारण आलंच बहुतांश लोकांच्या मनावर प्रभाव निर्माण करणार राजकारण हे दिसत तितकं सहज आणि सोप नसत .राजकारणाचा प्रभाव नाही असं कोणतंही क्षेत्र सध्यातरी शिल्लक नाही . प्रत्येक क्षेत्रावर कळत न कळत राजकारणाचा प्रभाव निर्माण झालेला आहे. राजकारण हे सत्ता सुंदरी आहे सत्ता हि सुंदरी असल्याने ती आपल्याला मिळाली पाहिजे यासाठी प्रत्येकाचं नियोजन चालू असतच. तसं पाहिलं तर सुंदरी हि कोणाला नको आहे .म्हणून सुंदरीसाठी जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणारच मग मार्ग कोणाताही असो अंतिम धेय्य हे तर सुंदरीच असतं .आणि हेच ध्येय साध्य करण्यासाठी राजकारण तर होणारच हेच राजकारण वरकरणी पडद्यावर जे दिसत तसं पडद्या मागे नक्कीच नसतं.पण पडद्यामागे नेमकं काय असतं हे लोकांना मात्र माहित नसत याचच नाव राजकारण बुद्धीबळाचा पट आणि राजकारणाचा पट हा जवळपास सारखाच असतो .एकदा का पटावर सोंगट्या टाकल्या कि नंतर फक्त जिंकणे आणि जिंकणे हाच मुख्य उदेश असतो . तत्व, निष्ठा,सत्व याला तिलांजली देऊन जिंकण्यासाठी मग त्या पैकी कोणत्याही सोंगटीचा बळी गेला तरी काही हरकत नाही अथवा खेळणाऱ्याला फरक पडत नाही.हा खेळ पाहणारे सर्व सामान्य लोक भावनिक असतात तर खेळवणारे दुरदृष्टी हित डोळ्यासमोर ठेवून बुद्धीने खेळत असतात तिथं भवनिकता हि शुन्य असते.सर्व सामान्य माणसाच्या जे पचणी पडणार नाही त्याला सुद्ध भाषेत राजनिती म्हणतात. राजनिती हा सुद्धा एक युद्धाचा भाग आहे युद्ध म्हटलं कि सगळं आलं .म्हणून राजकारणात अकारण असं काहीच घडत नसतं . प्रत्येक घटनेला एक मोठी किनार असते .सामान्य माणूस हा भावनिक असतो .हिच भावनिकता ओळखून अनेकदा भावनिक लाट निर्माण व्हावी अथवा मुळ विषयापासून लोकांना दुर घेउन जाण्यासाठी अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात.अथवा घडण्यासाठी रणनिती आखली जाते .सत्ता कोणतीही असो त्या ठिकाणी असं घडतंच असतं.सर्व सामान्य माणसाला पचणी पडणार नाही अशा घडामोडी घडण म्हणजे नियोजित पटकथेचा एक भाग असतो . निर्माता सोडता सिनेमाची मुळ कल्पना फार इतर कोणालाही नसते.सिनेमा कशासाठी हे निर्माता सोडता कोणीही सांगू शकत नाही. पाहणा-याला सुद्धा फार काही लक्षात येतं नाही.लक्षात येऊ न देण हेच निर्मात्यांच कसब असतं . बाकी याला आपण काय समजतो हा आपल्या विवेकाचा विषय आहे. शह काटशह हे दिसायला वरकरणी असतात काही बाबी विषय हे वेळेनुसार अपरिहार्य असतात. मात्र त्याला वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर सादर केला जात . बाकी सगळं सिनेमा सारखं पटकथा लिहून सगळं लोकांना एकदाचं पचणी पडणार नाही. म्हणून एक एक कडी आणि एक एक पुडी हाळुहळु वेळेनुरूप सोडली जाते .आणि निर्माण झालेली लाट हि दुसरया लाटेला कमकुवत दुबळ करण्यासाठी वापरली जाते.यापालिकडे फार काही तथ्य आणि सत्य या मध्ये नसतं. अगदी रामायणा पासुन महाभारता पर्यंत कालखंड कोणाताही असो त्या त्या काळात कालखंडात प्रत्येक बाबा घटना हि अकारण घडत नाही . त्या मागे भविष्यातील खुप मोठ्या बाबी दडलेल्या असतात. राजे महाराजे पुर्वी दुरदृष्टी ठेवुन रणनितीचा एक भाग म्हणून अनेक वेगवेगळ्या योजनांची आखणी करायचे अनेक योजना ह्या सर्व सामान्य माणसाला पचणी पडत नाही हे वास्तव आहे पण राजकिय दृष्टीने हा एक रणनितीचा भाग असतो .रणनिती हि कधीच भावनिक नसते .खेळाचा आनंद घेता आला पाहिजे त्रयस्थ म्हणून खेळांकडे पाहयच असतं. तसंच राजकारण या खेळाकडे सुद्धा पाहयच असतं. राजकिय लोक खेळ खेळत असतात आणि सर्व सामान्य लोक त्यावर मंथन चिंतन करत आपला वेळ खर्च करत असतात आणि कधी कधी तर या मधुन सर्व सामान्य माणस टोकाची कटुता घेतात.हि परस्थिती बदलण्यासाठी राजकारणाचा गाभा समाजाला पाहिजे आणि भावनिक न होता राजकारणातल राजकारण समजलं पाहिजे . जेणेकरून भावनिक होऊन आपलं नुकसान होणार नाही.याची काळजी आणि दक्षता घेऊन सामाजिक पातळीवर सतर्क असलं पाहिजे.आणि राजकारणामुळे निर्माण होणाऱ्या लाटांच्या तडाख्यात आपलं आयुष्य आणि भविष्य उध्वस्त होता कामा नये त्यासाठी राजकारणात अकारण काहिच घडत नाही हे आपल्याला समजलं पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad