Bluepad | Bluepad
Bluepad
सर्वोत्कृष्ट गुणवत्ता हाच स्पर्धेच्या युगात टिकण्याचा प्रभावी मार्ग
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
4th Jul, 2023

Share

*सर्वोत्कृष्ट गुणवत्ता हाच स्पर्धांच्या युगात टिकण्याचा प्रभावी मार्ग*
सध्याचं युग हे गतीमान जग आहे त्यामुळे स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्वतः मधील सर्व श्रेष्ठ अशी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. त्या शिवाय इतर दुसरा कोणाताही उपाय कामी येत नाही. आयुष्यात दुय्यम स्थान प्राप्त करून काहीच निष्पन्न होण्या सारखी स्थिती सध्या तरी राहिलेली नाही. हिच परिस्थिती सध्या सगळ्यांचं क्षेत्रातील असल्याने स्वतःला कोहिनूर होता आलं पाहिजे. कोहिनूर होता येणं हे जीवनातील टार्गेट असलं पाहिजे. स्पर्धेच्या युगात गुणवत्ता हेच स्थिती बदलण्याचं माध्यम असुन ते आज तरी सगळ्या साठी खुलं आहे.महणुन गुणवत्तेच पेटंट अजुन तरी कोणाच्या नावे रजिस्टर झालेलं नाही . आपल्या मध्ये जर नेतृत्व,क्षमता, दातृत्व, कर्तृत्व,‌जिदद, चिकाटी, प्रचंड मेहनत, करण्याची दैदिप्यमान इच्छा शक्ति,आकांक्षा, महत्वकांक्षा आहे आणि ती आपण सिद्ध करू शकलो तर नक्कीच आपण आपला नावलौकिक सिद्ध करू शकतो.जीवनातील बहुंतशी बाबी ह्या वडिलोपार्जित परंपरा ,रूढी या नुसार प्राप्त होत असतत. तर बहुतांशी बाबी ह्या आपल्याला आपल्या गुण-कौशल्यांचा वापर करून जीवनामध्ये अर्जित कराव्या लागतात.गुणवता मिळवत असताना जात ,धर्म,पंथ,गरीब, धनवान,हा भेद नसतो ज्याच्या मध्ये क्षमता आहे तो आपली गुणवत्ता सिद्ध करत असतो . त्या मुळे समाजांत आपला दर्जा रातोरात बदलत असतो . म्हणून आपला दर्जा बदलण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करणे खुप आवश्यक आहे .जगातील बहुतांशी वस्तू ,पदार्थ , आपल्या दैनंदिन वापरातील विविध बाबी ज्या मध्ये जनरल स्टोअर्स पासुन सर्व गोळ्या औषधे,थंड पेय , वेगवेगळे खाद्य पदार्थ पर्यंत श कंपनी चा निर्माता व्यक्ती हा आपल्या नावाने पेटंट नोंद करतो ते इतरांना वापरता येत नाही. म्हणून एकदा निर्माण केलेल पेटंट कायम असतं. ती बाब वस्तू ज्या व्यक्तीने समूहाने निर्माण केली आहे .आणि त्याचं पेटंट घेतल आहे त्या व्यतिरिक्त जगातील इतर कोणीही व्यक्ती त्याच्या कडे त्या संदर्भातील किती हि प्रचंड ज्ञान माहिती अनुभव असला तरी हि पेटंट नोंदविलेली बाबा वस्तू तो निर्माण करू शकत नाही .किंवा तशाच पद्धतीची वस्तू बाब बनवू शकत नाही . त्याला ज्याचं पेटंट आहे. त्याच्या सोबत करार करावा लागतो .किंवा संमती घ्यावी लागती .आणि पेटंट धारकाची मान्यता मिळाल्यानंतरच तशा पद्धतीने वस्तू,बाब बनवता येते परंतु याला अपवाद आहे तो गुणवत्तेचा गुणवत्ता ही अशी एक वस्तू आहे बाब आहे.कि ज्याचं पेटंट अजून तरी जगात कोणाच्या नावावर नोंदवलेल नाही . ते सर्वा साठी खुल आहे. तसेच गुणवत्ता हि सिद्ध करण्यासाठी कोणाची मान्यता परवानगी ची आवश्यकता लागत नाही . आपण मिळवलेली गुणवत्ता ही आपला सामाजिक राजकीय आर्थिक दर्जा जीवनमान बदलवतो आपल्याला आपलं जीवन बदलायच असेल तर गुणवत्तेच शिवाय दुसरं काही कामी येत नाही .विविध बाबींच पेटंट हे ज्यांनी पेटंट निर्माण केला आहे त्यांच्यानंतर सुद्धा अनेक पिढ्या ते पेटंट त्यांच्या नावे राहते परंतु गुणवत्ता हे असे एकमेव पेटंट आहे जे पिढी बदलली कि बदलते म्हणून ज्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी मोठी संधी आहे अशा क्षेत्रात जो नियमित सातत्य ठेवून चिकाटीने आत्मविश्वासाने प्रयत्न करेल तो नक्कीच स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून जगातील कुठली ही बाब आपल्या दैदिप्यमान इच्छाशक्तीने मिळू शकेल म्हणून गुणवत्ता अशी एकमेव बाब आहे कि जी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व नावलौकिक मिळविण्यासाठी सामाजिक ,राजकीय, सांस्कृतिक, काला ,क्रीडा, कृषी ,उद्योग ,व्यवसाय तसेच विविध बाबींमध्ये किंवा क्षेत्रात आपली स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून आपल्या स्वतःच एक वेगळं स्थान अस्तित्व निर्माण करण्याची संधीही उपलब्ध आहे .परंतु आपण या संधीचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. कारण अजून तरी जगामध्ये गुणवत्ता नावाची जी बाब आहे त्याचं पेटंट कुणाच्याही नावावर नाही .म्हणजेच जो ज्या क्षेत्रात अथक प्रयत्न करेल सातत्य ठेवेल आणि शेवटच्या क्षणा पर्यंत प्रयत्न करेल त्या क्षेत्रामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करेल तो यशस्वी होऊन नावलौकिक मिळवेल . अशी संधी फक्त गुणवत्तेमुळे सर्वांना उपलब्ध आहे .फक्त त्याचा यथायोग्य लाभ किंवा उपयोग आपल्याला जीवनामध्ये करून घेता आला पाहिजे .आणि सगळ्यात महत्वाची बाब प्रथम ज्या विषयांमध्ये आपल्याला स्वारस्य आहे किंवा आपलं नावलौकिक करण्याची इच्छा आहे . असं क्षेत्र निवडून त्या मध्ये आपली सर्वोत्तम गुणवत्ता सिद्ध करून आपण यशाच्या शिखरावर पोचू शकतो .त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मध्ये असणारी प्रचंड ऊर्जा, चेतना ही चुकीच्या दिशेने चुकीच्या कार्यासाठी व्यतित करण्यापेक्षा सुयोग्य, सार्थक लोक कल्याणकारी समाज, हितकारक व स्व हिताच्या दृष्टीने योग्य दिशेने वापरली पाहिजे प्रत्येक व्यक्ती मध्ये सर्वश्रेष्ठ गुणवत्ता आहे परंतु ती गुणवत्ता फक्त सिद्ध होणे बाकी आहे म्हणून या पृथ्वीवर बिना गुणवत्तेचा कोणीही व्यक्ती नाही .फक्त आवश्यकता आहे ती स्वतः मध्ये असणारी गुणवत्ता योग्य कार्यासाठी सिद्ध करता आली पाहिजे .आणि योग्य नियोजन करुन यशाचं शिखर गाठता आल पाहिजे .कारण गुणवत्ता हि सगळ्यांसाठी खुली आहे जो सिद्ध करेल तो नावलौकिक नक्कीच मिळेल
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad