Bluepadटाईम महाराष्ट्र न्युज- राज्यात दलीत नागरिकावर होत असलेल्या अन्यया बाबत त्वरीत कारवाई करण्याची मागणी :- वंचित बहुजन आघाडी
Bluepad

टाईम महाराष्ट्र न्युज- राज्यात दलीत नागरिकावर होत असलेल्या अन्यया बाबत त्वरीत कारवाई करण्याची मागणी :- वंचित बहुजन आघाडीटाईम महाराष्ट्र
टाईम महाराष्ट्र
20th Jun, 2020

Share

लोणार दिंनाक 19/06/2020 प्रमोद वराडे


लोणार :- प्रतिनिधी
कोरोना काळात सबंध जग बंदीस्त असतांना राज्यातील जातीयवाद उफाळुन आलाय अशा अनेक अत्याचाराच्या घटना राज्यात या दोन महीन्यात घडलेल्या आहे या सर्व घटनांच्या बाबतीत ठोस कारवाई पोलीसाकडुन झालेली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार लोणार यांना निवेदन देउन याबाबत राज्य शासनाने कडक पाउल उचलावे अशा प्रकारची मागणी केली
कोरोना काळात सबंध जग बंदीस्त असतांना राज्यातील जातीयवाद उफाळुन आलाय अशा अनेक अत्याचाराच्या घटना राज्यात या दोन महीन्यात घडलेल्या आहे या सर्व घटनांच्या बाबतीत ठोस कारवाई पोलीसाकडुन झालेली नाही यामध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा गुन्हेगारांना मिळतो आहे तसेच त्या त्या भागातील मंत्री , पालकमंत्री व स्थानिक आमदार निष्कीय दिसुन येतात राज्याच्या गृहमंत्रयाचा त्यांच्यावर वचक राहीलेला नाही असा आरोप सुध्दा निवेदनातुन केला आहे महाराष्ट्राच्याविविध भागात जातीय अत्याचाराचे गुन्हे घडलेले आहे हे जातीय गुन्हे मुददाम घडवुन आणल्या जात आहे या मध्ये पुणे अहमदनगर, बिड, नागपुर व महाराष्ट्रातील इतर अत्याचार साठी विशेष न्यायालय स्थापन करावे , अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंद कायदयाच्या कलम 15 नुसार अरविंद बनसोड आणि विराज जगताप या अत्याचारासच्यासह इतर सर्व प्रकरणातील तक्रारदाराच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील नियुकत करावा , प्रत्येक जिल्हयात सामाजिकदृष्टया जागरूक पोलीस निरीक्षकांची ओळख करून घ्यावी आणि सर्व जातीय अत्याचाराची चौकशी या अधिकाऱ्याच्या मार्फत करावी अशा विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लोणार च्या वतीने तहसिलदार लोणार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मेहकर लोणार तालुक्याचे नेते संघपाल पनाड, विनायक मापारी ,दत्ता राठोड , राहुल अवसरमोल, मुस्तफा, शकीर पठाण, दिपक अंभोरे, अमित काकडे, साहेबराव वानखेड, मोहन मोरे, मंहपती वाणी आदी कार्यकर्ते उपस्थीत होते

1 

Share


टाईम महाराष्ट्र
Written by
टाईम महाराष्ट्र

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad