Bluepad | Bluepad
Bluepad
🙏गुरुपौर्णिमा 🙏
Komal Chinchkar
Komal Chinchkar
3rd Jul, 2023

Share

भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपोर्णिमा. गुरुपौर्णिमा हा भारतातील गुरू शिष्य परंपरेची माहती सांगणारा एक उत्सव आहे. गुरू आपल्या शिष्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारचे सुयोग्य शिक्षण देत असतात. 'गुरुविण कोण दाखवील वाट' असे देखील म्हटले जाते. आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता प्रकट करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. महर्षी भगवान व्यास यांच्या स्मरणार्थ गुरुपोर्णिमा साजरी केली जाते. महर्षी व्यास यांनी महाभारतासारखे अजरामर काव्य लिहले आहे. गुरुपोर्णिमा ही व्यास पोर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला "व्यास पौर्णिमा" म्हणून देखील ओळखले जाते. गुरुपोर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या पोर्णिमेला येते. हा सण गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचा सण आहे. आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचवण्यासाठी गुरुच आपल्याला मार्गदर्शन करतात. गुरुविषयी प्रेम आदर व कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे.

0 

Share


Komal Chinchkar
Written by
Komal Chinchkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad