#गोष्ट एका बेडकांची
जगाच्या भूगोलात पॅसिफिक नावाचा एक महासागर आहे त्याच महासागरात एक बेट आहे ज्या बेटावर एक तळ आणि एक नदी आहे जी त्याच महासागराला जाऊन मिळते. तेथील एकंदर वातारणामुळे तेथे अनेक प्रकारचे बेडूक आढळून येतात. एकदा पॅसिफिक सागरातील बेडकांनी ठरवलं की चला आपल्या आजू बाजूचा परिसर बघून येऊ म्हणून ते त्या नदीत गेले व तेथील बेडकांना आपली ओळख सांगून त्यांच्याशी संवाद साधू लागले पण झालं असं की त्या नदीतील बेडकांनी कधी समुद्र पाहिलेलाच नव्हता त्यामुळे ते नदीतील बेडूक सागरातील बेडकांसमोर बढाईक्या मारू लागले डराव डराव करू लागले. परंतु समुद्रातील बेडूक हे सर्व शांतपणे ऐकून घेत होते काही काळाच्या विश्रांती नंतर समुद्रातील बेडकांनी नदीतील बेडकांचा निरोप घेण्याचे ठरवले तेव्हा तुम्हाला येथील एक तळे आहे तेथील बेडकांशी तुमची भेट करून देतो असे सांगू लागले. त्यानंतर हे दोन्ही बेडूक तळ्यातील बेडकांना भेटायला गेले तेथेही तेच घडले. कधीही नदी व समुद्र न पाहिलेल्या बेडूक त्यादोन्ही बेडकांसमोर बढाईक्या मारू लागले. हे पाहून सुद्धा समुद्रातले बेडूक शांतच होते परंतु नदीतील बेडकांना हे काही सहन होईना. त्यांनी तळ्यातील बेडकांना नदीमध्ये येण्यासाठी आमंत्रित केले. तळ्यातील बेडूक नदीत गेल्यावर सुन्न झाले व त्यांचा अहंकार पुरता उतरला. समुद्रातले बेडूक हे सर्व शांत रीतीने बघत होते. नदीतील बेडकांनी समुद्रात जाण्यासाठी हट्ट केला व खूप आग्रह केला म्हणून समुद्रातील बेडकांनी तळ्यातील व नदीतील बेडकांना आपले समुद्रातील विश्व दाखविण्यासाठी आणले. तेथील दृश्य बघून तर त्या दोन्हीही बेडकांनी तोंडातच बोट घातली व त्यांच्या चूक लक्षात आली तरीही समुद्रातील बेडूक शांत होते व मोठ्या आदराने त्यांनी तळ्यातील व नदीतील बेडकांचे आदरातिथ्य केले.
तात्पर्य - ???