*जीवन घडविणारे गुरू हेच इहलोकीचे परब्रह्म*
आपलं जीवन घडविणारे गुरू हेच आपल्यासाठी इहलोकीचे परब्रह्म आहेत .आयुषच्या वाटेवर मार्गक्रमण करताना आपण ज्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करतोय ते मार्गक्रमण यशस्वी होण्यासाठी आपल्याला वेळोवेळी प्रोत्साहन देणारे प्रेरणास्थान,आपला आदर्श,आपले मार्गदर्शक हेच आपल्या आयुष्यातील गुरू असतात.आपले मार्गदर्शक जसे असतील त्या प्रमाणे आपलं जीवन घडत आणि त्या नुसारच परिणाम आपल्या वाट्याला येत असतात.गुरूविना कोण पुर्ण गुरू इहलोकीचे परब्रह्म गुरू मायेचा सागर साक्षत माऊली गुरू अनाथांचा नाथ , कृपासिंधु गुरू जीवनाचे पथदर्शक , शिल्पकार हे आज नाही तर युगो युगो अनादी काळापासून हि परंपरा चालू असून अनादी काळापासून गुरूचां महिमा प्रत्येक युगात आपल्या दृष्टीस पडतो. कारण मानवी जीवनात परमेश्वर पेक्षा हि जास्त महत्व गुरूच आहे . जसं हिरा हा सगळ्यात मौल्यवान वस्तू असतो . परंतु तो खाणित असताना किंवा जोपर्यंत तो योग्य अशा कारागिरांच्या हाती पडत नाही तोपर्यंत हिरा हा गारगोटी सारखाच असतो .म्हणजे हिरयाच मुल्य शुन्य असत. जेव्हा कारगिर हिरयाला घडवतो योग्य आकार देतो तेव्हा मात्र कुठं तो हिरा जगातील सगळ्यात मुल्यवान वस्तू ठरतो . म्हणजे हिरा घडविणारे कारगिर जेव्हा त्या हिरयाला योग्य आकार देतात तेव्हा त्याचं मौल्यवान दगिण्यात रूपांतर होत. आणि खरया अर्थाने हिरा शोभुन दिसतो .तसंच आपलं सुद्धा आहे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गुरुंची कृपादृष्टीआपल्यावर पडल्याशिवाय आपण चमकत नाही किंवा आपल्या कर्तुत्वाला झळाळी मिळत नाही .हे अगदी वास्तव असुन याची अनुभूती आपण घेत असतो .म्हणून आपल्याला आपल्या जीवनात कोणी तरी मार्गदर्शन करत असत घडवत असतं आणि आपण जेव्हा पुर्ण घडतो . तेव्हा मात्र आपल्यला घडविण्यासाठी प्रयत्न करणारे गुरू यांच महत्व आपल्या सह इतरांच्या लक्षात येत . म्हणून प्रत्येकाच्या जीवनातील जडणघडणीत गुरू च योगदान खूप मोठ योगदान असत . म्हणून कोणत्याही क्षेत्रातील महान पंडित व्यक्ती , सर्वश्रेष्ठ व्यक्ती किंवा सर्वसाधारण व्यक्ती असो गुरु शिवाय कोणीही पुर्णत्वास जाऊ शकत नाही .एवढी प्रचंड मोठी महती व महत्व गुरू च आहे श्री गुरु दत्त यांचे तर चोवीस गुरु होतो . अपूर्णला पुर्ण आणि पुर्ण ला सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट मध्ये रूपांतरित करण्याची शक्ती गुरू मध्ये असती आणि कुठल्याही मान , सन्मान, मोठेपणा,आपेक्षेशिवाय निस्वार्थी पणे हे कार्य गुरु करतं असतात .हिच गुरूची सगळ्यात मोठी महती आहे आणि म्हणूनच योग्य गुरु लाभण सुद्धा परम भाग्य असतं.गुरू माता ,पिता ,बंधु सखा , गुरु मार्गदर्शक दिशादर्शक पथदर्शक म्हणून गुरु शिवाय जीवन निरर्थक . आपल्या जीवनात येणारी सगळी वादळ संपुष्टात आणुन योग्य मार्ग काढुन शिखरं पादाक्रांत करण्याची शक्ती ,ताकद,बळ,उमेद गुरू देत असतात तसेच जीवनातील अनेक वळणावर योग्य गती व दिशा देण्याचं कार्य हे गुरू देत असतात म्हणूनच आपण योग्य ठिकाणी पोहचतो . आणि हि योग्य दिशा देणार व्यक्तिमत्व म्हणजे गुरू जसं एखाद्या वाहनाचा चालक जर योग्य असेल तरच ते वाहन अपेक्षित किंवा योग्य ठिकाणी पोहचु शकत. तसंच आपल्या जीवनाच आहे . म्हणून गुरू विषयी नितांत श्रद्धा, निष्ठा, आदरभाव , आणि अज्ञाधारक रहणयाचा महत्वपूर्ण गुण आपल्या मध्ये असला पाहिजे.गुरूला आपल्या कडुन काहीही अपेक्षा मोह व महत्वकांक्षा नसते . फक्त आपल्या जीवनातील दुःख कमी करण्यासाठी व आपल्यला यशोशिखरावर पोहचण्यासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी दृष्य अदृष्य शक्ती म्हणजे गुरू म्हणून जो गुरू अज्ञेत शब्दात राहिला तो यशस्वी झाला यामध्ये तीळमात्र शंका नाही . म्हणून गुरू विषयी निस्सिम भक्ती भाव असला पाहिजे तसेच गुरू विषयी सकारात्मक दृष्टिकोन असले तर वेळोवेळी गुरू कडुन होणार मार्गदर्शन आणि निर्णय आपल्या जीवनाच्या दृष्टीने योग्य पण तात्कालीन परिस्थितीमध्ये आपल्यला सुसंगत वाटणार नाही असे असु शकतीलही परंतु त्या निर्णयाचे मार्गदर्शनाचे अंतिमतः परिणाम सुयोगयच येणार मात्र या कालखंडात आपला गुरु वरील विश्वास तीळमात्र विचलित होता कामा नये .तसेच आपला गुरु प्रति असणारा भाव आणि निष्ठा जर अशा वेळी विचलित झाली तर मग मात्र आपल्याला खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावा लागु शकत.महणुन अशा कठिण प्रसंगी गुरू हे आपल्याला भवसागर तरूण नेतात .गुरू ची दृष्टी हि दुरदृष्टी असतो . कळी काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी गुरूला अवगत असते . म्हणून आयुष्याच सार्थक कल्याण करायाचे असेल तर गुरू अज्ञा आणि गुरू प्रति निरपेक्ष भाव खुप महत्वाची बाब आहे. गुरु साक्षात परब्रम्ह म्हणून आपल्या जीवनातील गुरू च महत्व हे सर्वश्रेष्ठ आहे आणि जीवनात योग्य गुरु मिळणं हे आपलं परम भाग्य आज गुरुपौर्णिमा असल्या कराने आयुष्यातील कळतं न कळत जे जे गुरू स्थानी आहेत आणि हे जीवन घडविण्यासाठी साठी ज्यांचं ज्यांचं मोलाचं अनमोल योगदान लाभल अशा सर्व गुरू चरणीं नतमस्तक
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301