Bluepad | Bluepad
Bluepad
Title

7
7878
3rd Jul, 2023

Share

━━┅━ ┅━═▣◆★✧★◆▣═━┅━━┅━
*गुरुविण कोण दाखवील वाट?
━┅━━┅━ ┅━═▣◆★✧★◆▣═━┅━━┅━▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
आज गुरुपौर्णिमा,ज्याने आपल्याला भरभरून दिलं,त्याच्या पायावर डोक ठेवण्याचा एक दिवस गुरुपोणिॅमा!ही कृतज्ञता एका दिवसाची नाही.गुरुचरणी नतमस्तक व्हायला ना मुहूर्ताची गरज असते,ना निमित्ताची "तेरा तुझ को अर्पण'असं म्हणत.आपले सारे त्याच्या पायाशी ठेवायचं आणि कायम त्यांच्या ऋणात राहून त्याच्याकडून सतत नवनवीन शिकत राहायचं.
फार पूर्वीपासून आपल्या हिंदू संस्कृतीत," गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा,गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:"
गुरुला त्रिदेवाच स्थान,स्वयंसिध्द ईश्वराचे अंशतत्व मानल आहे. ईश्वराच्या आधी गुरुला वंदन करण्याची आपली परंपरा तर,आहेच.
गुरूला कळसरुपी मानून नेहमी पुजले आहे.अध्यात्मिक जीवनात महात्म या संकल्पनेला अनन्य साधारण अस महत्व दिल गेल आहे
भारतात गुरुशिष्य परंपरा प्राचीनकाळापासुन अस्तित्वात आहे.मी कोणाचा तरी शिष्य आहे.हा मधुरभाव या गुरु शिष्य परंपरेत होता.जनकाचे गुरु याज्ञवल्य होते.शुक्राचार्यचे गुरु जनक होते.
.सांदीपनीचा शिष्य म्हणून घेण्यात कृष्ण व सुदामा गौरव मानत होते.विश्वामित्राची सेवा करण्यामध्ये राम व लक्ष्मण कधी थकत नव्हते.वेद,उपमन्यू किंवा अरुणी यांना धौम्य ऋषी गुरु लाभले.याबद्दल ते स्वतःला धन्य समजत होते.अर्जूनाच्या मनात गुरु द्रोणाबद्दल असलेला नाजूक भाव,परशुरामापासून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्णाने खूप कष्ट घेतले. शुक्राचार्यापासून संजीवनी विद्या प्राप्त करणाऱ्या कचाची ज्ञाननिष्ठा व गुरुभक्ती आजही आपल्याला नतमतक नतमस्तक बनवते. गौडपदाचार्याचे नाव घेताच शंकराचार्य भावविभोर होत असत.पाश्यात्य देशातही"मी आमक्याचा शिष्य आहे'असं मानण्यात गौरव अनुभवतात.मी साॅक्रेटिसचा शिष्य आहे.असे समजण्यात प्लेटो स्वतःला कृतकृत समजत होते आणि प्लेटो माझा गुरु आहे.असे सांगण्यात आॅरिस्टॉटल स्वतःचे जीवन धन्य समजत होते.ही गुरुशिष्य परंपरा आजही नव्या रुपातच का होईना,चिरंजीव ठरली.
अशा गुरुच महत्व अन महात्म्य जाणुन घेण्यासाठीच आजचा गुरुपोणिॅमेचा उत्सव हिंदु संस्कृतीत साजरा केला जातो.
भारताचा सांस्कृतिक इतिहास,पुस्तकाच्या पानात नाही तर, त्याच्या जिवंत उत्सवात लिहिलेला आहे. त्या उत्सवांच्या पाठीमागे असलेला पुर्वजांचा दृष्टीकोन आपण कालसुसंगतपणे समजुन घेतला तर,
आपल्या संस्कृतीला बूरसटलेली विचारधारा म्हणणार्‍यांचा दुषित दृष्टिकोन समजून तर घेताच येईल.त्याच बरोबर जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याचा भुगोल आपोआपच बदलतो.हे घडू द्यायच नसेल तर,आपला समृद्ग वारसा आपण समजुन घ्यायलाच हवा.
तरच,आपली संस्कृती टिकविण्यासाठी वैचारिक बळही मिळेल.
आपले उत्सव आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले,उपयोगात आणले,सांभाळले,संस्कारी ठेवले,समुन्नत बनविले तरच,उत्सव साजरे करण्याला काही अर्थ आहे.उत्सव-दर्शन खऱ्या अर्थाने आपले जीवन-दर्शन बनेल.ह्याचसाठी ह्या उत्सवाची रचना केली आहे.ती कालसुसंगत कशी बनेल याकड पाहणही अगत्याच.
तुम्ही विचाराल? आजच्या विज्ञान युगाच्या यंत्र युगाच्या काळात गुरु शिष्य परंपरा लोप पावत चालली.आज नि:स्पृह भावनेने शिष्याचं आयुष्य घडवणारा गुरु पहावयास मिळतात तरी कुठे? याचे उत्तरही तुमच्या प्रश्नात दडल आहे.नि:स्पृह भावनेचे शिष्यही असायला हवेतच की? हे चुकीचे नाही ना? बरोबरही नाही.काळ कितीही बदलला असला तरी,आजही गुरु नवनव्या रुपात, नवनव्या संदर्भात भेटतात. पूर्वीसारखं सारं ज्ञान एका व्यक्तीकडून मिळेल असं आता या युगात जमणार नाही.एकाच वेळी आपल्याला अनेक गुरुही असू शकतात.
आजच्या वैज्ञानिक युगात वावरतानाही आपल्या पुर्वजांनी सांगितलेल गुरुमहात्म्य कालसुसंगत ठरत.आजही आपण गुरुपरंपरा आचरणात आणु शकतो.त्यासाठी गुरुंचे आठ प्रकारही सांगितले आहेत.ते अभ्यासण गरजेच ठरत.
गुरु ते असतात.जे शिष्याला लघू राहू न देता,लघुत्वातून उन्नत करुन गुरुत्वात घेवून जातात.असे आठ प्रकारचे गुरु असतात.
🔸चंदन गुरु_
जे स्वतः चंदनाप्रमाणे झिजून अर्थात सत्कार्यासाठी कष्ट सहन करुनही शिष्यांचे कल्याण करतात.
🔸विचारप्रधान गुरु-
असे गुरु शिष्यांना सदविचारांचा सुवास देतात. आपल्या सत्संग प्रवचनाद्वारे शिष्यांना उत्तम विचार प्रदान करुन सन्मार्गावर घेवून जातात.
🔸करुणाप्रधान गुरु -
जसे एखादे मूल अधू असेल,तरी आई करुणा करुन त्याला मिठी मारते,अशाच प्रकारे शिष्याची बुध्दी जरी मंद असले,त्याच्यात योग्यता नसेल तरीही करुणाप्रधान गुरु त्याला उन्नत करतात.
🔸स्पर्श गुरु -
अशा प्रकारचे गुरु जेव्हा शिष्यांच्या डोक्यावर हात ठेवतात किंवा त्याला स्पर्श करतात तेव्हा शिष्यात, त्यांच्यात शक्तीचा संचार होतो. तो त्याचा एक प्रकारचा संकल्प होऊन जातो आणि शिष्याचे मन व विचार बदलू लागतात.
🔸चंद्र गुरु _
जसे चंद्र दूर राहूनही चंद्रकांत मण्याला द्रवीभूत करतो आणि शीतलता प्रदान करतो तसेच ज्या गुरुंच्या उपस्थितीने न द्रवीत होते. अनुशासित होते, सज्जन होते, थकवा मिटू लागतो. हृदय पुलकित होते आणि शिष्याच्या जीवनात शीतलता व शांतीचे साम्राज्य स्थापित होते, ते चंद्र गुरु होत.
🔸कूर्म गुरु _
जसे कासवी केवळ नेत्रकटाक्षाने आपल्या पिल्लांचे पालनपोषण करते. तसेच कूर्म गुरु आपल्या केवळ कृपादृष्टीने शिष्यांमध्ये प्रेम, भक्ती,शक्ती आणि माधुर्याचा संचार करून की त्यांना उन्नत करतात.
🔸दर्पण गुरु _
जे आरशाप्रमाणे शिष्यांच्या आंतरिक उणीवा पाहून
त्या दूर करण्यासाठी उपदेश देतात.
🔸क्रौंच गुरु_
क्रौंच पक्षीण आपल्या अंड्यापासून सहा सहा महिने दूर राहूनही केवळ स्मरणाने त्यांचे पोषण करते, तसेच क्राँच गुरु केवळ स्मरणाने शिष्यांचे कल्याण करतात आणि त्यांच्या घडवणुकीत साहाय्यक होतात.
शिष्याने गुरुंचे स्मरण करणे तर स्वाभाविक आहे परंतु गुरु आपल्या शिष्याच्या स्मरणात गढून जावेत,तर शिष्याच्या गुरुवरच्य अगाध श्रध्दा व अनन्य निष्ठेवरच अवलंबून आहे. शिष्याची गुरुप्रती अगाध श्रध्दा, निष्ठा व संपूर्ण शरणागतीरुपी थाप गुरुंना हृदयरुपी दार उघडण्यासाठी विवश करते आणि शिष्य आत्मरसाने परितृप्त सदगुरुंच्या हृदयातून प्रवाहित होणाऱ्या आत्मअमृताचे आस्वादन करुन कृतार्थ होतो.
काही गुरुमध्ये केवळ चंदन गुरुसारखीच योग्यता विकसित झालेली असते. कांहीमध्ये केवळ विचार गुरुंची, काहींमध्ये केवळ करुणा गुरुंची तर,काहींमध्ये केवळ स्पर्श गुरुंची योग्यता विकसीत असते. काही गुरुमध्ये केवळ क्रौंच गुरु वा कूर्म गुरुसारखी योग्यता विकसित असते. परंतु काही गुरु असे असतात. ज्यांच्यात एकाच वेळी सात-आठ प्रकारच्या गुरुंच्या योग्यता विकसित झालेल्या असतात.
आज स्वतःला पुरोगामी समजून हिंदूंचे तत्त्वज्ञान बुरसटलेलं आहे असं मांडण्यात अनेकांना आपलं पांडित्य वाटतं तर,त्यांनी दत्तगुरूंच्या चरित्राचा अभ्यास करावा.दत्तगुरूंनी अचर,सजीव निर्जीव असे गुरु मानले.त्यांच्याकडून विशेष प्रकारचा सद्गुण शिकून घेतला. पृथ्वी,वायू,आकाश,अग्नी,पाणी,चंद्र,सूर्य,कबूतर,अजगर,समुद्र,पतंग किडा,माशी,हत्ती,भुंगा,हरीण,मासा, पिंगला वेश्या,टिटवा पक्षी,लहान मुल, कुमारी कन्या,लोहार,सर्प,कोळी किडा,गांधील माशी, आदिना ही गुरू स्थानी मानले.
यावरून चराचरात ईश्वरी भाव व गुरुतत्त्व असते.अशी व्यापक धारणा हिंदू संस्कृतीने मनामनात रुजवली.त्याचाही विचार या दिवसाच्या निमित्ताने व्हावा व आपल्या जगण्याला नवीन दृष्टीही मिळावी. हाच गुरु पौर्णिमेचा उद्देश असावा. असं मला वाटतं.
गुरु म्हणजे,आपल्या आयुष्यात जादूची काडी फिरवून चमत्कार घडवणारा जादूगार आहे का?कोळशातून सोने निर्माण करणारी खाण का? चिखलातून मुर्ती बनवणारा मुर्तीकार,दगडातून शिल्प तयार करणारा शिल्पकार आणि वेळप्रसंगी आईबापापरी बनणारा

0 

Share


7
Written by
7878

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad