काल अंधाऱ्या राती दिसले एक आशेचे किरण .....
ज्याने पहाटे केले सारे विचारांचे स्मरण .....
आशेच्या या किरणाला आता म्हणते थांब जरा .....
तुझ्यामुळे लाभला या जीवनाला अर्थ खरा .....
तु मिळण्या आधी मनात सुरू होती विचारांची घालमेल .....
तु मिळाला आणि जमला सारा तालमेल .....
अरे विचारांच्या या सापडयात अडकत चालले होते जरी मन .....
पण मनाच्या एका कोपर्यात तुला शोधत होते तेच मन .....
आता तुझी सोबत लाभली आता नाही वाटत काही मोठे .....
अंधारावर प्रकाशाची मात करत आता पुढे आलेले संकटही वाटते खूप छोटे......