ह्या जगण्याच्या प्रवाहात वाहताना स्वतःच काही वेगळं अस्तित्व असावं, कशासाठी तरी धडपडाव 'ही तळमळ प्रत्येकात जो पर्यंत येत नाही तोवर नवं असं काहीच स्वतःसोबतच वावरणाऱ्या समाजाला देवू शकत नाही. वावरताना बरीच माणसं प्रवाहात मिळतात त्यातली काही राहतात काही निघून जातात परंतु या सगळ्यातुन खरोखरच काही तरी चांगल करायचे आपले प्रयत्न असतील तर ते प्रयत्न यशस्वी करण्यासाठी या प्रवाहात वेळोवेळी उत्तमोत्तम माणसंही विधाता आपल्यासोबत उभी करतो. आपल्या संकल्पनेतून विधाता आपल्यासोबत उभा आहे आणि असतो हे एकदा की मनगटात फिट बसवलं कि लढण्याला कीती सहजतया सामोरे जाता येते ही सगळी भावना विलक्षण असते.
विकास आग्रे (विकी)१६१४ (५/७/२३)