Bluepad | Bluepad
Bluepad
पर्यायी मार्गच मुलांना मोबाइल च्या चक्रव्युहातुन बाहेर काढु शकतो
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
4th Jul, 2023

Share

*पर्यायी मार्गच मुलांना मोबाइल चक्रव्युहातुन बाहेर काढु शकतो*
मुलांकडून होणारा मोबाईलचा अनियंत्रित वापर कमी करण्यासाठी पालकांनी संवाद वाढविणे गरजेचे आहे त्याच बरोबर आपल्या मुलांना खेळाची गोडी , धार्मिक वाचणं आणि मोबाईल टिव्ही सोडुन,वेळेच योग्य नियोजन करून मुलं जास्ती जास्त वेळ व्यस्त कशी राहतील आणि मोबाईल पासुन दुर कशी ठेवता येतील याचं अचुक नियोजन करणं हितकारक आहे.मुलं आणि मोबाईल असं काही सुत्र सध्यातरी गती मान झालं असल्याने मुलांचा जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल मध्ये जात असल्यामुळे व्यक्तिमत्व विकास, अभ्यास,याच बरोबर जीवनशैली वर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत.तर अनेक प्रकारचे आजार उदभवण्याचा धोका देखिल निर्माण झाला आहे.मोबाइलच्या माध्यमातून वेगवेगळे खेळ प्रकार आणि त्याच्या अगदी आहारी जाऊन टोकाची भूमिका किंवा निर्णय घेताना अनेक बाल्य अवस्थेतील मुलं आपण पाहतोय मोबाईल आणि टिव्ही यापासून मुलांना दुर ठेवणं कोणत्याही पालकांना सध्या तरी शक्य नाही .परंतु हाळुहळु त्याच प्रमाण कमी करून पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं आहे . पर्यायी व्यवस्था म्हणजे मोबाईल आणि टिव्ही यापासून मुल कसे जास्तीत जास्त दुर राहतील यासाठी योग्य नियोजन करून मोबाईलच्या विळख्यातून त्यांना नक्कीच बाहेर काढु शकतो .पण तशा पद्धतीच नियोजन करणं खुप महत्वपूर्ण आहे.मोबाईल व टिव्ही मधील वेगवेगळ्या खेळ प्रकारात मुलं इतकी मग्न झाली आहेत कि अक्षरशः भुक लागली आहे याची जाणीव न होणं म्हणजे किती खोलवर परिणाम झाला आहे . त्यामुळे , अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं इथं पर्यंत ठिक आहे. परंतु मोबाईल वापरावर प्रतिबंध घातला म्हणून काही मुल स्वतः च्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या जीवावर उठण्याचे प्रकार हळूहळू घडत आहेत . प्रथम दर्शनी हे प्रमाण खूप कमी असलं तरी भविष्यात याच रूद्र रूप पाहायला मिळु शकत. म्हणून योग्य वेळी पालक म्हणून आपण जागृत होऊन योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे .
सोशल माध्यमातील वेगवेगळे प्रकार मोबाईल , टिव्ही , वेगवेगळे सिनेमा त्यातील विविध घटना यांचा मुलांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊन अगदी टोकच पाऊल उचलण्या पर्यंत काही मुल गेली आहेत . काही त्या दिशेने आहेत तर काहीची सुरुवात आहे आज सुपात असणारा उद्या जात्यात असतो . म्हणून एकंदरीत सर्व मुलं हि सोशल मध्यमा च्या विखाळयात घट अडकतान पाह्यला मिळत आहे. हे भायनक असं वास्तव आहे . आणि यावर योग्य वेळी उपयोजना करून हा विळाखा तोडण्याची आवश्यकता आहे.मुलं हि भावी नागरिक असतात देशाचं समाजाचं भविष्य असतात आणि बाल वयात ज्या पद्धतीने त्यांच्या संस्कार होतात त्याच पद्धतीने ती घडतात . त्यांच्या जडणघडणीत वेगवेगळ्या पैलुचां समावेश असतो. आपण कितीही चाणक्ष असलो तरी आपली मुलं आपल्यला चुकवून आपल्या परोक्ष काही बाबी करत असतात हे अगदी सत्य आहे .हे कोणीही पालक म्हणून नाकारू शकत नाही. आणि नाकारलेच तर कुठं तरी आपण सत्या पासून फारकत घेतोय . परंतु याला काही मुल हि नक्कीच अपावद पण आहेत हे पण सत्य आहे . परंतु बहुतांश मुलं या पद्धतीने वावरताना दिसतात.पालक म्हणून आपल्याला कुटुंब चालवायचं असतं दैनंदिन कामकाज कराव लागत आपण पुर्णवेळ लक्ष देऊ शकत नाही. आणि ते शक्य पण नाही . सगळ्यात महत्त्वाची बाब हि आहे .कि मुलं नेमकी सोशल नेटवर्कर जसं टिव्ही मोबाईल वेगवेगळे देशी विदेशी गेम या विळाखयात कशी अडकली .याची मुख्य कारण काय तर आपण लहान असताना गल्ली गल्ली मध्ये वेगवेगळ्या ग्रामीण खेळात मुलं ज्या पद्धतीने मग्न होत असत . सध्या हे सगळे खेळ बंद नव्हे इतिहास जमा झाले आहेत . आणि मैदानी खेळ हे पण संपुष्टात आले आहेत .आज खुप कमी मुलं मैदानी खेळात प्रविण व मग्न असतात तसेच आजी आजोबा यांच्या कान गोष्टी अध्यात्मिक ज्ञान , शेजारी वगैरे यांच्याकडील गप्पा गोष्टी हे सगळं बंद झाल्यामुळे मुलां जो रिकामा वेळ मिळतो .आहे त्यामध्ये मुंल स्वतः ला एकट समजतात आणि मग मोबाईल हा आपला खरा साथीदार आहे असं त्यांना वाटतं आणि असं वाटण स्वभाविक न्याय सांगत आहे. करमणुकीच साधन बंद झाली . दार खिडक्या बंद प्रथा सुरू झाली .अनेक मुलं एकत्र येऊन काही खेळ खेळतात ते सुद्धा संपुष्टात आलं.आणी मुलं अगदी एकलकोंडी झाली मोकळ फिरता येत नाही. संवाद साधण्यासाठी शेजारी जाण्याची किंवा इतर मुलांकडे जाण्याची सुविधा नाही मग हि एकटी पडलेली मुलं करणार तरी काय यावर योग्य आणि आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे . मुलं आणि पालक यांच्या मध्ये समन्वय वाढला पाहिजे मुलांना आपण मुलं न समजता मित्र समजुन त्यांचं मनमोकळा झालं पाहिजे असा संवाद साधला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज महापुरुष यांच्या विषयी माहिती आपण कथा स्वरूपात सांगितली पाहिजे मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे . दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ मुलं वेगवेगळ्या कामांत व्यस्त कशी राहतील याच नियोजन आपण केले पाहिजे. अध्यात्मिक ज्ञान गोडी निर्माण व्हावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आणि वाचन गोडी लावली पाहिजे . जेणेकरून मुलां मध्ये सद्गुण विकसीत होईल.आणि भविष्यात उदभावणारा खुप मोठा धोका आपण टाळु शकतो . आणि एक सुयोग्य व सक्षम पिढी निर्माण करू शकतो. याची सुरुवात होण गरजेच आहे. म्हणून चुकीच्या सवयी बंद करण्यासाठी योग्य पर्याय शोधुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चित मुलांच भविष्य बदलु शकत.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad