कायम अबाधित मनाच्या गाभाऱ्यातील ती जागा
देव भेटला नाही म्हणून भक्ताने का करावा त्रागा
प्रतीक्षा सरली नाही तरीपण जीव समाधानी होतो
जेव्हा भक्ताला भेटाया देवही,दोन पावलं पुढे येतो
माझ्यात तो त्याच्यात मी,तरीही स्वतःपासूनच दूर
अखंड चालली परीक्षा,पण हा जीव किती मजबूर
प्राक्तनात नसलेले मिळवण्या,जीवाचा आटापिटा
संपणारच नाही का कधी,नियतीची ही क्रुर थट्टा
दर्शनाची ओढ जरी मनी, पुण्य पडते थोडे कमी
याहून तर नरक बरा,कशाला हवी स्वर्गाची हमी