Bluepad | Bluepad
Bluepad
💐 गुरूपौर्णिमा 💐
सौ.मेघा नांदखेडकर
सौ.मेघा नांदखेडकर
3rd Jul, 2023

Share

सादर करते शब्दसुमने करावा स्वीकार💐
मनोभावे चरणी वंदना स्वीकारा सत्कार💐
तुमच्यामुळे झाले समृद्ध आमचे बालपण
कुठेही जावो जगात सदैव ठेवू आठवण
आदर्श शिक्षक,करारी,खंबीर व्यक्तीमत्व
विषयज्ञान,शिकवती निवडून निके सत्व
धडे,कविता,व्याकरण,अलंकार अन् व्रते
भडभुंज्यांच्या लाह्यांसम अजूनही स्मरते
ओल्या मातीला कुंभार जसा देतसे आकार
मारून शब्दांचाच मार,देती शब्दांनी आधार
परिस संपर्कात येता जसे लोहाचे होई सोने
तव ज्ञानतेजाने उजळली सुवर्णासम ही मने
अलिप्त राही ज्ञानदाता जणू विरक्त एक संत
बालमनास टोचायची चहाच्या कपाची खंत
चिखलातून ही कमळे उगविली कुणी सांगा
गावाबाहेर नांदे शंकराच्या मस्तकी ज्ञानगंगा
------- गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने
आदरणीय श्री शंकर चां. पोटफोडे गुरूजींना
समर्पित 🙏🙏🙏
💐 गुरूपौर्णिमा 💐

1 

Share


सौ.मेघा नांदखेडकर
Written by
सौ.मेघा नांदखेडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad