निष्पक्ष विचारधाराच वैचारिक प्रगल्भ परिपक्व समाज घडवु शकते
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
5th Jul, 2023
Share
*निष्पक्ष विचारधाराच वैचारिक प्रगल्भ परिपक्व समाज घडवु शकते*
विचारधारा जशी तसा त्या युगाचा कालखंड ठरत असतो .आपलं जीवन सुद्धा आपण जी विचारधारा स्वीकारली आहे त्या नुसार घडत असतं . मुळात विचारधारा जितकी पवित्र आणि शुद्ध निरपेक्ष निष्पक्ष सत्यनिष्ठ वाट्याला येईल तितकीच उंची आपली वाढत असती.आपण स्वीकारलेली विचारधारा आपली बौद्धिक उंची ठरवते .आपण काय स्वीकारलं पाहिजे हे खुप महत्वाच आहे पण सध्या स्वीकारण्यासाठी घाई गडबड होत असल्याने वाट्याला जे येतं आहे त्या मुळे आपली दिशा चुकतं आहे हे सध्या स्थिती मधील दुर्दैव आहे. परिपक्वता, प्रगल्भता हा आदर्श समाज रचनेचा आत्मा आहे.हा आत्मा सजीव रहणयसाठी विचारधारा हि निष्पक्ष व सत्यनिष्ठ असली पाहिजे.सामाजिक पातळीवर वैचारिक प्रगल्भता खुप महत्वाची असते. प्रगल्भता हे सक्षम समाजाचं रचनेच लक्षणं आहे.पण सध्या सामाजिक पातळीवर वैचारिक गोंधळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे कि सत्य काय असत्य काय आहे.हेच मुख्यत्वे समजायला तयार नाही . त्याच बरोबर कोणती विचारधारा स्वीकारली पाहिजे अथवा हितकारक ठरेल हे कोणालाही समजायला तयार नाही.विचारांच प्रकटीकरण अथवा विचारधारेच उगमस्थान हेच स्थिर नाही निष्पक्ष आहे .मग निर्माण होणारे विचार हे सत्यनिष्ठ कसे असतील .एका बाजुला झुकलेली विचारधारा समानता राखु शकत नाही .ती एकाच बाजुला झुकलेली असल्याने दुसरी बाजू अस्पष्ट दिसणारं त्या मुळे मध्य समजाणार नाही हे सध्याच्या काळातील दुर्दैव असल्याने खरया सत्य विचारांपासून वंचित राहण्याची वेळ हि आपल्यावर येण्याच्या दिशेने आपलं मार्गक्रमण चालू आहे.निष्पक्ष व सत्यनिष्ठ विचारधारा हि वैचारिक प्रगल्भ परिपक्व समाज घडवत असते .युग कोणतही असो सामाजिक पातळीवर वेगवेगळ्या विचारधारा ह्या कार्यरत असतात ज्या विचारधारेचा प्रभाव निर्माण होईल त्या पद्धतीने सामाजिक पातळीवर संस्कारा, संस्कृती, सामाजिक आचरण घडत असतं .समाज मनातील अज्ञान दुर होण्यासाठी तसंच वैचारिक प्रगल्भता वाढीस लागण्यासाठी निष्पक्ष विचारधारा कामी येते. विचारधारा हि निरपेक्ष निष्पक्ष असेल तर सामाजिक पातळीवर वैचारिक प्रदुषण होत नाही .प्रदुषण हे विघातकच असतं मग ते निसर्गाचं पर्यावरणाचा असो कि सामाजिक पातळीवर वैचारिक असो ते शेवटी अहितकारक ठरत .समाज आणि सामाजिक संस्कृती हि नेहमीच विचारधारेच्या अवती भवती फिरत असते. ज्या पद्धतीच्या विचार धारेचा प्रभाव वातावरणात म्हणजे सामाजिक पातळीवर निर्माण होईल त्यानुसार सामाजिक स्थिती व संस्कृती लोक विचार रूढ होत असते .विचारधारा निर्माण होत असताना ज्या पद्धतीचा प्रभाव आहे तशीच विचारधारा प्रकट होत त्यानुसारच त्याच समाजात प्रकटीकरण होतं असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या एकंदरीत जीवनशैली वर कळत न कळत होत असतो त्याच बरोबर हा प्रभाव समाज व्यवस्थेवर देखिल होत असतो . वास्तविक विचारधारा हि सक्षम समाज निर्मितीचा पाया आहे.हा पाया सध्या खुप खिळखिळा झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून समाज मनातील संभ्रम दुर होण्या ऐवजी वाढत चालला आहे. वातावरणात निर्माण झालेलं अज्ञानाच मळभ हे दिवसेंदिवस कळकुट होत चाललं आहे हि चिंतनाची बाब आहे. निरपेक्ष आणि वास्तव चित्रण करणं हे खरं विचारधारेच काम असतं पण विचार धार जर प्रभावित असेल तर त्या मधुन सत्य निष्ठ आणि निरपेक्ष चिंतन प्रकट कसं होईल.आणि मग निरपेक्ष सत्यनिष्ठ विचारधारां निर्माण न झाल्यामुळे खरया अर्थाने समाजहितासाठी अपेक्षित आहे ते कार्य होणार नाही. स्वच्छ सुर्य प्रकाश हवा आहे पण आपण सगळे अंधाराचं साम्राज्य स्वीकारण्यासाठी उतावीळ असु तर मग सुर्य प्रकाश कसा लाभेल .सध्या विचारधारेचा महापुर आहे पण महापुरतील पाणी गढुळ असल्याने ते पिण्याच्या योग्य नसतं त्या मुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत . स्वच्छ पाणी हेच जीवनदायी असतं . तसंच विचारधारा हि पण स्वच्छ असली पाहिजे.पण खरी उणीव हिच आहे ती म्हणजे निरपेक्ष सत्य निष्ठ विचारधारा दुर्मिळ होत असल्याने समाज मनातील संभ्रम कमी होण्या ऐवजी वाढीस लागला आहे.सामाजिक पातळीवर असो कि व्यक्तिगत पातळीवर सध्या खुप मोठ्या प्रमाणात वैचारिक प्रदुषण झालं आहे.याच कारणही तसंच आहे.विचारधारा निर्मिती ठिकाण वाढली आहेत पण ठिकाण वाढताना विचाराधारा मात्र निष्पक्ष नाही हिच सगळ्यात मोठी अडचण झाल्याने वास्तव काय हेच समजायला तयार नाही. त्याचे परिणाम म्हणून प्रगल्भ समाज निर्माण होण्या ऐवजी अधांतरी तरंगत राहिल अशीच दिशाहिन वैचारिक स्थिती सामाजिक पातळीवर वाढली आहे परंतु या सगळ्या मध्ये निष्पक्ष विचाराधाराच तारणहार ठरू शकते म्हणून सामाजिक पातळीवर निर्माण होणारी वैचारिकता हि निष्पक्ष निर्माण झाली पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक, तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य